Career Guidance

Career Guidance

विद्यार्थी पालक संवाद २०२३: ‘एचआर’चे ‘एआयएचआर’ विभागामध्ये रूपांतर करताना

PUBLISH DATE 6th September 2023

एचआर(मनुष्यबळ) क्षेत्रामध्ये करिअर करण्याचे नियोजन करत आहात का? किंवा सध्या तुम्ही ‘एचआर’ क्षेत्रामध्ये काम करत आहात का? ‘एचआर’ विभागातील कर्मचारी म्हणून काम अधिक चांगल्या प्रकारे करण्यासाठी हा लेख तुम्हाला नक्कीच मदत करेल. एम्प्लॉयी लाइफसायकलमध्ये खालील जबाबदारी असतात. आता चॅटजीपीटी प्रॉम्प्टचा उपयोग करून ही कामे पूर्वी लागणाऱ्या वेळेपेक्षा अर्ध्या वेळेत केली जाऊ शकतात.

अ) संस्थेचे ब्रँडींग

प्रत्येक संस्थेला बुद्धिमान कर्मचाऱ्यांना आकर्षित करण्यासाठी स्वत:च्या ब्रँडींगची आवश्यकता असते. बुद्धिमान कर्मचारी हीच यशाची गुरुकिल्ली आहे. चॅटजीपीटीच्या माध्यमातून एम्प्लॉयर ब्रँडींगकरिता आवश्यक असणाऱ्या विविध बाबींची यादी करण्यास मदत मिळू शकते. त्यामध्ये संस्थेकडून कर्मचाऱ्यांना देऊ करण्यात येणाऱ्या बाबींची परिपूर्ण व्याख्या करणे(एम्प्लॉयर व्हॅल्यू प्रोप्रोजिशन), विविध चॅनेल्सच्या माध्यमातून सातत्यपूर्ण ब्रँडींग करत राहणे, कर्मचाऱ्यांच्या यशोगाथा प्रसारित करणे, समाजमाध्यमांवर सक्रिय राहणे, कर्मचारी विकसनासाठी प्राधान्यक्रम निश्चित करणे इत्यादी गोष्टींचा समावेश होतो. आपल्या संस्थेच्या करिअर वेबपेजसाठी योग्य कंटेंट लिहिण्यासाठीही चॅटजीपीटीचा उपयोग होऊ शकतो.

ब) भरती

कंपनीच्या एखाद्या विभागासाठी आवश्यकतेनुसार पदाचा तपशील लिहिणे, त्या पदासाठी उमेदवारांना विचारण्याच्या प्रश्नांची यादी करणे, मुलाखतीसाठी त्या त्या क्षेत्राशी संबंधित प्रश्न शोधणे, मुलाखत झाल्यानंतर यशस्वी उमेदवाराला कन्फर्मेशन मेल लिहिणे अशी अनेक कामे तुम्ही चॅटजीपीटी प्रॉम्प्टच्या साहाय्याने करू शकता.

क) ऑनबोर्डिंग

नव्याने भारती झालेल्या कर्मचाऱ्याला स्वागताचा मेल पाठवणे, ऑनबोर्डिंग मॅन्युअलचा एक भाग असणारे एफएक्यू(सामान्य प्रश्न) डॉक्युमेंट तयार करणे, जागतिक स्तरावरील संस्थांच्या ऑनबोर्डिंग प्रक्रियेचा अभ्यास करून आपल्या संस्थेची ऑनबोर्डिंग प्रक्रिया निश्चित करणे, नव्याने ऑनबोर्ड झालेल्या कर्मचाऱ्यांचा अनुभव जाणून घेण्यासाठी तसेच संस्थेच्या विकासासाठी सर्वेक्षण करणे इत्यादी कामे चॅटजीपीटीच्या साहाय्याने करता येऊ शकतात. कर्मचाऱ्यांवर ऑनबोर्डिंग प्रक्रियेचा दीर्घकाळापर्यंत प्रभाव राहतो. कर्मचाऱ्यांनी आपले दायित्व आणि त्याचे निर्वहन यासंदर्भात जबाबदार राहण्यासाठी ऑनबोर्डिंग प्रक्रियेची अत्यंत महत्त्वाची भूमिका असते.

ड) रिटेंन्शन आणि एंगेजमेंट

एचआर विभागाच्या कामकाजाचे मूल्यमापन करण्यासाठी रिटेन्शन(संस्थेमध्ये कर्मचारी टिकून राहण्याचे प्रमाण) हा महत्त्वाचा मापदंड आहे. कर्मचाऱ्यांना आकर्षित करण्यासाठी विविध उपक्रम राबवणे, करिअर पाथ निश्चित करणे, कर्मचाऱ्यांना देण्यात येणारे वेतन आणि इतर बाबी यांचा आराखडा तयार करणे, सुट्टीशी संबंधित धोरण, मानधन देण्याचे धोरण, पारितोषिक आणि सन्मान या विषयांचे धोरण यांच्याशी संबंधित बेस्ट प्रॅक्टिसेस निश्चित करण्यासाठी चॅटजीपीटीचा उपयोग करण्यात येऊ शकतो. संस्थेमध्ये सातत्याने होणारे बदल खर्चीक असतात, त्यामुळे एक चांगला एचआर कर्मचारी रिटेन्शन आणि एंगेजमेंट प्रभावीपणे होईल याची दक्षता घेतो.

