Career Guidance

Career Guidance

विद्यार्थी पालक संवाद २०२३: वैद्यकीय शिक्षणासाठीची प्रवेश प्रक्रिया

PUBLISH DATE 26th July 2023

देशभरात एमबीबीएस, बीडीएस अभ्यासक्रमांसाठी मेडिकल कौन्सिलिंग कमिटीमार्फत प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यामध्ये दोन प्रकारच्या प्रवेश प्रक्रिया आहेत. ज्या विद्यार्थ्यांना देशात कुठेही प्रवेश मिळाल्यावर जाण्याची तयारी आहे, अशा विद्यार्थ्यांनी ‘एमसीसी’ म्हणजेच मेडिकल कौन्सिलिंग कमिटीमार्फत ऑनलाइन फॉर्म भरावा. ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्राबाहेर जायचे नाहीय, असे विद्यार्थी ‘सीईटी सेल’च्या अधिकृत वेबसाइटवरून फॉर्म भरू शकता.

एमसीसी प्रवेश प्रक्रिया

‘नीट’ (NEET) परीक्षेसाठी पात्र ठरलेले इच्छुक विद्यार्थी ‘एमसीसी’मार्फत प्रवेश प्रक्रियेमध्ये नाव नोंदणी व ऑप्शन फॉर्म फिलिंग आज (ता. २६ जुलै)पर्यंत करू शकतात. विद्यार्थी ऑनलाइन पद्धतीने फॉर्म भरू शकतात. याअंतर्गत ‘एमसीसी’चे ‘नीट’ समुपदेशन हे १५ टक्के ऑल इंडिया कोटा (AIQ) जागांसाठी सरकारी महाविद्यालयांमध्ये आणि १०० टक्के डिम्ड/केंद्रीय विद्यापीठांमध्ये, ‘इएसआयसी/एएफएमसी’, ‘एआयआयएमएस’, ‘जेआयपीएमईआर’ आणि बीएस्सी नर्सिंग अभ्यासक्रमांसाठी आयोजित केली जाते. यावर्षी कॅप-राउंड १, २, मॉप-अप आणि स्ट्रे-व्हॅकेस्नी राउंडमध्ये कट-ऑफनुसार प्रवेश मिळवू शकता.

राज्यस्तरीय प्रवेश प्रक्रिया

महाराष्ट्रातील एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीयुएमएस, बॅचलर इन फिजिओथेरपी, बॅचलर इन ॲक्युपेशनल थेरपी, बीएएसएलपी या अभ्यासक्रमांच्या वैद्यकीय शासकीय व खासगी महाविद्यालयांच्या प्रवेशासाठी सीईटी सेलमार्फत प्रवेश प्रक्रिया नाव नोंदणी सुरू झाली आहे.

चॉईस लॉकिंग

  • मेडिकलचा ऑप्शन विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक भरावा. उमेदवारांना ते ज्या महाविद्यालयांसाठी पात्र आहेत, त्यांची यादी दिसेल. त्यानंतर त्यांना पसंतीच्या क्रमाने प्राधान्य निवडण्याचा सल्ला दिला जातो.

  • उमेदवारांनी त्यांच्या निवडी भरताना सावधगिरी बाळगावी. सर्व निवडी पुन्हा तपासा. एकदा निवड लॉक झाल्यानंतर किंवा ‘नीट’ समुपदेशनासाठी निवड भरण्याची तारीख संपली की, बदल करू शकणार नाहीत.

महत्त्वाच्या तारखा

उपक्रम तारखा

ऑनलाइन नोंदणी - २९/०७/२०२३ पर्यंत

पोर्टलवर दिलेल्या यादीनुसार सर्व आवश्यक मूळ कागदपत्रे रंगीत स्कॅन केलेली प्रत अपलोड करणे - ३०/०७/२०२३

सीट मॅट्रिक्स - ३१/०७/२०२३ पर्यंत

ऑप्शन (प्राधान्यक्रम) फॉर्म ऑनलाइन भरणे - ०१/०८/२०२३ ते

गट अ - फक्त एमबीबीएस/बीडीएस - ०३/०८/२०२३

अधिक माहिती करिता सीईटी सेलच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

मेडिकल काऊंसलिंग चॉईस फिलिंग स्टेप्स

  • ‘नीट’ समुपदेशनातील निवडी भरण्यासाठी, या चरणांचे अनुसरण करा.

