Career Guidance

Career Guidance

विद्यार्थी पालक संवाद २०२३: बारावीनंतर निवडा कॉमर्स विद्यार्थ्यांसाठी करिअर पर्याय

PUBLISH DATE 11th July 2023

बारावी वाणिज्य शाखेतून शिक्षण पूर्ण केल्यानंतर बँकेतील नोकरी, सीए किंवा सीएस अशा हमखास पर्यायांची निवड केली जाते. परंतु, या क्षेत्रांव्यतिरिक्त कॉमर्स क्षेत्रातून बारावी झाल्यानंतर करिअरचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. जाणून घेऊया त्या हटके पर्यायांविषयी…

सीए (CA) :

बारावी कॉमर्समधून शिक्षण घेतल्यानंतर उमेदवार सीए कोर्स करू शकतात. देशभरात सीए उमेदवारांना मोठी मागणी आहे. सीएचे शिक्षण घेतल्यावर लाखो कोटींचे पॅकेज मिळते.

बी.कॉम, एम. कॉम, पीएचडी (B.Com, M.Com, PhD) :

जर तुम्हाला सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) म्हणून काम करण्याची इच्छा असेल तर, तुम्ही कोणत्याही चांगल्या विद्यापीठातून बी.कॉम, एम.कॉम आणि पुढे जाऊन पीएचडीचे शिक्षण घेऊन प्राध्यापक म्हणून काम करु शकता. यासाठी ७ किंवा ८ वर्षांचा कालावधी लागतो. याशिवाय एम.कॉम करून आणि सीटीईटी इत्यादी परीक्षा उत्तीर्ण होऊनही तुम्ही शिक्षक होऊ शकता.
 
बीबीए, एमबीए (BBA, MBA) :

बारावी कॉमर्समधून आपले शिक्षण पूर्ण केलेले विद्यार्थी चांगल्या कॉलेजमधून बीबीए आणि एमबीएही करू शकतात. IIM मध्ये MBA साठी CAT अर्ज लवकरच सुरू होणार आहेत. अशा परिस्थितीत विद्यार्थी ही परीक्षा देऊन आणि चांगले गुण मिळवून आयआयएममध्ये एमबीएमध्ये प्रवेश घेऊ शकतात. त्याच वेळी, या गुणांच्या आधारे, इतर अनेक कॉलेजांमध्येही विद्यार्थ्यांना प्रवेश देतात.
 
छायाचित्रण (Photography) :

बारावीत कमी मार्क्स असतील आणि फोटोग्राफीची आवड असेल तर विद्यार्थी फोटोग्राफी किंवा सिनेमॅटोग्राफीचा कोर्स करून उत्तम करिअर करू शकतात. कोर्स केल्यानंतर विद्यार्थी व्हिडिओग्राफी, मॉडेल फोटो शूट, मॅगझीन शूट्स आणि अ‍ॅड शूट्स अशा विविध क्षेत्रात करिअर घडवू शकतात.

फॅशन डिझायनिंग (Fashion Designing) :

बारावीत कमी गुण मिळवणारे विद्यार्थी फॅशन डिझायनिंगमध्ये करिअर करू शकतात. आजच्या युगात हा अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांना खूप मागणी आहे. हे विद्यार्थी कोणत्याही विद्यापीठातून किंवा संस्थेतून फॅशन डिझायनिंगचा कोर्स करू शकतात. याशिवाय, विद्यार्थी हा कोर्स NIFT मधूनही करू शकतात. कोर्स केल्यानंतर विद्यार्थ्यांचे प्लेसमेंटही सहज होते.
 
बँकिंग डिप्लोमा (Banking Diploma) :

बारावीनंतर बँकिंग डिप्लोमा करण्याचा पर्यायही खुला असतो.ज्या विद्यार्थ्यांना फायनान्स आणि संबंधित विषय आवडतात ते हा डिप्लोमा करू शकतात. बँकिंग पदविका (डिप्लोमा) अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना बँकिंग कायदा, बँकेची रचना, विदेशी व्यापार आणि परकीय चलन आणि बँक-ग्राहक संबंध असे विषय शिकवले जातात. हा अभ्यासक्रम १ वर्ष कालावधीचा आहे.

डिप्लोमा इन ई-कॉमर्स (Diploma in E-Commerce) :

आजच्या काळात ई-कॉमर्सचे क्षेत्र खूप विस्तृत झाले आहे. वाणिज्य शाखेत बारावी केलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा करिअरचा उत्तम पर्याय ठरू शकतो. हल्ली अनेक विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये ई-कॉमर्स किंवा ऑनलाइन विक्रीचे शॉर्ट टर्म आणि पदवी अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. या अभ्यासक्रमात ऑनलाइन विक्रीच्या सर्व पैलूंचा समावेश केलेला असतो शिवाय, ई-कॉमर्समध्ये वापरल्या जाणाऱ्या अनेक सॉफ्टवेअर्सचा अभ्यासही या कोर्सेसमध्ये घेतला जातो.

