Schools

Schools

Three Language Policy

PUBLISH DATE 20th June 2025

राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने यंदा पहिलीपासूनच तिसरी भाषा सक्तीची करण्याची घोषणा केल्यानंतर त्याला कडवा विरोध होत असतानाच राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने ( एससीईआरटी ) लागलीच पहिल्या दोन इयत्तांसाठी विषय नियोजन, तासिकांची विभागणी आणि वेळापत्रक जाहीरही केले. या वेळापत्रकानुसार तिसऱ्या भाषेसाठी आठवड्यातील पाच तासिका दिल्या जाणार आहेत. प्रत्येक तासिका ३५ मिनिटांची असेल. या वेळापत्रक आराखड्यात तिसऱ्या भाषेचा उल्लेख करताना 'हिंदी अथवा अन्य भारतीय भाषा' असे म्हणत शिक्षण विभागाने एकप्रकारे हिंदीची सक्तीच केल्याची चर्चा आहे. इयत्ता पहिलीपासूनच तिसऱ्या भाषेची सक्ती करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने मंगळवारी रात्री उशिरा जाहीर केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे बुधवारी रात्री उशिरा एससीईआरटीचे संचालक राहुल रेखावार यांनी तासिका विभागणी आणि वेळापत्रक निश्चितीचे परिपत्रक जाहीर केले.

एससीईआरटीच्या या तत्परतेबद्दल शिक्षण क्षेत्रातून आश्चर्य व्यक्त होत आहे. यंदाच्या वर्षात पहिलीपासून तिसरी भाषा लागू होणार नाही, अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्र्यांनी केली होती. त्यानंतर तिसरी भाषा असेल, असा निर्णय मंगळवारी रात्री जाहीर झाला. लगेच एका दिवसात बुधवारी हे वेळापत्रक प्रसिद्ध झाले. यावरून शिक्षण विभागाने तिसऱ्या भाषेची सक्ती करण्याचे आधीच ठरवले होते, हे स्पष्ट आहे. तसेच ही भाषा हिंदीच असेल, याची तजवीजही केल्याने वेळापत्रकात तिसऱ्या भाषेचा उल्लेख 'हिंदी किंवा इतर भारतीय भाषा' असा करण्यात आला आहे, अशी टीका शिक्षणतज्ज्ञ करत आहेत.

'उन्हाळी सुट्टीत आणि त्या आधी झालेल्या शिक्षकांच्या प्रशिक्षणातही तिसऱ्या भाषेचा उल्लेख अथवा समावेश नव्हता. राज्य अभ्यासक्रम आराखड्यातही तो नाही. अचानक हा उल्लेख कुठून आला, त्याबाबतचा प्रस्ताव कोणी आणला, याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नाही. अशा वेळी ही तिसरी भाषा शिक्षण विभागातील कोण्या अधिकाऱ्याच्या सुपीक डोक्यातून वस्तुस्थितीचा विचार न करताच लागू करण्यात आली,' असा आक्षेप महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महासंघाचे माजी उपाध्यक्ष महेंद्र गणपुले यांनी नोंदवला.

'मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषांची लिपी एकच असल्याचे सांगितले जाते. त्यात तथ्य असले, तरी ते पूर्णसत्य नाही. दोन्ही भाषांमध्ये शब्दांचे, अक्षरांचे उच्चार वेगवेगळे आहेत. अनेक शब्दांचे अर्थ वेगळे आहेत. व्याकरणाचे नियम भिन्न आहेत. लहान वयातील मुलांचा त्यामुळे गोंधळच उडण्याची शक्यता आहे. मात्र 'आनंददायी शिक्षणा'च्या केवळ गप्पा मारणाऱ्या शालेय शिक्षणमंत्र्यांना याची कोणतीही कल्पना नाही', असे एका शिक्षकाने गोपनीयतेच्या अटीवर सांगितले.

वेळापत्रकानुसार...

  • पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या भाषांसाठी प्रत्येकी ३५ मिनिटांची तासिका असेल.
  • पहिल्या भाषेसाठी आठवड्यातील १५ तासिका
  • दुसऱ्या भाषेसाठी आठवड्यातील ९ तासिका
  • तिसऱ्या भाषेसाठी आठवड्यातील पाच तासिका


मराठी आणि इंग्रजी माध्यमे वगळता अन्य माध्यमांच्या शाळांसाठी तिसऱ्या भाषेचा विचार करूनच वेळापत्रक तयार केले जाते. त्यामुळे तिसऱ्या भाषेसह तासिकांची विभागणी तयार होती. त्यात फक्त मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या दृष्टीने बदल करण्यात आले. त्यामुळेच हे वेळापत्रक तातडीने जाहीर करणे शक्य झाले. शैक्षणिक वर्ष सुरू झाल्याने वेळापत्रक लवकर जाहीर होणे गरजेचे होते.

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

VidyarthiMitra Career Guidance

Admission Guidance 2024: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2024 |

We bring you the fastest and most relevant notifications on Bank, Railways, and Government Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2024 | JoSSA 2024 | MHT-CET 2024 | MBA 2024 | Pharmacy 2024 | Polytechnic 2024

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alerts on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send a WhatsApp message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) 77200 25900 हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहर> <नोकरी/शिक्षण> पाठवा.


Related News


Three Language Policy
23rd June 2025

NIOS Result 2025

Three Language Policy
2nd May 2025

RTE admission 2025-26

Three Language Policy
5th April 2025

KVS Admission 2025

Three Language Policy
3rd April 2025

RTE admission 2025-26:

Three Language Policy
14th February 2025

Maharashtra RTE Admission 2025:

Three Language Policy
29th August 2024

JNV School Admission Process

Three Language Policy
7th April 2024

DMVS Admission 2024

Three Language Policy
1st April 2024

PSEB 5th Result 2024 Out

Three Language Policy
30th January 2024

MPSOS Result 2023

Three Language Policy
12th January 2024

Delhi Nursery Admissions 2024

Three Language Policy
4th January 2024

EMRS Answer Key 2023-24

Three Language Policy
27th December 2023

NIOS Result 2023 Out

Three Language Policy
21st December 2023

JKBOSE 10th Result 2023 Date

Three Language Policy
11th December 2023

TN Half Yearly Examination 2023

Three Language Policy
22nd November 2023

Delhi Nursery Admissions 2024

Three Language Policy
22nd June 2023

JNVST Result 2023