ई) कामाचे मूल्यमापन, प्रशिक्षण आणि विकसन

बहुतेक सर्व मॅनेजर त्यांच्या टीममधील सदस्यांचे ‘की परफॉर्मन्स इंडिकेटर’ (केपीआय) निश्चित करण्यासाठी प्रयत्नरत असतात. चॅटजीपीटीच्या साहाय्याने ‘केपीआय’चा आढावा घेऊ शकतो. आपले कामकाज अधिक चांगल्या पद्धतीने करण्यासाठी कोणते प्रशिक्षण आयोजित करणे गरजेचे आहे हे ‘केपीआय’च्या आधारे ठरविण्यासाठी लर्निंग अँड डेव्हलपमेंट टीमला चॅटजीपीटीचा उपयोग होतो. निश्चित केलेल्या ‘केपीआय’नुसार आपल्या कर्मचाऱ्यांना फायदेशीर ठरू शकणारी सर्वोत्तम पाच प्रशिक्षणे निश्चित करण्यासाठी चॅटजीपीटीच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या विश्लेषणाचा उपयोग होतो.

फ) कर्मचारी बाहेर पडणे

एखादा कर्मचारी संस्थेतून बाहेर पडताना त्याचे व्यवस्थापन योग्य प्रकारे करणे ही एम्प्लॉयर ब्रँडींगकरिता महत्त्वाची बाब आहे. कर्मचारी संस्थेतून बाहेर पडताना पूर्ण करण्याच्या बाबींची यादी करणे, बाहेर पडताना घेण्यात येणाऱ्या मुलाखतीची प्रश्नावली किंवा सर्वेक्षण तयार करणे, कर्मचारी संस्थेतून बाहेर पडल्याची अधिकृत घोषणा करणारा ईमेल लिहिणे इत्यादी कामे चॅटजीपीटीच्या माध्यमातून करता येऊ शकतात.

- अंकित भार्गव

 

-----------------------------------------------------------------------------------------

 

VidyarthiMitra.org

Admission Guidance 2022: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2022 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2022 | JoSSA 2022 | MHT-CET 2022 | MBA 2022 | Pharmacy 2022 | Polytechnic 2022

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.

 


Related News


विद्यार्थी पालक संवाद २०२३: ‘एचआर’चे ‘एआयएचआर’ विभागामध्ये रूपांतर करताना
27th June 2024

JoSAA Counselling 2024

विद्यार्थी पालक संवाद २०२३: ‘एचआर’चे ‘एआयएचआर’ विभागामध्ये रूपांतर करताना
15th June 2024

JoSAA Counselling 2024:

विद्यार्थी पालक संवाद २०२३: ‘एचआर’चे ‘एआयएचआर’ विभागामध्ये रूपांतर करताना
7th June 2024

Career Opportunity

विद्यार्थी पालक संवाद २०२३: ‘एचआर’चे ‘एआयएचआर’ विभागामध्ये रूपांतर करताना
30th April 2024

While deciding the career

विद्यार्थी पालक संवाद २०२३: ‘एचआर’चे ‘एआयएचआर’ विभागामध्ये रूपांतर करताना
14th February 2024

UPSC Exam Preparation Tips

विद्यार्थी पालक संवाद २०२३: ‘एचआर’चे ‘एआयएचआर’ विभागामध्ये रूपांतर करताना
6th February 2024

Career In Fashion Designing

विद्यार्थी पालक संवाद २०२३: ‘एचआर’चे ‘एआयएचआर’ विभागामध्ये रूपांतर करताना
1st January 2024

AI Trends 2024

विद्यार्थी पालक संवाद २०२३: ‘एचआर’चे ‘एआयएचआर’ विभागामध्ये रूपांतर करताना
27th December 2023

MPPSC Result 2019 Out

विद्यार्थी पालक संवाद २०२३: ‘एचआर’चे ‘एआयएचआर’ विभागामध्ये रूपांतर करताना
25th December 2023

Skill Development Courses 2024

विद्यार्थी पालक संवाद २०२३: ‘एचआर’चे ‘एआयएचआर’ विभागामध्ये रूपांतर करताना
25th December 2023

UPSC Free Coaching

विद्यार्थी पालक संवाद २०२३: ‘एचआर’चे ‘एआयएचआर’ विभागामध्ये रूपांतर करताना
23rd December 2023

Career Tips

विद्यार्थी पालक संवाद २०२३: ‘एचआर’चे ‘एआयएचआर’ विभागामध्ये रूपांतर करताना
14th December 2023

Career Tips

विद्यार्थी पालक संवाद २०२३: ‘एचआर’चे ‘एआयएचआर’ विभागामध्ये रूपांतर करताना
8th December 2023

Career Options for Arts Stream

विद्यार्थी पालक संवाद २०२३: ‘एचआर’चे ‘एआयएचआर’ विभागामध्ये रूपांतर करताना
28th November 2023

Career In Railways