11th Admissions 2019-20

11th Admissions 2019-20

अकरावी प्रवेशाची आज विशेष फेरी

PUBLISH DATE 9th August 2019

पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील ज्युनिअर कॉलेजांमध्ये इयत्ता अकरावी प्रवेशासाठी अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत आज, शुक्रवारी (९ ऑगस्ट) विशेष फेरी राबविण्यात येणार आहे. या फेरीत नोंदणी केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना सहभागी होण्याची संधी मिळणार आहे, अशी माहिती अकरावी प्रवेश नियंत्रण समितीतर्फे अध्यक्ष मीनाक्षी राऊत यांनी गुरुवारी दिली.

या विद्यार्थ्यांना आज, शुक्रवारी आणि शनिवारी (१० ऑगस्ट) सकाळी ११ ते ५ या वेळेत ऑनलाइन प्रवेश अर्जाचा भाग एक आणि भाग दोन भरता येणार आहे. त्यानंतर १४ ऑगस्टला सायंकाळी पाचनंतर गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे. यादीतील विद्यार्थ्यांना १६ ते १९ ऑगस्ट दरम्यान कॉलेजांमध्ये जाऊन प्रवेश घ्यायचा आहे. दरम्यान, २० ऑगस्टपासून 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' (एफसीएफएस) ही विशेष फेरी राबविण्यात येणार आहे. या फेरीतील पहिल्या प्रकारात ८० टक्के आणि त्यापेक्षा अधिक गुण मिळवणारे विद्यार्थी, दुसऱ्या प्रकारात ६० टक्के आणि त्यापेक्षा अधिक गुण मिळवणारे विद्यार्थी आणि तिसऱ्या प्रकारात उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सहभागी होता येणार आहे. या फेरीत पहिल्या प्रकारातील विद्यार्थ्यांसाठी २० ऑगस्टला सायंकाळी पाचनंतर रिक्त जागा जाहीर करण्यात येईल. या विद्यार्थ्यांना २१ ऑगस्टला सकाळी १० ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत कॉलेज निवडण्याची संधी मिळेल. त्यानंतर २१ ते २२ ऑगस्ट दरम्यान प्रत्यक्ष कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश घ्यायचा आहे.

दुसऱ्या प्रकारातील विद्यार्थ्यांसाठी २२ ऑगस्टला सायंकाळी पाचनंतर रिक्त जागांचा तपशील जाहीर करण्यात येईल. २३ ऑगस्टला कॉलेज निवडण्याची संधी मिळणार आहे. त्यानंतर २३ ते २४ ऑगस्ट दरम्यान प्रत्यक्ष कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश घ्यायचा आहे. तिसऱ्या प्रकारातील विद्यार्थ्यांसाठी २४ ऑगस्टला सायंकाळी पाचनंतर रिक्त जागा जाहीर करण्यात येईल. या विद्यार्थ्यांना २६ ऑगस्टला सकाळी १० ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत कॉलेज निवडण्याची संधी मिळेल. त्यानंतर २६ ते २७ ऑगस्टला प्रत्यक्ष कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश घ्यायचा आहे.

...

तिसऱ्या फेरीत ८,५७० विद्यार्थ्यांना प्रवेश

तिसऱ्या फेरीत एकूण १५ हजार ८५१ विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर करण्यात आला असून, पैकी आठ हजार ५७० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ७ हजार १८० आहे. या फेरीत २४ विद्यार्थ्यांनी प्रवेश नाकारले आणि ७७ विद्यार्थ्यांनी प्रवेश रद्द केले आहेत, असे राऊत यांनी सांगितले.

११ वी कट ऑफ http://fyjc.vidyarthimitra.org/

बीई/ बीफार्म कट ऑफ http://vidyarthimitra.org/rank_predictor

Check Previous Year & Current Year Cut-offs on http://www.vidyarthimitra.org/rank_predictor

11th Admissions (FYJC) Cut-off App https://goo.gl/rT2vXd

 http://fyjc.vidyarthimitra.org/rankpredictor

For all latest Govt Jobs 2019Railway JobsBank Jobs and SSC Jobs log on to https://goo.gl/YPjt94 We bring you fastest and relevant notifications on Bank, Railways and Govt Jobs. Stay Connected

Image result for click here gif http://fyjc.vidyarthimitra.org

| Govt. & Private Jobs, Internships, Campus Drive, Off-campus & many more |

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा