राज्यात तीनशेहून अधिक अभियांत्रिकी महाविद्यालये (Engineering college) आहेत आणि सत्तरपेक्षा जास्त शाखा प्रवेशाकरीता उपलब्ध आहेत.
ही प्रवेश प्रक्रिया सीईटी सेलच्या माध्यमातून सीईटी व जेईई-मेनच्या (CET, JEE Main) पर्सेंटाइल गुणांवर आधारित असते. ही प्रक्रिया (Engineering Admission 2021) मागील वर्षी संपूर्णपणे ऑनलाइन राबविण्यात आली होती.
या प्रवेश प्रक्रियेचे तीन प्रमुख टप्पे म्हणजे एमएचटी-सीईटीचा निकाल (MHT CET Result) आल्यानंतर रजिस्ट्रेशन, कागदपत्र छाननी (डॉक्युमेंट व्हेरीफिकेशन) आणि तिसरा टप्पा म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्या फेरीकरता ऑप्शन फॉर्म भरणे (विकल्प नोंदविणे).
मागील वर्षी कोव्हिडमुळे संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन व घरूनच करता येईल, अशी व्यवस्था सरकारने सीईटी सेलद्वारे केली होती. बहुधा या वर्षीसुद्धा ती पूर्णपणे ऑनलाईन होऊ शकते. यामध्ये दोन फेऱ्या ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आल्या होत्या. शेवटची फेरी ही रिक्त जागांकरिता महाविद्यालय स्तरावर घेण्यात आली होती.
जेईई-मेनच्या माध्यमातून राज्याच्या खासगी महाविद्यालयांमध्ये पंधरा टक्के कोटा असतो व एमएचटी-सीईटी च्या माध्यमातून राज्याच्या खासगी महाविद्यालयांमध्ये ८५ टक्के जागा भरल्या जातात. राज्यातील सरकारी किंवा सरकारी स्वायत्त (ऑटोनॉमस) महाविद्यालयांचे प्रवेश, हे प्रामुख्याने एमएचटी-सीईटीच्या माध्यमातून १०० टक्के होतात. उदाहरणादाखल सीओईपी, पुणे येथे शंभर टक्के जागा या एमएचटी-सीईटीच्या माध्यमातूनच भरल्या जातात. तेथे 'जेईई मेन'साठी कोटा नाही, याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी; तसेच
अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेकरीता आरक्षणाचे सर्व नियम लागू आहेत. शिवाय 'होम युनिव्हर्सिटी' (एचयू) व 'अदर दॅन होम युनिव्हर्सिटी'च्या (ओएचयू) माध्यमातून जागा भरल्या जातात. उदाहरणार्थ पुणे, नगर व नाशिक येथील विद्यार्थ्यांकरीता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांमध्ये ७० टक्के जागा राखीव असतात.
नागपूर, कोल्हापूर, नांदेड, जळगाव, मुंबईमधून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत ३० टक्के जागा उपलब्ध असतात. स्वाभाविकच ३० टक्क्यांच्या जागांमध्ये स्पर्धा जास्त असते. नोंदणी प्रक्रियेमध्ये सर्व कागदपत्रे आपल्या प्रवर्गाप्रमाणे; तसेच अधिवास प्रमाणपत्र (डोमिसाइल) हे प्रामुख्याने महत्त्वाचे असतात व ते आपल्याला अपलोड करायला लागतात. छाननी प्रक्रियेत जर काही कमतरता आढळल्यास आपणास 'लॉगिन'मधून त्याविषयी माहिती देण्यात येते. यानंतरचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे गुणवत्ता यादी. अनेक प्रकारचे गुणवत्ता (मेरीट) क्रमांक आपल्याला लॉगिनमधून पाहायला मिळतात व त्यानंतर आपल्याला पहिल्या फेरीसाठी पर्याय नोंदविण्याची म्हणजेच 'ऑप्शन फॉर्म' भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येते.
'जेईई मेन' व 'एमएचटी-सीईटी'च्या माध्यमातून एकच ऑप्शन फॉर्म भरावयाचा असतो व आपण ३०० पर्याय तिथे नोंदवू शकतो. 'सीओईपी'मधील 'कम्प्युटर सायन्स' हा एक पर्याय, असे अनेक पर्याय आवडीनुसार उतरत्या क्रमात आपण या फॉर्ममध्ये नोंदवू शकतो. मागील वर्षी 'एमएचटी-सीईटी'ची परीक्षा सप्टेंबरमध्ये झाल्याने ही प्रवेश प्रक्रिया खूप लांबली होती व या वर्षीच्या फेब्रुवारीपर्यंत ती सुरू होती. २०२१ मध्ये ही प्रवेश प्रक्रिया एमएचटी-सीईटीचा निकाल आल्यानंतर सुरू होणे अपेक्षित आहे. सरकारी शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची माहिती घेऊन वेळीच त्या कागदपत्रांसाठी अर्ज करणे शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी उपयुक्त ठरेल.
