11th Admissions 2024-25

11th Admissions 2024-25

अकरावी प्रवेश २०२०: कटऑफ मध्ये वाढ

PUBLISH DATE 17th August 2020

इयत्ता अकरावी प्रवेशासाठी महापालिका हद्दीतील महाविद्यालयांत ऑनलाइन केंद्रिभूत पद्धतीने प्रवेश दिले जाणार आहेत.

याकरिता नोंदणीप्रक्रिया सुरू असून, आतापर्यंत २९ हजार ८३२ उमेदवारांनी नोंदणी केली आहे. अर्जाचा भाग दोन भरण्याची प्रक्रिया सुरू होताच अवघ्या तीन दिवसांत नोंदणीकृत विद्यार्थ्यांपैकी १२ हजार ४८ विद्यार्थ्यांनी पर्याय निवडीची प्रक्रिया पूर्ण केली आहे. पहिल्या गुणवत्ता यादीकरिता पर्याय नोंदणीची मुदत शनिवार (ता. २२)पर्यंत असून, यंदाही विज्ञान शाखेतील प्रवेशाचा कट ऑफ नव्वद टक्क्यांहून अधिक राहणार आहे. 

११वी (FYJC) अॅडमीशन

  • मुंबई (MMRDA)
  • पुणे (पिंपरी चिंचवडसह)
  • नाशिक
  • औरंगाबाद
  • नागपूर

अमरावती विभागांतर्गत येणाऱ्या सर्व कॉलेजेस व कट-ऑफची व ओपनिंग क्लोसिंग रँक माहिती http://cutoff.vidyarthimitra.org/fyjc/ किंवा गुगल प्लेस्टोर अॅप https://bit.ly/2ZmcyYY लींक वर उपलब्ध आहे.

मार्कांवरून संभाव्य कॉलेजेसची व शाखांची अद्यावत माहिती केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या चालू वर्षातील सर्व कॅप राउंडचा कट-ऑफ उपलब्ध होईल.

दहावीचा निकाल उशिरा जाहीर झाल्‍याने इयत्ता अकरावी प्रवेशाच्‍या प्रक्रियेलादेखील विलंब झालेला आहे. त्‍यातच सध्याच्‍या कोरोना विषाणूच्‍या परिस्‍थितीत विद्यार्थी-पालकांनी महाविद्यालयात न जाता ऑनलाइन स्‍वरूपात बहुतांश प्रक्रिया राबविता येईल, अशी व्‍यवस्‍था शिक्षण विभागाने केली आहे. दरम्‍यान, नाशिक महापालिका हद्दीतील ६० महाविद्यालयांमध्ये २५ हजार २७० जागा उपलब्‍ध असून, याकरिता शुक्रवारी (ता. १४) सायंकाळपर्यंत २९ हजार ८३२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यापैकी २३ हजार २४५ विद्यार्थ्यांनी अर्ज पडताळणी प्रक्रिया पूर्ण केली आहे, तर १२ हजार ४८ विद्यार्थ्यांनी अर्जाचा भाग दोन भरला आहे. पहिल्‍या गुणवत्ता यादीसाठी शाखा, महाविद्यालय पसंतीचा पर्याय निवडीसाठी आणखी आठवडाभराची मुदत असल्‍याने विहीत मुदतीत अर्ज भरलेल्‍या विद्यार्थ्यांच्‍या संख्येत वाढ होणार आहे. यातून विज्ञान शाखेचा कट ऑफ नव्वद टक्क्यांमध्ये राहाणार असल्‍याचे स्‍पष्ट झाले आहे.  

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News