Engineering

Engineering

अभियांत्रिकीतील करिअरच्या संधी

PUBLISH DATE 27th December 2023

चांगल्या पगाराची नोकरी, परदेशात जाण्याची संधी, स्पर्धा परीक्षा, संशोधन, उद्योजकता, तंत्रशिक्षणातील तसेच व्यवस्थापकीय क्षेत्रातील उच्च शिक्षणाचे पर्याय, संरक्षण दलातील संधी अशा असंख्य बहुपर्यायी आणि उत्तम करिअरकडे घेऊन जाणारे शिक्षण अभियांत्रिकीचे आहे.

त्यामुळे बारावी सायन्सनंतरचा दर्जेदार पर्याय म्हणून बहुसंख्य विद्यार्थी आजही अभियांत्रिकीची पदवी म्हणजेच बीई/बीटेकचा विचार करतात. सध्याच्या काळात आपल्याकडे इंजिनीअरिंग म्हणजे बीटेक असाच उल्लेख केला जातो, तरीही हे लक्षात घ्यावे की, तत्त्वतः बीई आणि बी-टेक यात तसा काही मोठा फरक नाही.

कालावधी

अभियांत्रिकीच्या पदवीचा कालावधी बारावी सायन्सनंतर ४ वर्षांचा आहे. काही विद्यार्थी डिप्लोमा इंजिनीअरिंग करून थेट दुसऱ्या वर्षात प्रवेश घेतात. त्यांच्यासाठी हा कालावधी ३ वर्षांचा असतो. दोन्ही मार्गांनी म्हणजेच दहावीनंतर डिप्लोमा करून नंतर पदवी करणे आणि दहावी नंतर बारावीमार्गे अभियांत्रिकी पदवी करणे या दोन्हींचा कालावधी समानच आहे.

प्रवेश परीक्षा

बारावी सायन्सनंतर जेईई मेनद्वारे देशभरातील एनआयटी आणि जेईई ॲडव्हान्सडद्वारे आयआयटीमध्ये प्रवेश मिळतो तर, सीईटीद्वारे महाराष्ट्रातील महाविद्यालयांत. शासकीय महाविद्यालये, विद्यापीठाचा अभियांत्रिकी विभाग, शासनमान्य विनाअनुदानित, खासगी विद्यापीठे, स्वायत्त महाविद्यालये अशी अनेक प्रकारची महाविद्यालये विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी उपलब्ध असतात. सीईटी परीक्षेत पर्सेन्टाइल पद्धतीने गुण जाहीर केले जातात.

विविध शाखा

मेकॅनिकल, कंम्प्यूटर, आयटी, ईएनटीसी, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल, सिव्हिल, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, पॉलिमर, केमिकल, मेटॅलर्जी, रोबोटिक्स, इंस्ट्रुमेंटेशन, ऑटोमोबाईल, बायोमेडिकल, ॲग्रीकल्चर अशा अनेक शाखांमधून अभियांत्रिकीचे शिक्षण उपलब्ध आहे. सर्व शाखांना स्कोप आहे. तरीही सध्या कंम्प्युटर, एआय, आयटी यांचा ट्रेंड जाणवतो. हा ट्रेंड कालानुरूप बदलत असतो.

अभ्यासक्रमाचे स्वरूप

चार वर्षांच्या अभ्यासक्रमात सेमिस्टर पॅटर्न असून, प्रत्येक सेमिस्टरमध्येदेखील विशिष्ट कालावधीनंतर सातत्याने परीक्षा घेतल्या जातात. थेअरीबरोबरच नियमित प्रॅक्टिकल्स असतात. अभ्यासक्रमाच्या शेवटी प्रोजेक्ट वर्कचा समावेश असतो. रीसर्च पेपर्स, कॉन्फरन्स, ट्रायल अँड एरर प्रोजेक्ट्स, टेक्निकल कॉम्पिटिशन्स याही माध्यमातून विद्यार्थ्यांना संशोधन आणि उद्योजकता यांचे बाळकडू दिले जाते.

पदवीनंतरच्या संधी - एमई, एमटेक, एमएसद्वारे तांत्रिकी क्षेत्रातील पदव्युत्तर शिक्षण घेता येते. व्यवस्थापन क्षेत्रातील एमबीए, पीजीडीबीएम शिक्षण उपलब्ध आहे. यूपीएससी, एमपीएससी, सीडीएसई आदी परीक्षांद्वारे शासकीय क्षेत्रात जाता येते.

-------------------------------------------------------------------------------------

VidyarthiMitra.org

Admission Guidance 2024: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2024 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2024 | JoSSA 2024 | MHT-CET 2024 | MBA 2024 | Pharmacy 2024 | Polytechnic 2024

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नो
करी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News


अभियांत्रिकीतील करिअरच्या संधी
10th July 2020

VIT cancels VITEEE 2020

अभियांत्रिकीतील करिअरच्या संधी
3rd February 2020

Career after Engineering

अभियांत्रिकीतील करिअरच्या संधी
3rd February 2020

GATE 2020 exam analysis

अभियांत्रिकीतील करिअरच्या संधी
24th January 2020

WBJEE 2020 admit card released

अभियांत्रिकीतील करिअरच्या संधी
22nd November 2019

MHT-CET 2020 schedule released