Engineering

Engineering

शासकीय व शासन अनुदानित संस्थेतील इंजिनीअरिंग अभ्यासक्रमाच्या शुल्कात सवलत देण्याचा निर्णय २०२१

PUBLISH DATE 25th June 2021

राज्यातील करोना परिस्थिती विचारात घेऊन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षांमध्ये शासकीय व शासन अनुदानित स्वायत्त संस्थेमध्ये इंजिनीअरिंग अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शिकवणी शुल्काव्यतिरिक्त इतर शुल्कात १६ हजार २५० रुपयांची (अंदाजे २५ टक्के) सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतची घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी केली.

शासकीय व शासन अनुदानित स्वायत्त इंजिनीअरिंग संस्थेमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शिकवणी शुल्काशिवाय इतर शुल्क भरावे लागते. करोनाकाळात विद्यार्थी कॉलेजांत प्रत्यक्ष उपस्थित नसल्याने ग्रंथालय, जिमखाना अशा शैक्षणिक सुविधांचा वापर केला जात नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून हे शुल्क घेऊ नये, असे सामंत यांनी जाहीर केले. करोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी, पालक यांच्या आर्थिक अडचणी लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत व्हावी, म्हणून इतर शुल्कामध्ये १६ हजार २५० रुपयांची सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाचा २० हजार विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे.

वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजीकल इन्स्टिट्यूट येथे गुरुवारी राज्यातील शासकीय इंजिनीअरिंग कॉलेज व संस्थांचा आढावा घेण्यात आला. या बैठकीला उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव ओ. पी. गुप्ता, तंत्र शिक्षण संचालक डॉ. अभय वाघ व संबंधित कॉलेजांचे प्राध्यापक उपस्थित होते.

बैठकीतील महत्त्वपूर्ण निर्णय

  1. - व्हीजेटीआय येथील मुलींच्या वसतिगृहाचे बांधकाम पूर्ण झाले असल्याने या वसतिगृहास 'मातोश्री' असे नामकरण करण्यास मान्यता
  2. - या संस्थांना शिक्षक आणि शिक्षकेतर पदे कंत्राटी तत्त्वावर स्वतःच्या निधीतून भरण्यास मान्यता
  3. - संस्थांच्या २०२०-२०२१ च्या अर्थसंकल्पासत्त्त्वत: मान्यता
  4. - संस्थांना शैक्षणिक उपयोगासाठी बांधकामाचे प्रस्ताव सरकारपुढे सादर करण्याच्या सूचना

-----------------------------------------------------------------------------------

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitraहा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News


शासकीय व शासन अनुदानित संस्थेतील इंजिनीअरिंग अभ्यासक्रमाच्या शुल्कात सवलत देण्याचा निर्णय २०२१
10th July 2020

VIT cancels VITEEE 2020

शासकीय व शासन अनुदानित संस्थेतील इंजिनीअरिंग अभ्यासक्रमाच्या शुल्कात सवलत देण्याचा निर्णय २०२१
3rd February 2020

Career after Engineering

शासकीय व शासन अनुदानित संस्थेतील इंजिनीअरिंग अभ्यासक्रमाच्या शुल्कात सवलत देण्याचा निर्णय २०२१
3rd February 2020

GATE 2020 exam analysis

शासकीय व शासन अनुदानित संस्थेतील इंजिनीअरिंग अभ्यासक्रमाच्या शुल्कात सवलत देण्याचा निर्णय २०२१
24th January 2020

WBJEE 2020 admit card released

शासकीय व शासन अनुदानित संस्थेतील इंजिनीअरिंग अभ्यासक्रमाच्या शुल्कात सवलत देण्याचा निर्णय २०२१
22nd November 2019

MHT-CET 2020 schedule released