बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण अधिनियमाअंतर्गत (आरटीई) खासगी शाळांमध्ये प्रवेशासाठीची ऑनलाईन अर्ज करण्याच्या प्रक्रियेचा श्रीगणेशा झाला.
ता. १७ मार्च राेजी रात्री १२ वाजतापर्यंत अर्ज करता येणाार आहे. आरटीईअंतर्गत अकोला जिल्ह्यात एक हजार ९४६ जागा राखीव असून, १९० शाळांनी नोंदणी केली केली आहे.
बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेशस्तरावर २५ टक्के जागा वंचित व दुर्बल घटकातील मुला, मुलींसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे. त्यानुसार सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात आरटीईअंतर्गत प्रवेश मिळण्यासाठीची प्रक्रिया सुरू झाली आहे.
प्रथम शाळांची नाेंदणी आणि आता ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया ता. १ मार्चपासून सुरू झाली आहे. नोंदणीच्या शेवटच्या दिवसापर्यंत १९० शाळांनी नोंदणी केली. संबंधित शाळांमधील एक हजार ९४६ जागा आरटीईअंतर्गत प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्या वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
चुकीच्या माहितीसाठी पालक जबाबदार
आरटीई अंतर्गत पाल्याचा अर्ज करताना पालकांना हमीपत्रही भरून द्यावे लागणार आहे. त्यानुसार पाल्याची चुकीची माहिती सादर करण्यासाठी पालकांनाच जबाबदार धरले जाणार आहे.
‘आरटीई पाेर्टलवर भरलेली माहिती बराेबर आहे, भविष्यात अथावा पडताळणी समितीने कागदपत्रांची व पाेर्टलवरील माहिती पडताळणी केल्यास व चुकीची कागदपत्रे सादर केल्याचे निदर्शनास आल्यास माझ्या पाल्यांचा प्रवेश रद्द हाेईल, माझ्यावर फाजैदारी कारवाई हाेईल, किंवा प्रतिपूर्तीची रक्कम शासनाकडून मिळणार नाही,
मला शाळेची फी भरणे बंधनकारक राहील, मला शिक्षा हाेईल, याची मला जाणीव आहे.’, असे हमी पत्रात नमूद आहे. त्यामुळे पाल्याच्या आरटीई प्रवेशाच्या वेळी पालकांनी योग्य ती कागदपत्रेच अपलोड करावी, असे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.
प्रवेशासाठी हवी असलेली कागदपत्रे
बालकांचे आधार कार्ड
रहिवासी पुरावा
जन्मतारखेचा पुरावा
शिक्षणहक्क कायद्यांतर्गत (आरटीई) खासगी प्राथमिक शाळांमध्ये राखीव असणाऱ्या २५ टक्के जागांवर आर्थिक दुर्बल आणि वंचित घटकांमधील मुलांना प्रवेश मिळण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या प्रक्रियेत, शाळांची नोंदणी प्रक्रीया झाल्यानंतर पुढील वेळापत्रकांची लागलेली प्रतिक्षा संपली असून, वेळापत्रक जाहीर झाले आहे.
या अंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२३- २०२४ या वर्षासाठी पालकांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. १ ते १७ मार्चपर्यंत पालकांना आररटीई पोर्टलवर ऑनलाइन अर्जाची मुदत आहे. एकापेक्षा जास्त अर्ज भरल्यास एकही अर्ज लॉटरीसाठी ग्राह्य धरला जाणार नाही.
आरटीई अंतर्गत २५ टक्के आर्थिक दुर्बल आणि वंचित घटकांमधील मुलांना प्रवेशासाठी राखीव असतात. गतवर्षी डिसेंबर महिन्यातचं आरटीई प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर झाले होते. जानेवारी महिन्यात शाळांची नोंदणी होऊन फेब्रुवारीत प्रवेश प्रक्रीया वेळापत्रक जाहीर झालेले होते.
यंदा जानेवारीत प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर होऊन फेब्रुवारीत शाळांची नोंदणी झालेली आहे. या प्रक्रियेस २३ जानेवारीपासून सुरवात झाली. त्यासाठी ३ फेब्रुवारीची मुदत १० फेब्रुवारीपर्यंत वाढविण्यात आली होती.
यात ४०१ शाळांची नोंदणी झालेली आहे. गतवर्षी नाशिक जिल्ह्यातील ४२२ शाळांनी आरटीई अंतर्गत प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभाग घेतला होता. यंदाची प्रवेश प्रक्रिया साधारण २० फेब्रुवारीपासून सुरू होणार होती.
मात्र, सरकारी लाभांच्या योजनांसाठी आधार कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक रखडले होते अशी चर्चा होती. अखेर, वेळापत्रक जाहीर होऊन मंगळवारपासून (ता.१) अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला आहे. १७ मार्चपर्यंत अर्ज दाखल करण्यासाठी मुदत देण्यात आलेली आहे.
--------------------------------------------------------------------------------------
Admission Guidance 2022: WhatsApp https://wa.me/917720025900
Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play
Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance |
Call 77200 25900 or 77200 81400
11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2022 |
We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.
RTE Admission : आरटीई प्रवेशासाठी पाच दिवस मुदतवाढ
आरटीई प्रवेशाला आजपासून सुरवात
RTE Admissions 2024 खासगी शाळांना 'आरटीई'तून सूट नाही
आरटीई प्रवेश प्रक्रिया २०२३ : प्रवेशासाठी आज शेवटची संधी
आरटीई प्रवेश प्रक्रिया २०२३: पालकांसाठी सूचना
आरटीई प्रवेश प्रक्रिया २०२३: प्रवेशासाठी २५ एप्रिलपर्यंतची मुदत
आरटीई प्रवेश प्रक्रिया २०२२: आरटीईच्या दोन हजार जागा रिक्त
आरटीई प्रवेश प्रक्रिया २०२२-२३: प्रवेशासाठी मुदतवाढ
आरटीई प्रवेश प्रक्रिया २०२२: राखीव प्रवेशांची सोडत लवकरच
आरटीई प्रवेश प्रक्रिया २०२२: प्रवेशांची सोडत लवकरच
आरटीई प्रवेशासाठी कमाल वयोमर्यादा निश्चित
आरटीई प्रवेश प्रक्रिया २०२२-२३: जाणून घ्या नवीन नियमावली
आरटीई प्रवेश प्रक्रिया २०२१-२२: असा करा ऑनलाइन अर्ज
आरटीई प्रवेश प्रक्रिया २०२१-२२: ऑनलाइन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध
आरटीई प्रवेश २०२०: प्रतीक्षा यादीतील प्रवेशासाठी मुदतवाढ
आरटीई राखीव जागा प्रवेश २०२०: २३ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
आरटीई राखीव जागा प्रवेश: १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
आरटीई राखीव जागा प्रवेश: ३१ ऑगस्टपर्यंत अंतिम मुदत
आरटीई चे प्रवेश आता तारखेनुसार होणार २०२०
आरटीईनुसार २५ टक्के राखीव जागांसाठी प्रवेश लवकरच होणार सुरू
आरटीई प्रवेशासाठीची पहिली सोडत जाहीर २०२०
‘आरटीई’ प्रवेशासाठी ८७ मदत केंद्रे सुरू
आरटीई प्रवेश नोंदणीसाठी दोन दिवसांची मुदतवाढ
आरटीई प्रवेशासाठी संभाव्य वेळापत्रक जाहीर २०२०
आरटीई चौथ्या फेरीतील प्रवेश आजपासून