RTE Admissions

RTE Admissions

आरटीई प्रवेश आजच ‘कन्फर्म’ करा: अंतिम मुदत दिनांक ५ मार्च पर्यंत

PUBLISH DATE 4th March 2020

आरटीईअंतर्गत अर्ज भरण्याची वय मर्यादा ३ ते ७ वर्ष आहे. अनेक पालक नर्सरी, ज्युनिअर केजी, सीनियर केजीला प्रवेश घेण्यासाठी पालक ऑनलाइन अर्ज भरत आहेत.

 परंतु भोसरी, पिंपरी आणि पिंपळे गुरव या परिसरात एक ते तीन किलोमीटरच्या आत आरटीईची नोंदणी केलेल्या शाळा उपलब्ध नसल्याचे संकेतस्थळावर दिसत आहे. परिणामी, पालकांमध्ये मोठी नाराजी आहे. मात्र, शिक्षण विभागाच्या प्रशासन विभागाकडून दुर्लक्ष केले जात असल्याची वस्तुस्थिती आहे.

‘ज्या पालकांनी अजूनही ऑनलाइन भरलेले अर्ज कन्फर्म केलेले नाहीत. त्यांनी बुधवारपर्यंत (ता. ५) करावेत; अन्यथा ‘अनकन्फर्म’ अर्जांचा लॉटरीत समाविष्ट करण्यात येणार नाही. तसेच पालकांनीही बुधवारपर्यंत नवीन अर्ज करावेत, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.

आरटीई कायद्याअंतर्गत मुलांच्या शिक्षणासाठी होणाऱ्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला बारा फेब्रुवारीला सुरुवात झाली होती. ती २९ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याची मुदत होती; परंतु तब्बल सहा दिवस काही तांत्रिक अडचणींमुळे ऑनलाइन वेबसाइट बंद होती. त्यामुळे पालकांना अर्ज करता आले नाहीत. अनेकांनी अर्ज भरले, तरी त्यांचे अर्ज ‘कन्फर्म’ झाले नाहीत. 

परिणामी, अशा पालकांना पुन्हा अर्ज करण्यासाठी पाच दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. ऑनलाइन अर्ज भरताना इंग्रजी व मराठी माध्यम असे दोन कॉलम आहेत; पण काही पालकांनी इंग्रजी कॉलममध्ये अर्ज भरल्याचे जाणवत आहे. त्यामुळे गडबड होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. यावर शिक्षण विभाग प्रशासनाने स्पष्टीकरण करावे, ज्यामुळे पालकांचा संभ्रम दूर होईल. 

संकेतस्थळावर ‘इमेज नॉट फाऊंड ऑनलाइन फॉर्म’ भरताना कागदपत्रे आवश्‍यक नसून, प्रवेश प्रक्रियेदरम्यान कागदपत्रे सादर करावीत, असा मजकूर झळकत आहे. त्यामुळे पालकांनी कागदपत्रे सादर करण्याची घाई करू नये, असे पालकांना आवाहन करण्यात आले.

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

For all latest Govt Jobs 2019Railway JobsBank Jobs and SSC Jobs log on to https://goo.gl/YPjt94 We bring you fastest and relevant notifications on Bank, Railways and Govt Jobs. Stay Connected

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा

-----------------------------------------------------------------------------


Related News