RTE Admissions

RTE Admissions

आरटीई प्रवेश प्रक्रिया २०२२: प्रवेशाच्या शाळानिहाय याद्या जाहीर

PUBLISH DATE 5th April 2022

शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) खासगी शाळांमधील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी काढलेल्या ऑनलाइन सोडती निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या शाळानिहाय याद्या सोमवारी सायंकाळी उशिरा प्रसिद्ध करण्यात आल्या.

दरम्यान, आरटीई प्रवेशाचे संकेतस्थळ दिवसभर बंद असल्यामुळे प्रवेशाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या पालकांचा चांगलाच गोंधळ उडाला. सायंकाळी उशिरा प्रवेशाचे संकेतस्थळ पूर्ववत झाले.

आरटीईनुसार आर्थिकदृष्ट्या दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागा राखीव ठेवण्यात येतात. यासाठी प्राथमिक शिक्षण संचालनालयातर्फे ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. या प्रवेश प्रक्रियेंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२-२३ साठी शाळानिहाय आरक्षण ऑनलाइन सोडत मागील आठवड्यात काढण्यात आली. या सोडतीनुसार विद्यार्थ्यांची शाळानिहाय याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत. प्रवेशाच्या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांचा अर्ज क्रमांक टाकल्यानंतर निवड झालेल्या विद्यार्थ्यांना शाळा प्रवेशाची माहिती उपलब्ध होईल. प्रवेशास पात्र विद्यार्थ्यांच्या पालकांना अर्ज करताना नोंदविलेल्या मोबाईलवर मंगळवारपासून (ता.५) एसएमएस येतील. परंतु पालकांनी एसएमएसवर अवलंबून न राहता आरटीई संकेतस्थळावर विद्यार्थ्यांचा अर्ज क्रमांक टाकून अर्जाची स्थिती पहावी आणि त्याप्रमाणे कार्यवाही करावी. सोडतीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी ‘ॲलाॅटमेट लेटर’ची प्रिंट काढावी आणि पुढील प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण करावी, असे प्राथमिक शिक्षण विभागातर्फे सांगण्यात आले आहे.

प्रवेशासाठी १९ एप्रिलपर्यंत मुदत

‘‘प्रवेशासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी १९ एप्रिलपर्यंत संबंधित शाळेत प्रवेश निश्चित करायचा आहे. तसेच निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या ॲलाॅटमेंट लेटरवर सविस्तर सूचना दिल्या आहेत, त्याप्रमाणे पालकांनी कार्यवाही करावी. आवश्यकता वाटल्यास प्रवेशासाठी मुदतवाढ देण्यात येईल. प्रवेशासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या याद्या संकेतस्थळावर अपडेट करण्याचे काम सुरू होते, त्यामुळे सोमवारी काही वेळ संकेतस्थळ बंद ठेवण्यात आले होते.’’

- दिनकर टेमकर, संचालक, प्राथमिक शिक्षण संचालनालय

  • आरटीई २५ टक्के राखीव जागा लागू होणाऱ्या शाळांची संख्या : ९,०८६

  • रिक्त जागा : १,०१,९०९

  • एकूण आलेले अर्ज : २,८२,७८३

  • सोडतीत निवड झालेले विद्यार्थी : ९०, ६८८

  • प्रतीक्षा यादीतील विद्यार्थी : ६९,८५९

‘‘आरटीई शाळा प्रवेशासाठी यंदा दोन लाख ८२हजार पेक्षा जास्त अर्ज करण्यात आले आहेत. आज दुपारपासून लाखो पालक शाळा प्रवेशाच्या निवडीच्या एसएमएसची वाटत पाहत होते. परंतु दुपारपासून संकेतस्थळ बंद होती आणि त्यावर ‘साईट अंडर मेंटेनन्स’ असे दिसत होते. दरवर्षी संकेतस्थळ वेळेत सुरू न झाल्याने, मेसेज न आल्याने पालकांना मनस्ताप होत आहे.’’- मुकुंद किर्दत, आप पालक युनियन

 

--------------------------------------------------------------------------------

VidyarthiMitra.org

Admission Guidance 2021: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2021 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2021 | JoSSA 2021 | MHT-CET 2021 | MBA 2021 | Pharmacy 2021 | Polytechnic 2021

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News