11th Admissions 2024-25

11th Admissions 2024-25

इ. ११ वी सीईटी अभ्यासक्रम, पॅटर्न व सराव परीक्षा

PUBLISH DATE 25th July 2021

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणारी अकरावी प्रवेश यंदा अकरावी प्रवेशासाठी प्रथमच प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे. CET परीक्षा २१ ऑगस्टला सकाळी ११ ते १ या वेळेत होणार असे जाहीर केले होते परंतु अकरावी सीईटी नाव नोंदणी वेबसाइट अद्याप बंदच असल्यामुळे ही परीक्षा पुढे ढकलली जाईल असे चित्र दिसत आहे. तथापी ११ वी CET मंडळाशी संलग्न ज्युनिअर कॉलेजांमध्ये होणार असून ऐच्छिक आहे. फक्त पहिल्या प्रवेश फेरी ज्या विद्यार्थ्यांना आपल्या पसंतीच्या ज्युनिअर कॉलेज प्रवेशा करिता असल्याचे मंडळाने स्पष्ट केले 

अशी होईल नोंदणी 

■ विद्यार्थी https://cet.11thadmission.org.in या वेबसाइटवरून अर्ज भरू शकणार आहेत. 

■ राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. 

■ सीबीएसई, आयसीएसई तसेच अन्य आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी १७८ रुपये इतके शुल्क आहे. 

अशी होईल परीक्षा 

■ ही परीक्षा इंग्रजी, गणित भाग १ आणि भाग २, विज्ञान आणि समाजशास्त्र या चार विषयांना प्रत्येकी २५ गुणांची म्हणजे १०० गुणांची परीक्षा घेण्यात येणार आहे. 

■ विद्यार्थ्यांना इंग्रजी, मराठी, गुजराती, कन्नड, उर्दू, सिंधी, तेलुगू, हिंदी या आठ माध्यमांपैकी एक किंवा दोन माध्यमातील प्रश्नांचा समावेश असलेली प्रश्नपत्रिका देण्यात येणार आहे. 

■ सेमी इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनासमाजशास्त्र विषयाचे प्रश्न त्यांना मराठी, गुजराती, कन्नड, उर्दू, सिंधी, तेलुगू, हिंदी या भाषांमध्ये विचारले जाणार आहे. 

ही परीक्षा बहुपर्यायी स्वरुपाने घेण्यात येईल. 

■ ओएमआर उत्तरपत्रिका असणार आहे. 

■ चारपैकी एका अचूक उत्तराला एकाच शाईच्या बॉलपेनचा वापर करून पूर्णपणे गडद करावा. 

■ खाडाखोड झालेला तसेच एकापेक्षा जास्त गोल रंगवलेला प्रश्न ग्राह्य धरला जाणार नाही. 

■ कच्चे काम करण्यासाठी प्रश्नपत्रिकेच्या एक कोरा कागद दिला जाणार आहे. 

■ परीक्षा झाल्यावर मंडळाच्या वेबसाइटवर अंतिम उत्तरसूची प्रसिद्ध केली जाणार आहे. 

अभ्यासक्रम 

11th-CET-syllabus

परीक्षेचे आयोजन 

■ परीक्षा ऑफलाइन पार पडेल. यामध्ये प्रत्येक जिल्हा, तालुका स्तरावर परीक्षा केंद्र देण्यात येणार आहे. 

■ परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांनी किमान १ तास आधी उपस्थित राहावे. 

■ परीक्षा केंद्रांवर आयोग्य विभागाच्या सर्व सूचनांचे पालन करणे बंधनकारक 

■ परीक्षेदरम्यान कोणताही गैरप्रकार दिसल्यास विद्यार्थी निर्धारित शिक्षेस पात्र राहील. 

■ परीक्षेचा अभ्यासक्रम मंडळाच्या वेबसाइटवर उपलब्ध करून दिला आहे. 

सराव परीक्षेची मुख्य वैशिष्टे : 

१) इ. ११ वी प्रवेश व तसेच मेडीकल व इंनजीनीयरींग प्रवेशासाठी संपूर्ण राज्यामध्ये ऑनलाईन सराव परीक्षा 

२) महाराष्ट्र बोर्ड, CBSE, ICSE च्या विद्यार्थ्यांकरिता मराठी व इंग्रजीमध्ये प्रश्नपत्रिका

३) तज्ञ व अनुभवी पेपर सेटर्स, डॉक्टर्स व शिक्षकांची टीम

४) प्रत्येक Chapter वरील MCQs चा भरपूर सराव

५) सहभागी शाळा व विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेचे संपूर्ण मार्गदर्शन

६) शैक्षणिक क्षेत्रातील विविध घडामोडी व संपूर्ण अद्यावत माहिती

सराव परीक्षा लिंक

----------------------------------------------------------------------------------

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitraहा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News