खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) २५ टक्के राखीव जागांवर विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी पालकांना येत्या बुधवारपासून (ता.३) ऑनलाइन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे, अशी माहिती प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी दिली आहे.
आरटीईनुसार खासगी शाळांमध्ये प्रवेशस्तरावर २५ टक्के जागा आर्थिक दृष्ट्या दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्याची तरतुद आहे. या राखीव जागांवरील प्रवेशासाठी दरवर्षीप्रमाणे ऑनलाईन प्रक्रिया राबविण्यात येते. त्याचप्रमाणे यंदाही २०२१-२२ शैक्षणिक वर्षासाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. शिक्षण विभागातर्फे २५ टक्के जागा उपलब्ध असणाऱ्या शाळांना नोंदणीसाठी वारंवार मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र, गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा या प्रवेश प्रक्रियेतंर्गत शाळा नोंदणीसाठी कमी प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे.
यावर्षी प्रवेश प्रक्रियेतंर्गत आतापर्यंत राज्यातील नऊ हजार ४३१ शाळांनी नोंदणी केली असून प्रवेशासाठी केवळ ९६ हजार ८०१ जागा उपलब्ध झाल्या आहेत. पुणे जिल्ह्यातील ९८५ शाळांनी नोंदणी पूर्ण केली असून त्यातील १४ हजार ७४१ जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
दरम्यान सर्व जिल्ह्यातील शाळांची ऑनलाइन नोंदणी पूर्ण होणे आवश्यक असल्याचे जगताप यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे. या प्रवेश प्रक्रियेतंर्गत ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा येत्या बुधवारपासून उपलब्ध होणार आहे. पालकांना २१ मार्चपर्यंत हे ऑनलाइन अर्ज भरता येतील, असेही जगताप यांनी सांगितले आहे.
-------------------------------------------------------------------------------------------------------
Akhil Bharatiya Vidyarthi Parishad, Kolhapur
And VidyarthiMitra.Org
Organise
"Exam Warriors" - Practice Exam 2021 based on the new syllabus.
Akhil Bharatiya Vidyarthi Parishad, Kolhapur and Vidyarthi Mitra (www.VidyarthiMitra.org) are jointly conducting practice exams for 10th and 12th class students as per the new syllabus of the board.
This exam will be held in your school and college. Registration for participation should be done by following the link below.
Registration and participation is free and students can check their level of study and model answer sheets will also be given to the students through this practice test.
Registration link: https://vidyarthimitra.org/abvpsarhttps://app.bitly.com/bbt2/#avpaper
Vidyarthi Mitra App link https://bit.ly/2ZmcyYY
Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play
Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance |
Call 77200 25900 or 77200 81400
11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |
We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.
RTE Admission : आरटीई प्रवेशासाठी पाच दिवस मुदतवाढ
आरटीई प्रवेशाला आजपासून सुरवात
RTE Admissions 2024 खासगी शाळांना 'आरटीई'तून सूट नाही
आरटीई प्रवेश प्रक्रिया २०२३ : प्रवेशासाठी आज शेवटची संधी
आरटीई प्रवेश प्रक्रिया २०२३: पालकांसाठी सूचना
आरटीई प्रवेश प्रक्रिया २०२३: प्रवेशासाठी २५ एप्रिलपर्यंतची मुदत
आरटीई प्रवेश प्रक्रिया २०२३: ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू
आरटीई प्रवेश प्रक्रिया २०२२: आरटीईच्या दोन हजार जागा रिक्त
आरटीई प्रवेश प्रक्रिया २०२२-२३: प्रवेशासाठी मुदतवाढ
आरटीई प्रवेश प्रक्रिया २०२२: राखीव प्रवेशांची सोडत लवकरच
आरटीई प्रवेश प्रक्रिया २०२२: प्रवेशांची सोडत लवकरच
आरटीई प्रवेशासाठी कमाल वयोमर्यादा निश्चित
आरटीई प्रवेश प्रक्रिया २०२२-२३: जाणून घ्या नवीन नियमावली
आरटीई प्रवेश प्रक्रिया २०२१-२२: असा करा ऑनलाइन अर्ज
आरटीई प्रवेश २०२०: प्रतीक्षा यादीतील प्रवेशासाठी मुदतवाढ
आरटीई राखीव जागा प्रवेश २०२०: २३ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
आरटीई राखीव जागा प्रवेश: १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
आरटीई राखीव जागा प्रवेश: ३१ ऑगस्टपर्यंत अंतिम मुदत
आरटीई चे प्रवेश आता तारखेनुसार होणार २०२०
आरटीईनुसार २५ टक्के राखीव जागांसाठी प्रवेश लवकरच होणार सुरू
आरटीई प्रवेशासाठीची पहिली सोडत जाहीर २०२०
‘आरटीई’ प्रवेशासाठी ८७ मदत केंद्रे सुरू
आरटीई प्रवेश नोंदणीसाठी दोन दिवसांची मुदतवाढ
आरटीई प्रवेशासाठी संभाव्य वेळापत्रक जाहीर २०२०
आरटीई चौथ्या फेरीतील प्रवेश आजपासून