शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी सोडतीत (लॉटरी) राज्यातील ९४ हजार ७०० विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
या बालकांच्या प्रवेशासाठी पालकांना बुधवारी दुपारी चार वाजल्यापासून एसएमएस जाण्यास सुरुवात झाली आहे. निवड यादीतील बालकांच्या प्रवेशासाठी पडताळणी समितीकडे जाऊन प्रवेश घेण्यासाठी १३ ते २५ एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
प्राथमिक शिक्षण विभागातर्फे मागील बुधवारी आरटीईनुसार २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाची ऑनलाइन सोडत काढण्यात आली. त्यानुसार २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी काढलेल्या सोडतीत निवड झालेल्या बालकांची यादी आणि प्रतीक्षा यादी पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. राज्यातील आठ हजार ८२३ शाळांमधील एक लाख एक हजार ८४६ जागांसाठी तब्बल तीन लाख ६४ हजार ४१३ अर्ज आले होते. या अर्जांतून सोडतीद्वारे प्रवेशासाठी निवड करण्यात आली आहे. प्रवेशास पात्र बालकांच्या पालकांनी पडताळणी समितीकडे जाऊन दिलेल्या मुदतीत प्रवेश ऑनलाइन निश्चित करून त्याची पावती समितीकडून घेणे आवश्यक आहे.
पोर्टलवर ऑनलाइन प्रवेश अर्जांची स्थिती पाहत असताना सर्व्हरच्या क्षमतेपलीकडे जाऊन पोर्टल ‘स्लो’ होऊ शकते. त्यामुळे पालकांनी संभ्रमात न पडता काही वेळाने पुन्हा प्रयत्न करावा, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे. निवडयादीतील बालकांच्या पालकांना प्रवेशाबाबत मोबाईलवर एसएमएस येतील. परंतु पालकांनी फक्त ‘एसएमएस’वर अवलंबून न राहता आरटीई पोर्टलवरील अर्जांची स्थिती या टॅबवर आपला अर्ज क्रमांक लिहून निवडयादीत नाव आहे की नाही, याची खात्री करून घ्यावी. विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी दिलेली मुदत संपल्यानंतरच प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना अनुक्रमे ‘एसएमएस’ पाठवले जातील, असे शिक्षण विभागातर्फे सांगण्यात आले आहे.
पालकांसाठी सूचना
- निवड यादीतील प्रवेश पात्र बालकाच्या प्रवेशासाठी अर्ज भरताना नोंदविलेल्या सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रती आणि साक्षांकित प्रती घेऊन पडताळणी समितीकडे जावे
- ॲलॉटमेंट लेटरची प्रिंट त्यांच्या लॉग-इनमधून किंवा पडताळणी समितीकडे जाऊन काढून घ्यावी
- आरटीई पोर्टलवर असलेली हमीपत्राची प्रिंटदेखील घेऊन जावी
प्रवेश दृष्टिक्षेपात...
‘आरटीई’नुसार प्रवेशाच्या शाळा : ८,८२३
प्रवेशासाठी उपलब्ध जागा : १,०१,८४६
आलेले एकूण अर्ज : ३,६४,४१३
सोडतीद्वारे निवड झालेले विद्यार्थी : ९४,७००
प्रतीक्षा यादीतील विद्यार्थी : ८१,१२९
जिल्हानिहाय निवड झालेले विद्यार्थी
जिल्हा : आरटीई शाळा : प्रवेशासाठी उपलब्ध जागा : निवड झालेल्यांची संख्या
पुणे : ९३५ : १५,५९६ : १५,५०१
ठाणे : ६२८ : १२,२६३ : १०,९९६
नगर : ३६४ : २,८२५ : २,८०४
छत्रपती संभाजीनगर : ५४५ : ४,०६२ : ४,०३५
कोल्हापूर : ३२५ : ३,२७० : २,८१८
नागपूर : ६५३ : ६,५७७ : ६,५१३
नाशिक : ४०१ : ४,८५४ : ४,७५०
--------------------------------------------------------------------------------------
Admission Guidance 2022: WhatsApp https://wa.me/917720025900
Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play
Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance |
Call 77200 25900 or 77200 81400
11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2022 |
We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.
RTE Admission : आरटीई प्रवेशासाठी पाच दिवस मुदतवाढ
आरटीई प्रवेशाला आजपासून सुरवात
RTE Admissions 2024 खासगी शाळांना 'आरटीई'तून सूट नाही
आरटीई प्रवेश प्रक्रिया २०२३ : प्रवेशासाठी आज शेवटची संधी
आरटीई प्रवेश प्रक्रिया २०२३: पालकांसाठी सूचना
आरटीई प्रवेश प्रक्रिया २०२३: ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू
आरटीई प्रवेश प्रक्रिया २०२२: आरटीईच्या दोन हजार जागा रिक्त
आरटीई प्रवेश प्रक्रिया २०२२-२३: प्रवेशासाठी मुदतवाढ
आरटीई प्रवेश प्रक्रिया २०२२: राखीव प्रवेशांची सोडत लवकरच
आरटीई प्रवेश प्रक्रिया २०२२: प्रवेशांची सोडत लवकरच
आरटीई प्रवेशासाठी कमाल वयोमर्यादा निश्चित
आरटीई प्रवेश प्रक्रिया २०२२-२३: जाणून घ्या नवीन नियमावली
आरटीई प्रवेश प्रक्रिया २०२१-२२: असा करा ऑनलाइन अर्ज
आरटीई प्रवेश प्रक्रिया २०२१-२२: ऑनलाइन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध
आरटीई प्रवेश २०२०: प्रतीक्षा यादीतील प्रवेशासाठी मुदतवाढ
आरटीई राखीव जागा प्रवेश २०२०: २३ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
आरटीई राखीव जागा प्रवेश: १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
आरटीई राखीव जागा प्रवेश: ३१ ऑगस्टपर्यंत अंतिम मुदत
आरटीई चे प्रवेश आता तारखेनुसार होणार २०२०
आरटीईनुसार २५ टक्के राखीव जागांसाठी प्रवेश लवकरच होणार सुरू
आरटीई प्रवेशासाठीची पहिली सोडत जाहीर २०२०
‘आरटीई’ प्रवेशासाठी ८७ मदत केंद्रे सुरू
आरटीई प्रवेश नोंदणीसाठी दोन दिवसांची मुदतवाढ
आरटीई प्रवेशासाठी संभाव्य वेळापत्रक जाहीर २०२०
आरटीई चौथ्या फेरीतील प्रवेश आजपासून