Career Guidance

Career Guidance

वाटा करिअरच्या २०२३: परस्पर संबंध- निरंतर प्रशिक्षणाची गुरुकिल्ली

PUBLISH DATE 28th June 2023

करिअरमध्ये सतत प्रगतिपथावर असण्याची क्षमता ही तुम्ही कार्यक्षेत्रातील नवीन कार्यपद्धती, तंत्रज्ञान आणि ट्रेंड्स याबाबतीत किती अद्ययावत ज्ञान आत्मसात करता यावर अवलंबून असते.

तुम्ही कॉलेज कॅम्पसमधून बाहेर पडलेले असता. तसाही, शैक्षणिक अभ्यासक्रम हा अद्ययावत नसतो. अद्ययावत माहिती तुम्हाला कुठून मिळेल? चला तर मग, नेटवर्किंगच्या (परस्पर संबंध) माध्यमातून आपण अद्ययावत माहिती प्राप्त करण्याचे उद्दिष्ट कसे साध्य करू शकतो याचा विचार करूया.

1) बॉस किंवा वरिष्ठ यांच्याकडून शिकणे - बॉसकडून तुम्हाला संबंधित विषयाचे ज्ञान आणि काळाच्या कसोटीवर सिद्ध झालेल्या कार्यपद्धती शिकायला मिळतीलच; त्याबरोबर त्यांना अपयश का आणि कशाप्रकारे आले या बाबतचे महत्त्वाचे धडे तुम्हाला देऊ शकतील. वरिष्ठांचे या क्षेत्रातील अनुभव म्हणजे आपला प्रवास सुखकर करणारी शिदोरीच असते.

2) सहकाऱ्यांकडून शिकणे - धोरणात्मक दृष्टीने पाहता, तुमचे सहकारी आणि त्या क्षेत्रातील इतर लोक हे तुमच्या जोखमीच्या निर्णयांबाबत मदत करण्यासाठी सर्वोत्तम पर्याय असतात. एखादा प्रकल्प किंवा परिस्थिती यासंदर्भात तुमचे बॉस तुम्हाला मदत करू शकत नसतील तर याविषयी आपण नेमके काय करावे असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो.

आपण एका वेगाने बदलणाऱ्या व्यवसायाचे किंवा तंत्रज्ञानाचे घटक असतो आणि तुमच्या बॉसने अशी परिस्थिती हाताळून बराच काळ उलटून गेलेला असतो. अशा परिस्थितीमध्ये आपल्या सहकाऱ्यांशी संपर्क साधणे आणि त्यांच्या अनुभवाचा लाभ घेणे हे नेहमीच उपयुक्त ठरते.

उदा. तुमच्या पन्नास वर्षीय बॉसना आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, डेटा अॅनालिटिक्स किंवा आयओटी डिव्हाईसेस यांसंदर्भात माहिती असेल अशी अपेक्षा ठेवता येणार नाही, त्यामुळे तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांची मदत घेणे आवश्यक ठरते. आपल्या सहकाऱ्यांचे हे काम नसतानाही त्यांनी आपल्याला सहकार्य करावे यासाठी तुम्ही त्यांच्याबरोबर अनौपचारिक, मैत्रीचे संबंध विकसित करणे गरजेचे आहे.

सहकाऱ्यांकडून शिकणे हा एकप्रकारे देवाणघेवाणीचा मार्ग आहे. तुम्ही इतरांना जितकी जास्त मदत कराल तितकीच जास्त मदत तुम्हाला मिळेल. सगळ्यांनी मिळून दुपारचे जेवण एकत्र करणे म्हणजे केवळ गॉसिपिंग करणे नसते. एकमेकांकडून यशाची गुरुकिल्ली समजून घेणे आणि सर्वांनी एकत्रितपणे प्रगती साधणे यासाठी हा सर्वोत्तम मार्ग आहे.

3) कनिष्ठांकडून शिकणे - तुमच्या निकटच्या वर्तुळातील किंवा संस्थेतील सर्वांत बुद्धिमान कनिष्ठ सहकाऱ्यांना ओळखा. त्यांच्याशी अगदी ठरवून संवाद साधा. ते कशावर काम करत आहेत आणि सध्याचे अद्ययावत ट्रेंड्स कोणते आहेत हे जाणून घ्या. नवीन ट्रेंड्स, कार्यपद्धती आणि तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी ज्युनियर्स हा सर्वोत्तम वर्ग असतो.

