शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) २५ टक्के राखीव जागांवर राबविण्यात येणाऱ्या ऑनलाइन प्रवेशाच्या शेवटच्या दिवसापर्यंत राज्यातील जवळपास ६४ हजार २५५ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत.
मात्र अद्यापही राज्यातील जवळपास ५० हजारांच्या आसपास जागा रिक्त आहेत. आता या प्रक्रियेतंर्गत प्रवेशासाठी पुन्हा मुदतवाढ देण्यात येणार नसल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. तसेच प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांसाठी सप्टेंबर अखेरीस प्रवेश प्रक्रिया राबविली जाईल, अशी माहिती प्राथमिक शिक्षण विभागाचे सहसंचालक दिनकर टेमकर यांनी दिली आहे.
राज्यातील नऊ हजार ३३१ शाळांमधील जवळपास एक लाख १५ हजार ४६० जागांवरील प्रवेशासाठी सुमारे दोन लाख ९१ हजार ३६८ विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता. त्यातील एक लाख ९२६ विद्यार्थ्यांना पहिल्या सोडतीत प्रवेश देण्यात आला होता. त्यातील जवळपास ५८ हजार ४०७ विद्यार्थ्यांचे प्रोव्हिजनल प्रवेश घेतले आहेत. तर ६४ हजार २५५ विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश निश्चित केले आहेत. प्रवेशाच्या अंतिम मुदतीपर्यंत झालेले प्रवेश पोर्टलवर नोंदविण्याचे कामकाज अद्याप सुरू आहे. त्यामुळे प्रवेश निश्चित झालेल्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या उपलब्ध होण्यासाठी आणखी काही तास प्रतीक्षा करावी लागणार आहे.
पहिल्या सोडतीतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचे कार्यालयीन कामकाज सध्या सुरू आहे. त्यानंतर प्रतीक्षा यादितील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी पावले उचलली जाणार आहेत. या यादीतील विद्यार्थ्यांच्या पालकांनी प्रवेशासाठी शाळांबाहेर गर्दी करू नये. यासंदर्भात स्वतंत्र सूचना आरटीई पोर्टलवर देण्यात येणार आहे. साधारणत: प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी सप्टेंबरच्या अखेरपर्यंत सूचना दिल्या जातील, असेही टेमकर यांनी स्पष्ट केले.
पुणे जिल्ह्यातील ९७२ शाळांमधील १६ हजार ९४९ जागांवर आतापर्यंत १० हजार ४१९ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत.
आरटीई २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाची (मंगळवारी सायंकाळपर्यंत) आकडेवारी :
-*जिल्हा : आरटीई शाळा : २५ टक्के राखीव जागा : आलेले अर्ज : पहिल्या सोडतीत निवडलेले अर्ज : प्रोव्हिजनल प्रवेश : निश्चित झालेल्या प्रवेशाची संख्या
- *पुणे : ९७२ : १६,९४९ : ६२,९१९ : १६,६१७ : १०,२०६ : १०,४१९
-*नाशिक : ४४७ : ५,५५७ : १७,६३० : ५, ३०७ : २,९९७ : ३,५१८
-*नागपुर : ६८० : ६,७८४ : ३१,०४४ : ६,६८५ : ४,७१४ : ३,९२२
-*ठाणे : ६६९ : १२,९२९ : २०,३४० : ९, ३२६ : ३,८७७ : ४,५८२
-* नगर : ३९६ : ३,५४१ : ७,०६५ : ३,३८२ : २,११३ : २,३३०
- *सातारा : २३६ : २,१३१ : ३,१०५ : १,८७५ :१,४७० : १,४४९
- *सोलापुर : ३२९ : २,७६४ :५,९८५ : २,३६२ : १,७९३ : १,७०९
विनामूल्य आयोजन ऑनलाईन मॉक एमएचटी-सीईटी २०२०
नोंदणी येथे https: //www.vidyarthimitra.org/abvpmockexam
WhatsApp https://wa.me/917720025900
Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play
Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance |
Call 77200 25900 or 77200 81400
11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |
We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.
RTE Admission : आरटीई प्रवेशासाठी पाच दिवस मुदतवाढ
आरटीई प्रवेशाला आजपासून सुरवात
RTE Admissions 2024 खासगी शाळांना 'आरटीई'तून सूट नाही
आरटीई प्रवेश प्रक्रिया २०२३ : प्रवेशासाठी आज शेवटची संधी
आरटीई प्रवेश प्रक्रिया २०२३: पालकांसाठी सूचना
आरटीई प्रवेश प्रक्रिया २०२३: प्रवेशासाठी २५ एप्रिलपर्यंतची मुदत
आरटीई प्रवेश प्रक्रिया २०२३: ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू
आरटीई प्रवेश प्रक्रिया २०२२: आरटीईच्या दोन हजार जागा रिक्त
आरटीई प्रवेश प्रक्रिया २०२२-२३: प्रवेशासाठी मुदतवाढ
आरटीई प्रवेश प्रक्रिया २०२२: राखीव प्रवेशांची सोडत लवकरच
आरटीई प्रवेश प्रक्रिया २०२२: प्रवेशांची सोडत लवकरच
आरटीई प्रवेशासाठी कमाल वयोमर्यादा निश्चित
आरटीई प्रवेश प्रक्रिया २०२२-२३: जाणून घ्या नवीन नियमावली
आरटीई प्रवेश प्रक्रिया २०२१-२२: असा करा ऑनलाइन अर्ज
आरटीई प्रवेश प्रक्रिया २०२१-२२: ऑनलाइन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध
आरटीई प्रवेश २०२०: प्रतीक्षा यादीतील प्रवेशासाठी मुदतवाढ
आरटीई राखीव जागा प्रवेश २०२०: २३ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
आरटीई राखीव जागा प्रवेश: १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
आरटीई राखीव जागा प्रवेश: ३१ ऑगस्टपर्यंत अंतिम मुदत
आरटीई चे प्रवेश आता तारखेनुसार होणार २०२०
आरटीईनुसार २५ टक्के राखीव जागांसाठी प्रवेश लवकरच होणार सुरू
आरटीई प्रवेशासाठीची पहिली सोडत जाहीर २०२०
‘आरटीई’ प्रवेशासाठी ८७ मदत केंद्रे सुरू
आरटीई प्रवेश नोंदणीसाठी दोन दिवसांची मुदतवाढ
आरटीई प्रवेशासाठी संभाव्य वेळापत्रक जाहीर २०२०
आरटीई चौथ्या फेरीतील प्रवेश आजपासून