  • नोंदणी क्रेडेन्शियल्स वापरून समुपदेशन वेबसाइटवर लॉग इन करा.

  • निवड भरणे विभागात जा.

  • उपलब्ध महाविद्यालये आणि अभ्यासक्रमांची यादी ब्राउझ करा.

  • तुमच्या पसंतीच्या निवडी निवडा आणि प्राधान्य द्या.

  • नियोजित तारीख, वेळेपूर्वी निवडी सबमिट करा आणि लॉक करा.

  • भविष्यातील संदर्भासाठी भरलेल्या निवडींची प्रिंटआऊट घ्या.

जागा वाटपाचा निकाल

‘नीट’ जागा वाटप प्रक्रियेत, अधिकारी उमेदवारांना त्यांच्या ‘नीट’ २०२३ स्कोअरच्या आधारे गुणवत्ता यादीनुसार जागा वाटप करतील. ‘एमसीसी’ जागा वाटप यादी प्रसिद्ध करते, जी संबंधित फेरीसाठी उमेदवारांनी केलेली प्रवेश जागा हायलाइट करते. सर्व निवडी आणि गुणवत्ता यादीवर प्रक्रिया केल्यानंतर अधिकारी ‘नीट’ जागा वाटपाचा निकाल जाहीर करतील.

आवश्यक कागदपत्रे

  • बारावी (किंवा समतुल्य) परीक्षेची गुणपत्रक

  • दहावी (किंवा समतुल्य) उत्तीर्ण प्रमाणपत्र आधार कार्ड लागू पडत असल्यास

  • जातीचे प्रमाणपत्र जात वैधता प्रमाणपत्र

  • नॉन क्रिमी लेयर प्रमाणपत्र ३१/०३/२०२४ पर्यंत वैध(क्रमशः)

महत्त्वाच्या लिंक

१) https://mcc.nic.in

२) https://cetcell.mahacet.org/CAP_landing_page_२०२३/

३) https://vidyarthimitra.org/news

लेखक - के. रवींद्र

(लेखक विद्यार्थी मित्र www.VidyarthiMitra.orgचे संस्थापक आहेत.)

Related News

विद्यार्थी पालक संवाद २०२३: वैद्यकीय शिक्षणासाठीची प्रवेश प्रक्रिया
30th April 2024

While deciding the career

विद्यार्थी पालक संवाद २०२३: वैद्यकीय शिक्षणासाठीची प्रवेश प्रक्रिया
14th February 2024

UPSC Exam Preparation Tips

विद्यार्थी पालक संवाद २०२३: वैद्यकीय शिक्षणासाठीची प्रवेश प्रक्रिया
6th February 2024

Career In Fashion Designing

विद्यार्थी पालक संवाद २०२३: वैद्यकीय शिक्षणासाठीची प्रवेश प्रक्रिया
1st January 2024

AI Trends 2024

विद्यार्थी पालक संवाद २०२३: वैद्यकीय शिक्षणासाठीची प्रवेश प्रक्रिया
27th December 2023

MPPSC Result 2019 Out

विद्यार्थी पालक संवाद २०२३: वैद्यकीय शिक्षणासाठीची प्रवेश प्रक्रिया
25th December 2023

Skill Development Courses 2024

विद्यार्थी पालक संवाद २०२३: वैद्यकीय शिक्षणासाठीची प्रवेश प्रक्रिया
25th December 2023

UPSC Free Coaching

विद्यार्थी पालक संवाद २०२३: वैद्यकीय शिक्षणासाठीची प्रवेश प्रक्रिया
23rd December 2023

Career Tips

विद्यार्थी पालक संवाद २०२३: वैद्यकीय शिक्षणासाठीची प्रवेश प्रक्रिया
14th December 2023

Career Tips

विद्यार्थी पालक संवाद २०२३: वैद्यकीय शिक्षणासाठीची प्रवेश प्रक्रिया
8th December 2023

Career Options for Arts Stream

विद्यार्थी पालक संवाद २०२३: वैद्यकीय शिक्षणासाठीची प्रवेश प्रक्रिया
28th November 2023

Career In Railways