बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) खासगी शाळांमध्ये राखीव असणाऱ्या २५ टक्के जागांच्या प्रवेशासाठीची पहिली सोडत (लॉटरी) मंगळवारी जाहीर करण्यात आली.
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या प्राधिकरण) येथे लहान मुलांच्या हस्ते चिठ्ठ्या काढून सोडत काढण्यात आली.
राज्यात 'आरटीई'अंतर्गत २०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येत आहे. यंदा आरटीई प्रवेशासाठी राज्यभरातील ९ हजार ३३१ शाळांमधील एक लाख १५ हजार ४५४ जागांसाठी तब्बल २ लाख ९१ हजार ६६५ एवढे अर्ज आले आहेत. यंदा 'करोना'च्या धोक्यामुळे दर वर्षीप्रमाणे हॉलमध्ये सोडत न काढता राज्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांना (प्राथमिक) व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी करून घेण्यात आले होते.
दरम्यान, 'प्रवेश मिळाल्याचे अथवा 'वेटिंग लिस्ट'मध्ये नाव असल्याचे विद्यार्थ्यांच्या पालकांना त्यांनी नोंदवलेल्या मोबाइल क्रमांकावर 'एसएमएस'द्वारे १९ मार्चला दुपारनंतर कळविले जाणार आहे. मात्र, एसएमएस ही अतिरिक्त सुविधा असल्यामुळे पालकांनी त्यावर अवलंबून राहू नये. मेसेज न मिळाल्यास पालकांनी 'आरटीई'च्या वेबसाइटवरवर आपला अर्ज क्रमांक टाकून प्रवेशाची खात्री करावी,' असे आवाहन प्राथमिक शिक्षण संचालक दत्तात्रेय जगताप यांनी केले आहे.
'पडताळणीसाठी गर्दी नको'
''करोना'च्या पार्श्वभूमीवर 'आरटीई'च्या लॉटरीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळा सुरू झाल्यानंतर म्हणजेच ३१ मार्चनंतर पडताळणी समितीकडे जाऊन कागदपत्रांची तपासणी करूनच शाळेत प्रवेश घ्यावा. 'करोना'चा प्रसार रोखण्यासाठी पालकांनी पडताळणी समितीकडे गर्दी करू नये; तसेच प्रवेशाबाबतच्या सूचना वेळोवेळी वेबसाइटवर देण्यात येतील,' अशी माहिती प्राथमिक शिक्षण संचालनालयातर्फे देण्यात आली.
Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play
Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance |
Call 77200 25900 or 77200 81400
11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |
For all latest Govt Jobs 2019, Railway Jobs, Bank Jobs and SSC Jobs log on to https://goo.gl/YPjt94 We bring you fastest and relevant notifications on Bank, Railways and Govt Jobs. Stay Connected
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा
-----------------------------------------------------------------------------
RTE Admission : आरटीई प्रवेशासाठी पाच दिवस मुदतवाढ
आरटीई प्रवेशाला आजपासून सुरवात
RTE Admissions 2024 खासगी शाळांना 'आरटीई'तून सूट नाही
आरटीई प्रवेश प्रक्रिया २०२३ : प्रवेशासाठी आज शेवटची संधी
आरटीई प्रवेश प्रक्रिया २०२३: पालकांसाठी सूचना
आरटीई प्रवेश प्रक्रिया २०२३: प्रवेशासाठी २५ एप्रिलपर्यंतची मुदत
आरटीई प्रवेश प्रक्रिया २०२३: ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू
आरटीई प्रवेश प्रक्रिया २०२२: आरटीईच्या दोन हजार जागा रिक्त
आरटीई प्रवेश प्रक्रिया २०२२-२३: प्रवेशासाठी मुदतवाढ
आरटीई प्रवेश प्रक्रिया २०२२: राखीव प्रवेशांची सोडत लवकरच
आरटीई प्रवेश प्रक्रिया २०२२: प्रवेशांची सोडत लवकरच
आरटीई प्रवेशासाठी कमाल वयोमर्यादा निश्चित
आरटीई प्रवेश प्रक्रिया २०२२-२३: जाणून घ्या नवीन नियमावली
आरटीई प्रवेश प्रक्रिया २०२१-२२: असा करा ऑनलाइन अर्ज
आरटीई प्रवेश प्रक्रिया २०२१-२२: ऑनलाइन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध
आरटीई प्रवेश २०२०: प्रतीक्षा यादीतील प्रवेशासाठी मुदतवाढ
आरटीई राखीव जागा प्रवेश २०२०: २३ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
आरटीई राखीव जागा प्रवेश: १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
आरटीई राखीव जागा प्रवेश: ३१ ऑगस्टपर्यंत अंतिम मुदत
आरटीई चे प्रवेश आता तारखेनुसार होणार २०२०
आरटीईनुसार २५ टक्के राखीव जागांसाठी प्रवेश लवकरच होणार सुरू
‘आरटीई’ प्रवेशासाठी ८७ मदत केंद्रे सुरू
आरटीई प्रवेश नोंदणीसाठी दोन दिवसांची मुदतवाढ
आरटीई प्रवेशासाठी संभाव्य वेळापत्रक जाहीर २०२०
आरटीई चौथ्या फेरीतील प्रवेश आजपासून