11th Admissions 2024-25

11th Admissions 2024-25

११ वी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया २६ जुलैपासून

PUBLISH DATE 16th July 2020

राज्यातील मुंबईसह प्रमुख शहरांमधील अकरावी प्रवेशांची अर्ज प्रक्रिया २६ जुलैपासून सुरू होणार आहे. अर्ज भरण्यासाठी १५ जुलैपासून संकेतस्थळ खुले होणार होते.

मात्र १५ जुलै रोजी शासनाने सुधारित वेळापत्रक जाहीर केले. यानुसार २६ जुलैपासून अर्ज भरण्यास सुरूवात होणार आहे. मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या महापालिका क्षेत्रात ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे..

शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचे संकेतस्थळ पुढीलप्रमाणे आहे -

https://mumbai.11thadmission.org.in

प्रवेश प्रक्रिया पुढील टप्प्यांनुसार होणार आहे -

१) ११ वी प्रवेशांसाठी ऑनलाइन नोंदणी करणे - २६ जुलै २०२० पासून

२) शाळांनी प्रवेश अर्जातील माहिती भाग - १ ऑनलाइन तपासून व्हेरिफाय करणे (आवश्यकता असल्यास विद्यार्थ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधणे) - २७ जुलै २०२० पासून

३) विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाचा भाग - २ (प्रवेशासाठी पसंतीक्रम) नोंदवणे व सबमीट करणे (नवीन अर्ज भाग - १ सुद्धा भरता येतील.) - दहावी निकाल जाहीर झाल्यानंतर ही तारीख घोषित होईल.

अकरावी ऑनलाइन प्रवेशांचे परिपत्रक

विद्यार्थ्यांसाठी मॉक डेमो

अकरावी प्रवेशांसाठी ऑनलाइन अर्ज कसे भरायचे याचा सराव विद्यार्थ्यांना करता येणार आहे. त्यासाठी तात्पुरते प्रारुप संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. १६ जुलै २०२० ते २४ जुलै २०२० पर्यंत केवळ सरावासाठी हे संकेतस्थळ तपासता येईल. प्रत्यक्ष अर्ज भरण्यासाठी नंतर मूळ वेबसाइटवर नव्याने नोंदणी करावी लागेल.

मुंबई महानगर क्षेत्रातील सर्व मंडळाच्या माध्यमिक शाळांनी विद्यार्थ्यांच्या प्रवेश अर्जातील भाग - १ मधील माहिती ऑनलाइन कागदपत्रांची पडताळणी करून प्रमाणित करावी तसेच ऑनलाइन कागदपत्रांची पडताळणी करून प्रमाणित करावे तसेच विद्यार्थी-पालकांना योग्य ते मार्गदर्शन करावे. विद्यार्थ्यांच्या प्रवेश अर्जातील भाग -१ मधील माहिती प्रमाणित करण्यासाठी शाळांनी मागीलवर्षीचेच लॉगइन आयडी आणि पासवर्ड वापरावेत. शाळास्तरावरून अर्ज अप्रूव्ह करण्याची कार्यवाहीसुद्धा ऑनलाइनच करायची आहे, असे विभागीय शिक्षण उपसंचालक राजेंद्र अहिरे यांनी सर्व मुख्याध्यापकांना या प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले आहे.

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

For all latest Govt Jobs 2019Railway JobsBank Jobs and SSC Jobs log on to https://goo.gl/YPjt94 We bring you fastest and relevant notifications on Bank, Railways and Govt Jobs. Stay Connected

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा


Related News