RTE Admissions

RTE Admissions

आरटीई राखीव जागा प्रवेश: १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

PUBLISH DATE 1st September 2020

शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी राखीव असलेल्या २५ टक्के जागांवर राज्यभरातून आतापर्यंत केवळ ५२.७१ टक्के प्रवेश निश्चित झाले आहेत.

त्यामुळे या प्रवेश प्रक्रियेला आता १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

दरम्यान, यापूर्वी प्रवेशासाठी सोमवारपर्यंत मुदत दिली होती. शैक्षणिक वर्ष २०२०-२१ च्या आरटीई २५ टक्के राखीव जागांवरील ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत सोडतीत (लॉटरी) निवडलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी आता १५ सप्टेंबरपर्यंत अंतिम मुदत असणार आहे. या प्रवेश राज्यात १७ मार्चला सोडत काढण्यात आली होती. मात्र त्यानंतर कोरोनाच्या संकटामुळे राज्यासह संपूर्ण राज्यात लॉकडाउन जाहीर झाला. परिणामी या प्रवेश प्रक्रिया काही महिन्यांसाठी स्थगिती करण्यात आली होती. आता ही प्रवेश प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली आहे. या प्रवेशासाठी ३१ ऑगस्टपर्यंत अंतिम मुदत होती. परंतु या मुदतीत केवळ ५२ टक्क्यांच्या आसपास प्रवेश झाले आहेत. त्यामुळे प्राथमिक शिक्षण विभागाने प्रवेशासाठी मुदतवाढ दिली आहे.

आरटीई प्रवेश प्रक्रिया २०२०-२१ करिता सोडतीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश दिलेल्या मुदतीत शाळेत जाऊन निश्चित करायचा आहे, अशी माहिती प्राथमिक शिक्षण विभागाने दिली आहे.

पालकांसाठी सूचना :
- सोडतीद्वारे निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी पालकांनी केवळ मेसेजवर अवलंबून न राहता पोर्टल अर्ज क्रमांक टाकून प्रवेशाची तारीख पहावी.
- शाळेत प्रवेशासाठी गर्दी करू नये. प्रवेशासाठी मुलांना आपल्या बरोबर नेऊ नये.
- प्रवेशासाठी लागणाऱ्या कागदपत्रांच्या मूळ प्रती आणि छायांकित प्रती सोबत न्याव्यात.
- प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी पालकांनी शाळेत जाऊ नये. त्याबाबत स्वतंत्र सूचना पोर्टलवर देण्यात येईल.

आरटीई २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाची (आतापर्यंतची काही जिल्ह्यातील) आकडेवारी :-*

  1. - जिल्हा : आरटीई शाळा : २५ टक्के राखीव जागा : आलेले अर्ज : पहिल्या सोडतीत निवडलेले अर्ज : निश्चित झालेल्या प्रवेशाची संख्या
  2. - पुणे : ९७२ : १६,९४९ : ६२,९१९ : १६,६१७ : ७८०८
  3. - कोल्हापुर : ३४५ : ३,४९१ : २,९९६ : २,३८८ : १,४२२
  4. - नाशिक : ४४७ : ५,५५७ : १७,६३० : ५, ३०७ : ३३८६
  5. - नागपुर : ६८० : ६,७८४ : ३१,०४४ : ६,६८५ : ३०८०
  6. - ठाणे : ६६९ : १२,९२९ : २०,३४० : ९, ३२६ : २,५६२
  7. - नगर : ३९६ : ३,५४१ : ७,०६५ : ३,३८२ : २२२५
  8. - सातारा : २३६ : २,१३१ : ३,१०५ : १,८७५ :१,४२२
  9. - सोलापुर : ३२९ : २,७६४ :५,९८५ : २,३६२ : १,४५९

 

 

विनामूल्य आयोजन ऑनलाईन मॉक एमएचटी-सीईटी, नीट २०२०

नोंदणी येथे http: //www.vidyarthimitra.org/abvpmockexam

WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News