11th Admissions 2024-25

11th Admissions 2024-25

अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी लवकरच निर्णय होणार- शिक्षण विभाग

PUBLISH DATE 6th April 2022

दहावीची लेखी परीक्षा सुरू होताच अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी शिक्षण विभागाकडून कार्यक्रम जाहीर केला जातो.

मुंबईसह (Mumbai) राज्यातील पाच ते सहा महापालिका (Municipal corporation) क्षेत्रांतील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया (eleventh online admission process) आणि त्यासाठीचे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाणार आहे. त्यासाठी आज शिक्षण संचालकस्तरावर बैठक पार पडली असून त्यात प्रवेशासाठीचा अहवाल तयार करून तो मंजुरीसाठी मंत्रालयात (Mantralaya) पाठविण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

शिक्षण विभागाकडून प्रवेश प्रक्रियेतील पहिला टप्पा सुरू केला जातो. मात्र, यंदा त्यासाठी काही दिवसांचा विलंब झाला असून त्यासाठीची प्रक्रिया पुढील काही दिवसांत सुरू होणार आहे. मागील वर्षी औरंगाबादचा अपवाद वगळता मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, अमरावती आणि नागपूर महापालिका क्षेत्रांतील कनिष्ठ महाविद्यालयांतील अकरावीचे प्रवेश ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आले होती.

मुंबई विभागातच तब्बल दीड लाखांहून अधिक जागा रिक्त राहिल्या होत्या. त्या जागांबाबतही आजच्या बैठकीत चर्चा झाली. रिक्त जागा कमी करण्यासाठी या वेळी वेगळे नियोजन केले जाणार असल्याचे सांगण्यात येते.

अहवाल मंत्रालयात मंजुरीसाठी

यंदाही मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, अमरावती आणि नागपूर महापालिका क्षेत्रात अकरावी प्रवेश ऑनलाईन पद्धतीने केले जाणार आहे. मंगळवारी झालेल्या बैठकीत प्रवेशासाठीचा अहवाल मंत्रालयात मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे, अशी माहिती शिक्षण संचालक महेश पालकर यांनी दिली.

--------------------------------------------------------------------------------

VidyarthiMitra.org

Admission Guidance 2021: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2021 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2021 | JoSSA 2021 | MHT-CET 2021 | MBA 2021 | Pharmacy 2021 | Polytechnic 2021

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News