Career Guidance

Career Guidance

बारावीनंतर पदविका अभ्यासक्रम करिअर संधी

PUBLISH DATE 28th July 2021

सर्वसाधारणपणे पदविका अभ्यासक्रमासाठी दहावीनंतर प्रवेश मिळतो, मात्र असे काही पदविका कोर्सेस आहेत ज्यामध्ये बारावीनंतर प्रवेश मिळतो आणि तोसुद्धा कोणतीही वेगळी प्रवेश परीक्षा न देता, केवळ बारावीच्या बोर्डाच्या मार्कांआधारे. अशा पदविका अभ्यासक्रमांची माहिती करून घेऊ यात.

१) सरफेस कोटिंग टेक्नॉलॉजी

कार, स्कूटरपासून रेफ्रीजरेटरपर्यंत कोणतीही वस्तू आकर्षक व चकचकीत करून ग्राहकांना मोहित करण्याचे काम सरफेस कोटिंग करते. सरफेस कोटिंगचा उपयोग वस्तूंच्या पृष्ठभागाचे संरक्षण करणे, तिला गंजप्रतिबंधक बनवणे, उष्णता प्रतिबंधक बनवणे इ. विविध गोष्टींसाठी केला जातो. बारावीनंतर या विषयात तीन वर्षांचा पदविका अभ्यासक्रम उपलब्ध आहे. संपूर्ण महाराष्ट्रात फक्त पुण्यातील डेक्कन एज्युकेशन संस्थेमध्ये हा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. बारावी विज्ञान शाखेतून फिजिक्स, केमिस्ट्री व मॅथेमॅटिक्स या विषयांमध्ये किमान ३५% गुण मिळवून बोर्डाची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ घेता येतो. हा तीन वर्षांचा कोर्स सॅन्डविच स्वरूपाचा असून, यामध्ये दुसऱ्या वर्षाचे पहिले व तिसऱ्या वर्षाचे दुसरे सेमिस्टर इंडस्ट्रीमध्ये प्रत्यक्ष कामाचा अनुभव घ्यावा लागतो. या काळात इंडस्ट्री स्टायपेंडही देते. हा कोर्स पूर्ण केल्यानंतर नामांकित कंपन्यांमध्ये रोजगाराच्या भरपूर संधी उपलब्ध होतात त्याचबरोबरीने विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या व स्वयंरोजगाराच्या संधीही उपलब्ध होतात.

२) डिप्लोमा इन फार्मसी

करोना महामारीच्या काळात जगभरात ज्या उद्योगाची सर्वांत जास्त भरभराट झाली, तो उद्योग म्हणजे फार्मसी अर्थात औषधनिर्माण उद्योग. ज्या उद्योगात मंदी कधीच येत नाही, त्या फार्मसी क्षेत्रात जाण्यासाठी बारावीनंतर दोन मार्ग उपलब्ध आहेत. एक म्हणजे फार्मसी पदवी, ज्यासाठी बारावीनंतर महाराष्ट्राची सीईटी परीक्षा द्यावी लागते आणि दुसरा मार्ग म्हणजे बोर्डाच्या मार्कांआधारे दोन वर्षांचा पदविका अभ्यासक्रम. विज्ञान शाखेतून बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना या कोर्ससाठी प्रवेश मिळतो. महाराष्ट्रातील अनेक महाविद्यालयांमध्ये हा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना फार्मसी पदवीच्या दुसऱ्या वर्षात प्रवेश घेता येतो. हा पदविका अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना स्वतःचे मेडिकल शॉप सुरू करता येते किंवा हॉस्पिटलच्या फार्मसीमध्ये नोकरी मिळू शकते. औषध कंपन्यांच्या मार्केटिंग व विक्री विभागातही या विद्यार्थ्यांना रोजगाराच्या चांगल्या संधी मिळू शकतात.

३) डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट

बारावीनंतर हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना बारावीनंतर दोन मार्ग उपलब्ध आहेत. एक म्हणजे हॉटेल मॅनेजमेंट पदवी, ज्यासाठी बारावीनंतर देशपातळीवरील किंवा महाराष्ट्राची सीईटी परीक्षा द्यावी लागते आणि दुसरा मार्ग म्हणजे बोर्डाच्या मार्कांआधारे तीन वर्षांचा पदविका अभ्यासक्रम. आर्ट्स, कॉमर्स, सायन्स किंवा व्होकेशनल यांपैकी कोणत्याही शाखेतून बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना या पदविका कोर्ससाठी प्रवेश मिळतो. महाराष्ट्रातील अनेक महाविद्यालयांमध्ये हा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतात.

बारावीनंतरच्या या तीनही पदविका अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठीची जाहीरात www.dtemaharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाली आहे. अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची बारावीच्या बोर्डाच्या मार्कांआधारे मेरिट लिस्ट तयार केली जाते व नंतर प्रवेशासाठी कॅप राऊंड होतात.

11thCET

----------------------------------------------------------------------------------

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitraहा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News


बारावीनंतर पदविका अभ्यासक्रम करिअर संधी
14th February 2024

UPSC Exam Preparation Tips

बारावीनंतर पदविका अभ्यासक्रम करिअर संधी
6th February 2024

Career In Fashion Designing

बारावीनंतर पदविका अभ्यासक्रम करिअर संधी
1st January 2024

AI Trends 2024

बारावीनंतर पदविका अभ्यासक्रम करिअर संधी
27th December 2023

MPPSC Result 2019 Out

बारावीनंतर पदविका अभ्यासक्रम करिअर संधी
25th December 2023

Skill Development Courses 2024

बारावीनंतर पदविका अभ्यासक्रम करिअर संधी
25th December 2023

UPSC Free Coaching

बारावीनंतर पदविका अभ्यासक्रम करिअर संधी
23rd December 2023

Career Tips

बारावीनंतर पदविका अभ्यासक्रम करिअर संधी
14th December 2023

Career Tips

बारावीनंतर पदविका अभ्यासक्रम करिअर संधी
8th December 2023

Career Options for Arts Stream

बारावीनंतर पदविका अभ्यासक्रम करिअर संधी
28th November 2023

Career In Railways