बी.कॉम इन कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन (B.Com in Computer Application) :

जर तुम्ही बारावीनंतर करिअरचा चांगला पर्याय शोधत असाल तर तुम्ही B.Com in Computer Application हा कोर्स करू शकता. हा कोर्स केल्यानंतर उमेदवारांना सहज नोकरी मिळू शकते. यासोबतच हा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या उमेदवारांना चांगले पॅकेजही मिळते.

डिप्लोमा इन टॅली ईआरपी (Diploma in Tally ERP) :

जगभरात व्यवसायासाठी मोठ्या प्रमाणावर वापरले जाणारे ‘टॅली’ हे सर्वात लोकप्रिय सॉफ्टवेअर आहे. तुम्हाला कॉमर्समध्ये बारावीनंतर अकाऊंट सेक्टरमध्ये नोकरी करायची असेल किंवा या क्षेत्रात पुढील शिक्षण घ्यायचे असेल, तर तुम्हाला टॅलीची सर्वाधिक गरज आहे. आजकाल अनेक संस्थांमध्ये ‘टॅली ईआरपी’ अभ्यासक्रम उपलब्ध असतो.
 
डिप्लोमा इन डिजीटल मार्केटिंग (Diploma in Digital Marketing) :

बारावी कॉमर्सनंतर तुम्ही Diploma in Digital Marketing या क्षेत्रातही करिअर करू शकता. यात एसइओ, कंटेंट रायटिंग, सोशल मीडिया, ईमेल मार्केटिंग, एफिलिएट मार्केटिंग, लीड जनरेशन, अ‍ॅनालिटिक्स, ब्रँड मॅनेजमेंट असे अनेक पर्याय उपलब्ध असतात.

डिप्लोमा इन मॅनेजमेंट (Diploma in Management) :

वाणिज्य शाखेतून बारावीनंतर तुम्ही मॅनेजमेंटचा डिप्लोमा करू शकता. Business Management ची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांना बारावीनंतर Diploma in Management हा पर्याय फायदेशीर ठरू शकतो. शिवाय, हॉटेल मॅनेजमेंट हाही करिअरचा एक उत्तम उपाय ठरू शकतो.

Related News

विद्यार्थी पालक संवाद २०२३: बारावीनंतर निवडा कॉमर्स विद्यार्थ्यांसाठी करिअर पर्याय
30th April 2024

While deciding the career

विद्यार्थी पालक संवाद २०२३: बारावीनंतर निवडा कॉमर्स विद्यार्थ्यांसाठी करिअर पर्याय
14th February 2024

UPSC Exam Preparation Tips

विद्यार्थी पालक संवाद २०२३: बारावीनंतर निवडा कॉमर्स विद्यार्थ्यांसाठी करिअर पर्याय
6th February 2024

Career In Fashion Designing

विद्यार्थी पालक संवाद २०२३: बारावीनंतर निवडा कॉमर्स विद्यार्थ्यांसाठी करिअर पर्याय
1st January 2024

AI Trends 2024

विद्यार्थी पालक संवाद २०२३: बारावीनंतर निवडा कॉमर्स विद्यार्थ्यांसाठी करिअर पर्याय
27th December 2023

MPPSC Result 2019 Out

विद्यार्थी पालक संवाद २०२३: बारावीनंतर निवडा कॉमर्स विद्यार्थ्यांसाठी करिअर पर्याय
25th December 2023

Skill Development Courses 2024

विद्यार्थी पालक संवाद २०२३: बारावीनंतर निवडा कॉमर्स विद्यार्थ्यांसाठी करिअर पर्याय
25th December 2023

UPSC Free Coaching

विद्यार्थी पालक संवाद २०२३: बारावीनंतर निवडा कॉमर्स विद्यार्थ्यांसाठी करिअर पर्याय
23rd December 2023

Career Tips

विद्यार्थी पालक संवाद २०२३: बारावीनंतर निवडा कॉमर्स विद्यार्थ्यांसाठी करिअर पर्याय
14th December 2023

Career Tips

विद्यार्थी पालक संवाद २०२३: बारावीनंतर निवडा कॉमर्स विद्यार्थ्यांसाठी करिअर पर्याय
8th December 2023

Career Options for Arts Stream

विद्यार्थी पालक संवाद २०२३: बारावीनंतर निवडा कॉमर्स विद्यार्थ्यांसाठी करिअर पर्याय
28th November 2023

Career In Railways