Schools

Schools

RTE Admission: ‘आरटीई’च्या २५ टक्के ऑनलाइन प्रवेशाला प्रारंभ

PUBLISH DATE 22nd April 2024

२०२४-२५ या शैक्षणिक वर्षाच्या शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल, वंचित, शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागासवर्ग घटकांसाठी २५ टक्के ‘आरटीई’ प्रवेश प्रक्रियेला आता प्रारंभ झाला आहे. विद्यार्थ्यांना १६ ते ३० एप्रिलपर्यंत ‘आरटीई’ पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत.

राज्य शासनाने २०२४-२५ या शैक्षणिक वर्षातील ‘आरटीई’ प्रवेश घेण्यासाठी पूर्वीच्या निकषांत बदल करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या घराजवळील एक किमी अंतरावरील खासगी अनुदानित शाळा, जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिकांच्या शाळेत प्राधान्याने प्रवेश घ्यावा लागणार आहे.

एखाद्या विद्यार्थ्यांच्या घरापासून एक किमी अंतरावर शासकीय किंवा अनुदानित शाळा नाही, पण इंग्रजी माध्यमाची खासगी शाळा आहे, त्या विद्यार्थ्याला तेथे प्रवेश घेता येणार आहे. परंतु, त्यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून खरोखरच त्या अंतरावर शासकीय किंवा अनुदानित शाळा आहे की नाही, याची खात्री केली जाणार आहे.

दरम्यान, राज्यातील ७५ हजार २६४ शाळांनी ‘आरटीई’अंतर्गत नोंदणी केली असून त्यात जिल्ह्यातील तीन हजार ३७८ शाळा आहेत. नवीन बदलानुसार ‘आरटीई’अंतर्गत राज्यातील नऊ लाख ६४ हजार विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या (घरापासून एक किमी अंतराची अट लागू) खासगी अनुदानित किंवा शासकीय शाळांमध्ये मोफत प्रवेश मिळणार आहे.

काही शाळांमध्ये लॉटरी काढावीच लागेल राज्यातील काही जिल्हा परिषदेच्या, महापालिका, नगरपालिकांच्या तर काही खासगी अनुदानित नामांकित शाळांमध्ये दरवर्षी प्रवेशासाठी मोठी झुंबड असते. अशा शाळांमध्ये प्रवेशासाठी क्षमतेपेक्षा जास्त अर्ज आल्यास त्याठिकाणी ‘एनआयसी’च्या माध्यमातून लॉटरी काढावी लागेल.                   

दुसरीकडे ज्या विद्यार्थ्याच्या घरापासून एक किमी अंतरावर केवळ इंग्रजी माध्यमाची खासगी विनाअनुदानित शाळा आहे, अशाठिकाणी देखील लॉटरी काढावी लागणार आहे. त्यामुळे ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविली जात असल्याची माहिती शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी बोलताना स्पष्ट केले.

या संकेतस्थळावर करा अर्ज, जूनमध्ये प्रवेश प्रक्रिया

सध्या ‘आरटीई’अंतर्गत २५ टक्के मोफत प्रवेशासाठी https://student.maharashtra.gov.in/adm_portal या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करण्यास उद्यापासून (मंगळवारी) सुरवात होणार आहे. अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर त्याची छाननी होऊन लॉटरी निघेल आणि लोकसभेची आचारसंहिता संपल्यानंतर संबंधित विद्यार्थ्यांचे प्रवेश होतील. दरम्यान, ज्या शाळांमध्ये लॉटरीची गरज भासणार नाही, त्याठिकाणी ‘आरटीई’तून प्रवेशासाठी पात्र मागेल त्या विद्यार्थ्याला थेट प्रवेश मिळतील.

Register for Free Mock Test

------------------------------------------------------------------------------------

VidyarthiMitra.org

Admission Guidance 2024: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2024 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2024 | JoSSA 2024 | MHT-CET 2024 | MBA 2024 | Pharmacy 2024 | Polytechnic 2024

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नो
करी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News


RTE Admission: ‘आरटीई’च्या २५ टक्के ऑनलाइन प्रवेशाला प्रारंभ
29th August 2024

JNV School Admission Process

RTE Admission: ‘आरटीई’च्या २५ टक्के ऑनलाइन प्रवेशाला प्रारंभ
7th April 2024

DMVS Admission 2024

RTE Admission: ‘आरटीई’च्या २५ टक्के ऑनलाइन प्रवेशाला प्रारंभ
1st April 2024

PSEB 5th Result 2024 Out

RTE Admission: ‘आरटीई’च्या २५ टक्के ऑनलाइन प्रवेशाला प्रारंभ
30th January 2024

MPSOS Result 2023

RTE Admission: ‘आरटीई’च्या २५ टक्के ऑनलाइन प्रवेशाला प्रारंभ
12th January 2024

Delhi Nursery Admissions 2024

RTE Admission: ‘आरटीई’च्या २५ टक्के ऑनलाइन प्रवेशाला प्रारंभ
4th January 2024

EMRS Answer Key 2023-24

RTE Admission: ‘आरटीई’च्या २५ टक्के ऑनलाइन प्रवेशाला प्रारंभ
27th December 2023

NIOS Result 2023 Out

RTE Admission: ‘आरटीई’च्या २५ टक्के ऑनलाइन प्रवेशाला प्रारंभ
21st December 2023

JKBOSE 10th Result 2023 Date

RTE Admission: ‘आरटीई’च्या २५ टक्के ऑनलाइन प्रवेशाला प्रारंभ
11th December 2023

TN Half Yearly Examination 2023

RTE Admission: ‘आरटीई’च्या २५ टक्के ऑनलाइन प्रवेशाला प्रारंभ
22nd November 2023

Delhi Nursery Admissions 2024

RTE Admission: ‘आरटीई’च्या २५ टक्के ऑनलाइन प्रवेशाला प्रारंभ
22nd June 2023

JNVST Result 2023