RTE Admissions

RTE Admissions

आरटीई प्रवेशासाठी संभाव्य वेळापत्रक जाहीर २०२०

PUBLISH DATE 20th January 2020

बालकांच्या मोफत व सक्‍तीच्या शिक्षण हक्‍क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्‍के राखीव जागांसाठी यंदा फेब्रुवारीत प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.

तसेच, तीन फेऱ्यांऐवजी प्रवेशासाठी एकाच टप्प्यात लॉटरी काढण्यात येणार आहे. त्यासाठी यंदा नवीन नियमावली तयार करण्यात आली असल्याची माहिती शिक्षण संचालक (प्राथमिक) द. गो. जगताप यांनी काढलेल्या आदेशात नमूद केले आहे. 

दरवर्षी आरटीई प्रवेशप्रक्रियेत तीन टप्प्यांत लॉटरी काढण्यात येते. गेल्या वर्षी एकूण चार फेऱ्या घेण्यात आल्या होत्या, त्यामुळे शाळा सुरू झाल्या तरी प्रवेशप्रक्रिया सुरूच होत्या. शिक्षण विभागाच्या या ढिसाळ कारभाराचा फटका सर्वसामान्य पालकांना बसला होता. यामध्ये पालकांना सोयीच्या शाळा न मिळाल्यामुळे बहुसंख्य जागा रिक्तच राहिल्या. त्यामुळे अनेक पालकांनी या प्रवेशाकडे काणाडोळा केला होता. 

संभाव्य वेळापत्रक

  1. २१ जानेवारी ते ६ फेब्रुवारी शाळांची पडताळणी 
  2. ११ ते २९ फेब्रुवारी ऑनलाइन नोंदणी 
  3. ११ व १२ मार्च लॉटरी सोडत
  4. १६ मार्च ते ३ एप्रिल कागदपत्रांची पडताळणी करून प्रवेशनिश्‍चिती 
  5. १३ एप्रिल ते २२ मे प्रवेशाच्या याद्या प्रसिद्ध

ऑनलाइन अर्जप्रक्रिया
यंदा प्रक्रिया ऑनलाइन घेण्यात येणार आहे. मागील वेळी लॉटरीत नाव आले तरी केवळ कागदपत्रे उपलब्ध नसल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित राहावे लागले होते. येत्या ११ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या आरटीई प्रवेशप्रक्रियेसाठी पालकांना आत्तापासूनच कागदपत्रांची जमवाजमव करून ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या प्रवेशासाठी अगोदर शाळांना उपलब्ध जागांची नोंदणी करावी लागेल. त्यानंतर पालकांना प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल.

प्रवेशासाठी आवश्‍यक कागदपत्रे 
विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी शिधापत्रिका, वीजबिल, वाहन परवाना, मिळकत कर पावती, गॅस पुस्तक, बॅंकेचे पासबुक, पासपोर्ट, मतदार कार्ड, आधार कार्ड यांपैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरला जाईल. जन्मतारखेचा दाखला, २०१८-१९, २०१९-२० या दोन वर्षांचा उत्पन्नाचा दाखला आवश्‍यक आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शासकीय रुग्णालयाचे प्रमाणपत्र आवश्‍यक आहे. एस.ई.बी.सी. प्रवर्गाचा समावेश वंचित घटकात करावा, एकल पालकांनी त्यांची कागदपत्रही जोडणे आवश्‍यक आहे.

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

For all latest Govt Jobs 2019Railway JobsBank Jobs and SSC Jobs log on to https://goo.gl/YPjt94 We bring you fastest and relevant notifications on Bank, Railways and Govt Jobs. Stay Connected

| Cutoffs 2020 |

 

| Govt. & Private Jobs, Internships, Campus Drive, Off-campus & many more |

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा

-----------------------------------------------------------------------------


Related News