11th Admissions 2024-25

11th Admissions 2024-25

अकरावी प्रवेश प्रक्रिया २०२१: सामाईक प्रवेश परीक्षेचे स्वरुप जाहीर

PUBLISH DATE 25th June 2021

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळ परीक्षा परिषदेमार्फत आयोजित होणाऱ्याअकारावी सामाईक प्रवेश परीक्षेचे (CET) स्वरुप जाहीर झाले आहे. 

अकरावी प्रवेशासाठी होणारी परीक्षा पूर्णपणे ऐच्छिक असणार आहे. सामाईक प्रवेश परीक्षा ही राज्य मंडळाच्या दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारीत असणार आहे.

या परीक्षेच्या प्रश्न पत्रिकेत इंग्रजी, गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्र या विषयांवर प्रत्येकी २५ गुणांचे प्रश्न असतील. ही परीक्षा ऑफलाईन स्वरुपात घेण्यात येणार आहे. प्रश्नपत्रिकेचे स्वरुप हे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी (Multiple Choice Objective Type Question)स्वरुपाचे असणार आहे.

या सामाईक प्रवेश परीक्षेसाठी १०० गुणांची एकच प्रश्नपत्रिका असणार आहे. आणि परीक्षेचा कालावधी २ तासांचा असणार आहे. परीक्षा केंद्रांची यादी राज्य मंडळ/परीक्षा परिषदेमार्फत घोषित करण्यात येईल.

ही परीक्षा विद्यार्थ्यांसाठी पूर्णपणे ऐच्छिक असणार आहे. त्यामुळे दहावीचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांसाठी पोर्टलवर परीक्षेला बसायचे की नाही यासाठी पर्याय उपलब्ध करुन दिला जाणार आहे.

फीस भरावी लागणार का ?
दहावीची परीक्षा फी भरलेल्या विद्यार्थ्यांना अकरावी सामाईक परीक्षेसाठी कोणते शुल्क भरावे लागणार नाही. असे असले तरी CBSE, ISCE आणि सर्व आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळातील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क भरावे लागणार आहे.

कधी होणार परीक्षा ?
दहावीचा निकाल १५ जुलै दरम्यान लागण्याची शक्यता आहे. निकालानंतर २ आठवड्यात म्हणजे जुलै महिन्याच्या अखेरिस किंवा ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीस अकरावी CET परीक्षा होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षेची तयारी सुरु करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रवेश कसा मिळेल ?
सामाईक प्रवेश परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेता येईल. विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार प्रवेशात प्राधान्य मिळणार आहे. त्यानंतर उरलेल्या जागा या सामाईक प्रवेश परीक्षा न दिलेल्यांसाठी खुल्या असतील. त्या विद्यार्थ्यांना दहावीच्या मूल्यमापन पद्धतीनुसार मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार प्रवेश मिळेल.

११ वी CETचे नोटिफिकेशन वाचण्यासाठी इथे क्लिक करा

---------------------------------------------------------------------------------

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitraहा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.

 


Related News