Engineering

Engineering

तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे थेट द्वितीय वर्ष इंजिनीअरिंगची प्रवेशप्रक्रिया जाहीर २०२२

PUBLISH DATE 13th June 2022

तंत्रशिक्षण संचालनालयाने (DTE) थेट द्वितीय वर्ष इंजिनीअरिंग डिप्लोमा अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीचे (Direct Second Year Engineering Diploma Admission 2022) वेळापत्रक जाहीर केले असून, विद्यार्थ्यांना येत्या आठ जुलैपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावे लागणार आहेत.

प्रवेशासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची योग्य माहिती घेऊन अर्ज करण्याचे आवाहन 'डीटीई'कडून करण्यात आले आहे.

'डीटीई'चे संचालक डॉ. अभय वाघ यांनी परिपत्रकाद्वारे डिप्लोमा अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याला शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे. बारावीची परीक्षा व्यावसायिक अभ्यासक्रमांचे विषय घेऊन उत्तीर्ण होणाऱ्या; तसेच आयटीआय उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना थेट द्वितीय वर्ष इंजिनीअरिंग डिप्लोमा अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येतो. त्यामुळे या मार्गाने डिप्लोमा अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक असते.

ऑनलाइन अर्ज केल्यानंतर विद्यार्थ्यांना ऑनलाइन कागदपत्रांची पडताळणी करावयाची असल्यास, त्याचा पर्याय देण्यात आला आहे. कागदपत्रे अपलोड करता येणे शक्य होत नसल्यास, अशा विद्यार्थ्यांनी जवळच्या पॉलिटेक्निकमध्ये सुविधा केंद्रावर जाऊन कागदपत्रांची पडताळणी करावयाची आहे. या सुविधा केंद्रांची यादी वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. अशा विद्यार्थ्यांना तारीख व वेळ ठरवून दिले जाईल. त्यानुसार अर्ज निश्चिती करावी लागेल. डिप्लोमा प्रवेशासाठी अर्ज करताना खुल्या संवर्गातील विद्यार्थ्यांना ४०० रुपये, तर मागासवर्गीय गटातील विद्यार्थ्यांना ३०० रुपये शुल्क भरावे लागणार आहे.त्याचप्रमाणे कागदपत्र पडताळणीच्या वेळी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडे ३१ मार्च २०२३ पर्यंतचे वैध असलेले नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र आवश्यक आहे. प्रमाणपत्र सादर करू न शकणारे विद्यार्थ्यांना राखीव जागांवर दावा करता येणार नाही, अशी माहिती तंत्रशिक्षणचे संचालक डॉ. अभय वाघ यांनी परिपत्रकाद्वारे दिली आहे. विद्यार्थ्यांनी कागदपत्रांच्या अधिक माहितीसाठी आणि प्रवेश प्रक्रियेच्या सविस्तर वेळापत्रकासाठी https://dsd22.dte.maharashtra.gov.in या वेबसाइटवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

थेट द्वितीय वर्ष इंजिनीअरिंग डिप्लोमा प्रवेशाचे वेळापत्रक

ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत : १० जून ते ८ जुलै

कागदपत्रांची पडताळणी : १० जून ते ८ जुलै

तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध : ११ जुलै

यादीवर विद्यार्थ्यांचे आक्षेप : १२ ते १४ जुलै

अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध : १५ जुलै
 

--------------------------------------------------------------------------------------------------

VidyarthiMitra.org

Admission Guidance 2021: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2021 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2021 | JoSSA 2021 | MHT-CET 2021 | MBA 2021 | Pharmacy 2021 | Polytechnic 2021

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News


तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे थेट द्वितीय वर्ष इंजिनीअरिंगची प्रवेशप्रक्रिया जाहीर २०२२
10th July 2020

VIT cancels VITEEE 2020

तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे थेट द्वितीय वर्ष इंजिनीअरिंगची प्रवेशप्रक्रिया जाहीर २०२२
3rd February 2020

Career after Engineering

तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे थेट द्वितीय वर्ष इंजिनीअरिंगची प्रवेशप्रक्रिया जाहीर २०२२
3rd February 2020

GATE 2020 exam analysis

तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे थेट द्वितीय वर्ष इंजिनीअरिंगची प्रवेशप्रक्रिया जाहीर २०२२
24th January 2020

WBJEE 2020 admit card released

तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे थेट द्वितीय वर्ष इंजिनीअरिंगची प्रवेशप्रक्रिया जाहीर २०२२
22nd November 2019

MHT-CET 2020 schedule released