मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आरटीई कायद्यांतर्गत खासगी शाळांतील राखीव जागांवरील प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला असून, ऑनलाइन लॉटरीतील विद्यार्थी निवड यादीही शिक्षण विभागाकडून जाहीर करण्यात आली आहे.
त्यानुसार जिल्ह्यातील २ हजार ६६१ जागांसाठी शंभर टक्के निवड झाली असून दोन हजार १००विद्यार्थ्यांची प्रतीक्षा यादीत निवड झाली आहे. मंगळवारपासून (ता.२३) प्रत्यक्ष प्रवेश निश्चितीस सुरवात होणार असून, ३१ जुलै प्रवेशाची डेडलाइन असणार आहे.
२०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी आरटीई कायद्यांतर्गत जिल्ह्यातील २३२ शाळांमध्ये मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांना २५ टक्के मोफत प्रवेश दिला जात आहे. २ हजार ६६१ जागांसाठी ८ हजार ५०० पालकांचे अर्ज दाखल केले आहेत.
जागांच्या तुलनेत अर्ज जास्त असल्याने लॉटरीकडे पालकांचे लक्ष लागले होते. त्यातच राज्यातील काही खासगी शाळांनी न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल केल्याने लॉटरी जाहीर होऊन निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली नव्हती.
अखेर जुन्या पद्धतीने इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रवेशाचे आदेश उच्च न्यायालयाने दिल्यानंतरच पुन्हा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. लॉटरीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना सोमवारी (दि. २२) एसएमएसद्वारे प्रवेशाची माहिती उपलब्ध झाली आहे.
पात्र बालकाच्या पालकांनी अर्ज भरताना जी कागदपत्रे नोंदवली आहेत. त्या सर्व कागदपत्रांच्या मूळ व साक्षांकित प्रत, अलॉटमेंट लेटरची प्रत, हमीपत्रासह पडताळणी समितीकडे जाऊन २३ ते ३१ जुलै या कालावधीत प्रवेश निश्चित करावा लागणार आहे.
दरम्यान, निवड यादीतील प्रवेश पात्र बालकांच्या पालकांना त्यांच्या मोबाइलवर एसएमएस प्राप्त झाले आहेत. मात्र, पालकांनी फक्त एसएमएसवर अवलंबून न राहता आरटीई पोर्टलवरील ''अर्जाची स्थिती'' या टॅबवर आपला अर्ज क्रमांक लिहून लॉटरी लागली अथवा नाही याची खात्री करण्याचे आवाहन प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून करण्यात आले आहे.
तालुकास्तरावर पडताळणी समिती
आरटीई २५ टक्के प्रवेश मिळाल्याचा एसएमएस प्राप्त झालेल्या पालकांसाठी कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी तालुकास्तरावर समितीची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे पालकांनी विनाविलंब २३ ते ३१ जुलैपर्यंत संबंधित तालुकास्तरावरील पडताळणी समितीकडे कागदपत्रांची पडताळणी करावी. पडताळणी समितीमार्फत आपल्या बालकांचा प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) डॉ. सविता बिरगे यांनी केले आहे.
------------------------------------------------------------------------------------
Admission Guidance 2024: WhatsApp https://wa.me/917720025900
Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play
Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance |
Call 77200 25900 or 77200 81400
11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2024 |
We bring you the fastest and most relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Get free Educational & jobs alerts on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव>
RTE Admission : आरटीई प्रवेशासाठी पाच दिवस मुदतवाढ
RTE Admissions 2024 खासगी शाळांना 'आरटीई'तून सूट नाही
आरटीई प्रवेश प्रक्रिया २०२३ : प्रवेशासाठी आज शेवटची संधी
आरटीई प्रवेश प्रक्रिया २०२३: पालकांसाठी सूचना
आरटीई प्रवेश प्रक्रिया २०२३: प्रवेशासाठी २५ एप्रिलपर्यंतची मुदत
आरटीई प्रवेश प्रक्रिया २०२३: ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू
आरटीई प्रवेश प्रक्रिया २०२२: आरटीईच्या दोन हजार जागा रिक्त
आरटीई प्रवेश प्रक्रिया २०२२-२३: प्रवेशासाठी मुदतवाढ
आरटीई प्रवेश प्रक्रिया २०२२: राखीव प्रवेशांची सोडत लवकरच
आरटीई प्रवेश प्रक्रिया २०२२: प्रवेशांची सोडत लवकरच
आरटीई प्रवेशासाठी कमाल वयोमर्यादा निश्चित
आरटीई प्रवेश प्रक्रिया २०२२-२३: जाणून घ्या नवीन नियमावली
आरटीई प्रवेश प्रक्रिया २०२१-२२: असा करा ऑनलाइन अर्ज
आरटीई प्रवेश प्रक्रिया २०२१-२२: ऑनलाइन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध
आरटीई प्रवेश २०२०: प्रतीक्षा यादीतील प्रवेशासाठी मुदतवाढ
आरटीई राखीव जागा प्रवेश २०२०: २३ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
आरटीई राखीव जागा प्रवेश: १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
आरटीई राखीव जागा प्रवेश: ३१ ऑगस्टपर्यंत अंतिम मुदत
आरटीई चे प्रवेश आता तारखेनुसार होणार २०२०
आरटीईनुसार २५ टक्के राखीव जागांसाठी प्रवेश लवकरच होणार सुरू
आरटीई प्रवेशासाठीची पहिली सोडत जाहीर २०२०
‘आरटीई’ प्रवेशासाठी ८७ मदत केंद्रे सुरू
आरटीई प्रवेश नोंदणीसाठी दोन दिवसांची मुदतवाढ
आरटीई प्रवेशासाठी संभाव्य वेळापत्रक जाहीर २०२०
आरटीई चौथ्या फेरीतील प्रवेश आजपासून