कदाचित या बाबतीत तुमचे बॉस आणि सहकारी हे दोघेही निरुत्तर होऊ शकतात आणि त्यांना या विषयांबाबतीत अगदी अल्पप्रमाणात माहिती असू शकते. जोखीम घेण्याची भूक आणि उपलब्ध असणारा वेळ यामुळे ज्युनियर्स हे नवनवीन माहिती मिळवत असतात. त्यांचे सहकार्य तुमच्या प्रशिक्षणाचा आलेख उंचावण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरते.

4) स्वयंशिक्षण - सल्लागारांकडून जितके जास्त अहवाल मिळवता येतील तितके मिळवा. हे अहवाल वाचा आणि त्याविषयी वरील तीनही श्रेणींतील व्यक्तींशी चर्चा करा. यामुळे तुम्हाला निरंतर प्रशिक्षणाच्या एका पद्धतीचा लाभ होईल; एवढेच नाही तर तुम्ही त्यांच्या ज्ञानात भर टाकाल आणि त्यांचीही तुम्हाला मदत मिळेल परिणामी तुमचे परस्पर संबंधदेखील दृढ होतील.

वरील चारही पर्याय परस्पर सहयोगातून प्रशिक्षण घेण्याची साखळी पूर्ण करतात. त्याचा उपयोग कॉर्पोरेट कंपन्या किंवा संस्था यांना एखाद्या सुरळीतपणे चालणाऱ्या यंत्राप्रमाणे चालवण्यासाठी होतो. तुम्ही वरील चारही पर्यायांचा उपयोग केल्यास त्याचा दीर्घकालीन आणि यशस्वी करिअरसाठी उपयोग होऊ शकतो.

लेखक - अंकित भार्गव

(लेखक ‘फॉक्सबेरी टेक्नॉलॉजीज’चे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.)

-------------------------------------------------------

VidyarthiMitra.org

Admission Guidance 2022: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2022 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2022 | JoSSA 2022 | MHT-CET 2022 | MBA 2022 | Pharmacy 2022 | Polytechnic 2022

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News


वाटा करिअरच्या २०२३: परस्पर संबंध- निरंतर प्रशिक्षणाची गुरुकिल्ली
30th April 2024

While deciding the career

वाटा करिअरच्या २०२३: परस्पर संबंध- निरंतर प्रशिक्षणाची गुरुकिल्ली
14th February 2024

UPSC Exam Preparation Tips

वाटा करिअरच्या २०२३: परस्पर संबंध- निरंतर प्रशिक्षणाची गुरुकिल्ली
6th February 2024

Career In Fashion Designing

वाटा करिअरच्या २०२३: परस्पर संबंध- निरंतर प्रशिक्षणाची गुरुकिल्ली
1st January 2024

AI Trends 2024

वाटा करिअरच्या २०२३: परस्पर संबंध- निरंतर प्रशिक्षणाची गुरुकिल्ली
27th December 2023

MPPSC Result 2019 Out

वाटा करिअरच्या २०२३: परस्पर संबंध- निरंतर प्रशिक्षणाची गुरुकिल्ली
25th December 2023

Skill Development Courses 2024

वाटा करिअरच्या २०२३: परस्पर संबंध- निरंतर प्रशिक्षणाची गुरुकिल्ली
25th December 2023

UPSC Free Coaching

वाटा करिअरच्या २०२३: परस्पर संबंध- निरंतर प्रशिक्षणाची गुरुकिल्ली
23rd December 2023

Career Tips

वाटा करिअरच्या २०२३: परस्पर संबंध- निरंतर प्रशिक्षणाची गुरुकिल्ली
14th December 2023

Career Tips

वाटा करिअरच्या २०२३: परस्पर संबंध- निरंतर प्रशिक्षणाची गुरुकिल्ली
8th December 2023

Career Options for Arts Stream

वाटा करिअरच्या २०२३: परस्पर संबंध- निरंतर प्रशिक्षणाची गुरुकिल्ली
28th November 2023

Career In Railways