Engineering

Engineering

दहावीनंतर अभियांत्रिकी पदविका क्षेत्रात करीअर संधी २०२१

PUBLISH DATE 9th February 2021

अभियांत्रिकी डिप्लोमानंतर खासगी आस्थापनांमध्ये नोकरीच्या संधी आहेतच, शिवाय संरक्षण दले, रेल्वे, आरटीओ, ‘भेल’, बीएसएनएल, महावितरण अशा सरकारी/निमसरकारी आस्थापनांमध्येही उपलब्ध होतात.

तांत्रिक शिक्षणात रस असलेल्या विद्यार्थ्यांसाठी दहावीनंतर एक उत्तम पर्याय उपलब्ध आहे, तो म्हणजे अभियांत्रिकी पदविका. आज महाराष्ट्रातील जवळपास चारशे संस्थांमध्ये अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम चालवला जातो, ज्यामध्ये एक लाखाहून अधिक जागा उपलब्ध आहेत. यामध्ये सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल यांसारख्या पारंपरिक शाखा आहेतच, पण काही तंत्रनिकेतनमध्ये लेदर टेक्नॉलॉजी, प्लॅस्टिक टेक्नॉलॉजी, टेक्स्टाईल टेक्नॉलॉजी, फूड टेक्नॉलॉजी, बायोटेक, प्रिंटिंग टेक्नॉलॉजी, मेटॅलर्जी, मायनिंग अशा हटके शाखाही उपलब्ध आहेत. कोणत्या तंत्रनिकेतनमध्ये किती व कोणत्या शाखांमध्ये जागा आहेत येथपासून प्रवेशप्रक्रियेपर्यंतची सर्व अद्ययावत माहिती www.dtemaharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असते. दहावीच्या निकालानंतर या अभियांत्रिकी पदविकांच्या प्रवेशासाठी प्रक्रिया सुरू होते. यासंबंधीची जाहिरात वर्तमानपत्रांत. तसेच डीटीईच्या संकेतस्थळावर प्रकाशित होते.

अभियांत्रिकी डिप्लोमानंतर (पदविका) अभियांत्रिकी डिग्रीचा पर्याय जसा उपलब्ध होतो. तसाच बीबीए , बीसीएसारख्या कोर्सेसना प्रवेश मिळू शकतो. अभियांत्रिकी डिप्लोमानंतर अभियांत्रिकी डिग्री प्रवेशाचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांनी एक गोष्ट लक्षात घेतलीच पाहिजे, ती म्हणजे डिग्री अभियांत्रिकी प्रवेशासाठी चांगल्या महाविद्यालयात (म्हणजे ज्या महाविद्यालयांमध्ये भरपूर कंपन्या कॅंपस प्लेसमेंटसाठी येतात ) प्रवेश मिळवण्यासाठी डिप्लोमाच्या शेवटच्या वर्षात किमान ८५ टक्क्यांवर गुण मिळवणे अत्यावश्यक आहे. कारण बारावीनंतर डिग्री अभियांत्रिकी प्रवेशासाठी जितक्या जागा उपलब्ध आहेत, त्याच्या फक्त १० टक्के  जागा डिप्लोमा अभियांत्रिकीमधून डिग्री अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षात प्रवेश मिळवताना उपलब्ध असतात.

दहावीपर्यंत मराठी माध्यमातून शिकलेल्या विद्यार्थ्यांना अकरावी/बारावी इंग्रजी माध्यमातून शिकणे अवघड जाते आणि ते अकरावी/बारावीचा अभ्यास इंग्रजी माध्यमातून करताना दडपणाखाली येतात. त्यांना डिप्लोमा अभियांत्रिकी तीन वर्षांचा कोर्स असल्याने इंग्रजी माध्यमाशी जुळवून घेणे सोपे जाते. ज्या विद्यार्थ्यांना डिप्लोमानंतर नोकरी मिळवण्यात रस आहे त्यांनाही दहावीनंतर डिप्लोमाला प्रवेश घेणे फायदेशीर ठरते. अभियांत्रिकी डिप्लोमानंतर खासगी आस्थापनांमध्ये नोकरीच्या संधी आहेतच, शिवाय संरक्षण दले, रेल्वे, आरटीओ, ‘भेल’, बीएसएनएल, महावितरण अशा सरकारी/निमसरकारी आस्थापनांमध्येही उपलब्ध होतात.

लेखक- विवेक वेलणकर

Get complete Admission Guidance without stepping out of your house.

Join Telegram channel For Engineering & Pharmacy Admission Guidance: https://t.me/VidyarthiMitra_AdmissionGuidance

Join WhatsApp Group channel For Engineering & Pharmacy Admission Guidance: Click here to Join WhatsApp Group

Medical Admissions: https://t.me/VidyarthiMitra_MedicalAdmission

Vidyarthi Mitra App link https://bit.ly/2ZmcyYY

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitraहा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News


दहावीनंतर अभियांत्रिकी पदविका क्षेत्रात करीअर संधी २०२१
10th July 2020

VIT cancels VITEEE 2020

दहावीनंतर अभियांत्रिकी पदविका क्षेत्रात करीअर संधी २०२१
3rd February 2020

Career after Engineering

दहावीनंतर अभियांत्रिकी पदविका क्षेत्रात करीअर संधी २०२१
3rd February 2020

GATE 2020 exam analysis

दहावीनंतर अभियांत्रिकी पदविका क्षेत्रात करीअर संधी २०२१
24th January 2020

WBJEE 2020 admit card released

दहावीनंतर अभियांत्रिकी पदविका क्षेत्रात करीअर संधी २०२१
22nd November 2019

MHT-CET 2020 schedule released