Schools

Schools

विद्यार्थी आणि योगाचे महत्व

PUBLISH DATE 16th September 2020

विद्यार्थी आणि योगाचे महत्व

आज-काल आजूबाजूला ज्या घटना घडत आहेत त्यामुळे जीवनात योगशास्त्राचे महत्त्व आणखीनच अधोरेखित होत आहे. व्हाट्सअप, फेसबुक अशा सोशल मीडियाच्या आभासी जगात राहणाऱ्या लोकांना जीवनातल्या वास्तवाला तोंड देणे कठीण जात आहे. शिवाय कोरोना संसर्गाने आपल्या देशात प्रवेश केल्यामुळे कित्येक नवीन संकटांना तोंड द्यावे लागत आहे. लोकांचं शारीरिक आणि विशेषतः मानसिक आरोग्य स्थिर राहण्यासाठी जागृकता निर्माण करून, एकटेपणा, तणाव, राग तसेच निराशाजनक भावना यातून बाहेर येण्यासाठी मानसिक आणि भावनिक दृष्ट्या सक्षम होण्याची आवश्यकता आहे. यावर अत्यंत प्रभावी उपाय म्हणजे प्राणायाम, योगासने, सुदर्शन क्रिया आणि ध्यान धारणा.  काही लोकांचा गैरसमज असतो की हे सर्व फक्त प्रौढ किंवा वयस्कर लोकांसाठी असते.. वस्तुस्थिती अशी आहे की सर्व वयोगटातल्या विद्यार्थ्यांना प्राणायाम, ध्यान यांचा खूप फायदा होतो. एका संस्थेने केलेल्या पाहणीनुसार आजचे विद्यार्थी खूप तणावग्रस्त आहेत मार्च ते जून या काळात केलेल्या पाहणीनुसार-

  • मानसोपचार तज्ञांना भेट देण्याचे प्रमाण वाढले आहे.
  • आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे.
  • सतत पालकांसोबत राहील याच्या तक्रारी घेऊन मानसोपचार तज्ञाकडे जाण्याच्या प्रमाणात १४६ टक्के वाढ झाली आहे.
  • वेळ नियोजनाच्या तक्रारीत १२५टक्के वाढ.
  • अनियंत्रित राग- ११७ टक्के वाढ.
  • सतत बदलणार्‍या लहरी- ५१ टक्के वाढ.
  • परीक्षा पुढे ढकलल्या मूळे तणाव- ३३ टक्के.

 या सर्व तणावापासून मुक्ती हवी असेल तर सकारात्मकता अंगी बाणवावी लागेल. आपला राग योग्य पद्धतीने कसा व्यक्त करावा हे शिकावे लागेल. भावनांचा कल्लोळ मनात उसळला असताना मन शांत कसे करता येईल याचा रामबाण उपाय म्हणजे प्राणायाम आणि ध्यानधारणा.

                  श्री श्री रविशंकर, (ज्यांना प्रेमाने सर्वजण गुरुजी म्हणतात) यांनी या सर्व समस्यांचा सखोल विचार करून सर्व वयोगटातल्या व्यक्तींसाठी (अगदी सात ते आठ वर्षापासून) त्यांच्या वयोगटाला अनुसरून योग्य असे कोर्सेस तयार केलेले आहेत. अगदी छोट्या बाल गटांसाठी “प्रज्ञा योगा” सारखा कोर्स आहे. मध्यम वयोगटासाठी “YES” कोर्स आहे.   17 वर्षे पूर्ण झाल्यानंतर प्राणायाम व ध्यान विषयक (Happiness Programm) कोर्स आहे.

                             मुलांना त्यांच्या वयाला अनुसरून हसत-खेळत वेगवेगळ्या मजेच्या कृती (Fun Activities)  करता करता प्राणायाम, योगासने, ध्यान शिकवले जाते. त्यामुळे मुलांना आनंदी सकारात्मक आणि उत्साही राहण्याचे प्रशिक्षण मिळते. मन एकाग्र देखील सहज होऊ लागल्यामुळे त्यांचा बौद्धिक विकास उत्तम होऊन शैक्षणिक प्रगती होते. उदात्त अशी जीवन मुल्ये त्यांच्यात रुजवली जातात. प्रसंगी आलेल्या अपयशाला, नैराश्यालाही समर्थपणे तोंड देण्याची तयारी होते.

                              श्री श्री रविशंकर म्हणतात की, राग, आक्रमकता, ग्रासून टाकणार नैराश्य अशा नकारात्मक भावनांचे काय करायचं याचं कुठलेही प्रशिक्षण आपल्या शिक्षण पद्धतीत दिले जात नाही. त्यामुळे जगभरचे पालक आणि शिक्षक चिंताग्रस्त आहेत. विशेषतः अमेरिकेत आणि पाश्चात्त्य देशात कुमार अवस्थेतील ( Teenager) मुलांमध्ये असलेली हिंसाचाराची वृत्ती हा फार मोठा चिंतेचा विषय आहे. तेव्हा शालेय वयातील शिक्षण जर जीवनमूल्यांचे शिक्षण असेल आणि त्यात प्राणायाम सूर्यनमस्कार योगासने आणि ध्यान यांचा अंतर्भाव असेल तर आपण आपल्या भावी नागरिकांना नक्कीच अधिक सक्षम बनवू शकू.

                            श्री श्री रविशंकर यांच्या ‘Art of Living’ या संस्थेने जगभरात याचा प्रचार आणि प्रसार केला असून १५५ देशातील सर्व वयोगटातील लोकांनी त्यांचे अनुसरण केले आहे. त्यांची जगाला दिलेली एक देणगी म्हणजे “सुदर्शन क्रिया” आणि ध्यान. सुदर्शन क्रिया केल्याने जे अगणित फायदे होतात त्यावर खूप संशोधन झाले आहे. काही विद्यापीठांनी अभ्यासक्रमातच त्याचा अंतर्भाव केला आहे. सध्याच्या काळातले महत्त्व म्हणजे, सुदर्शन क्रिया केल्यामुळे प्रतिकारशक्ती खूप पटींनी वाढते. शिवाय गुरुजी रोज जगभरातल्या लाखो लोकांसाठी संध्याकाळी  मार्च महिन्यापासून साडेसात वाजता ध्यानधारणा घेत आहेत. तेव्हा योग, ध्यान, प्राणायाम, सुदर्शन क्रिया ही आजच्या काळात विद्यार्थ्यांना साठी अद्भूत देणगी आहे.  यात काहीच शंका नाही.

                      ज्या  विद्यार्थ्यांना हे शिकायचे असेल त्यांनी ‘Art of Living’ च्या शिक्षकांची संपर्क करावा. ऑनलाइन कोर्सेस देखील सुरू आहेत.

आनंदी सुखी जीवनाची हीच तर गुरुकिल्ली आहे.

लेखिका : सौ. प्रा मानसी रांजेकर Vice Principal (ex) 

आबासाहेब गरवारे महाविद्यालय, पुणे

Phone +91 98500 69277

 

विनामूल्य आयोजन ऑनलाईन मॉक एमएचटी-सीईटी २०२०

नोंदणी येथे https: //www.vidyarthimitra.org/abvpmockexam

WhatsApp https://wa.me/917720025900

VM-ABVP-CET-flyer-aug-2020

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.