देशातील खासगी विद्यापीठांमधील प्रक्रिया
भारतात अनेक खासगी विद्यापीठांतून अभियांत्रिकीचे शिक्षण दिले जाते. यात प्रामुख्याने बिट्स पिलानी, व्हीआयटी वेल्लोर, एसआरएम, मणिपाल या विद्यापीठांचा समावेश होतो. या सर्व विद्यापीठांद्वारे त्यांची वैयक्तिक प्रवेश प्रक्रिया; तसेच फेऱ्या घेण्यात येतात. त्यापैकी बऱ्याच सध्या सुरू आहेत किंवा त्यांची दुसरी फेरी होणार आहे. या प्रवेश प्रक्रियांमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे या विद्यापीठांच्या विविध कॅम्पस; तसेच उपलब्ध शाखांचे पर्याय नोंदवावे लागतात. त्या माध्यमातून मिळालेल्या पर्यायासाठी नोंदणी करून प्रवेश निश्चित करण्यात येतो. या विद्यापीठांचे स्थळ, शुल्क, प्लेसमेंट तसेच तेथे असणारी भाषा, संस्कृती, खाद्यसंस्कृती, हॉस्टेल व इतर सुविधा या सर्वांचा सारासार विचार करून निर्णय घेता येऊ शकतो. महाराष्ट्रातील व या विद्यापीठांमधील पर्याय यात तुलना करून निर्णय घ्यायला हवा.
राज्यातील प्रक्रिया
अनेक नामांकित संस्थांना २०१७ नंतर राज्य सरकारतर्फे खासगी विद्यापीठांचा दर्जा देण्यात आला. यात राज्यातील एकोणवीस खासगी विद्यापीठांचा सहभाग आहे. अनेक विद्यापीठांच्या माध्यमातून अभियांत्रिकीचे शिक्षण देण्यात येत आहे. यासाठी महाराष्ट्र सीईटी, जेईई मेन; तसेच खासगी विद्यापीठांची स्वतंत्र सीईटी (उदा. डब्ल्यूपीयू एमईईटी, सेट इ.) व सर्व खासगी विद्यापीठांची एकत्रित 'पेरा सीईटी' अशा अनेक पर्यांयामधून प्रवेश देण्यात येतो. या खासगी विद्यापीठांच्या प्रवेशासाठी त्यांच्याद्वारे घेण्यात येणाऱ्या प्रवेशप्रक्रियेसाठी त्यांच्या वेबसाइटवर वेगळी नोंदणी करणे गरजेचे असते. सीईटी सेलच्या माध्यमातून ही प्रवेश प्रक्रिया होत नाही, याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी; तसेच या विद्यापीठांच्या प्रवेश प्रक्रिया या सरकारच्या प्रवेश प्रक्रियेच्या आधी होतात, त्यामुळे त्यांच्या संकेतस्थळावर वेळापत्रकावर लक्ष देणे गरजेचे असते. एकूणच अभियांत्रिकीसाठी उपलब्ध पर्यांयांपैकी योग्य निवड केल्यास यश संपादन करणे शक्य होऊ शकते.
लेखक- डॉ. दिनेश भुतडा
एमआयटी विश्वशांती विद्यापीठ
-----------------------------------------------------------------------------------
Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play
Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance |
Call 77200 25900 or 77200 81400
11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |
We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.
IIT JAM 2024 Admit Card To Be Released
अभियांत्रिकीतील करिअरच्या संधी
Admit Cards For Graduate Aptitude Test In Engineering
10 Aeronautical Engineering Colleges in India
COEP ADMISSION FOR PH.D. PROGRAMMES 2022-23
Skill shortage: Engineers is not enough; Companies look for problem solvers
विद्यार्थी पालक संवाद २०२२: अभियांत्रिकी शिक्षण-आव्हानात्मक करिअर
अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची तात्पुरती गुणवत्ता यादी होणार जाहीर २०२२
NTA JEE Main 2022: Admit Card Released For June Session
‘पेरा सीईटी’चे अर्ज भरण्याची मुदत २३ मे पर्यंत
Indian Army TGC-136 Course application 2022
इंजिनीअरिंग पदवी प्रवेश प्रक्रियेस मुदतवाढ २०२१
इंजिनीअरिंग प्रथम वर्ष प्रवेश २०२१: पहिल्या फेरीतील प्रवेशांना सुरूवात
JoSAA seat allotment round 5 result declared 2021
पॉलीटेकनीकला प्रवेश घ्यायचा आहे !
दहावीनंतर अभियांत्रिकी पदविका क्षेत्रात करीअर संधी २०२१
औरंगाबाद जेएनईसीत अभियांत्रिकी प्रवेशाची प्रक्रिया सुरू
Admissions for First year engineering from today: Know More
द्वितीय वर्ष इंजिनीअरिंग प्रवेश प्रक्रिया २०२०: वेळापत्रक जाहीर
इंजिनीअरिंगचे शैक्षणिक सत्र आजपासून सुरू: जाणून घ्या
आयआयटी आणि एनआयटीमध्ये इंजिनीअरिंगचे धडे आता मातृभाषेतून
इंजिनीअरिंग प्रवेश प्रक्रिया २०२०: थेट द्वित्तीय वर्ष प्रवेशांना मुदतवाढ
MHT CET answer key to be released today
MHT CET answer key to be issued on 10th Nov
आयबीपीएस स्पेशालिस्ट ऑफिस भरती २०२०: ऑनलाइन अर्ज प्रक्रियेला सुरुवात
MHT CET 2020 Exam & Question Paper Analysis (PCM)
इंजिनीअरिंग प्रवेश २०२०: बारावीच्या किमान गुणांची अट शिथील
IIT Delhi launches BTech in materials engineering 2020
TCS launches Undergraduate Engineering Course
जाणून घ्या इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलीकॉम्युनिकेशन शाखेची माहिती
Required Documents for B.E./ B.Tech 2020
VIT cancels VITEEE 2020
MHT CET 2020 remains postponed till further notice
इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग क्षेत्रात भविष्यातील संधी
NIRF Ranking 2020: Top Engineering Colleges in India
MHT CET 2020: Second Extension
मॅकेनिकल इंजिनियरिंग शाखेतील नौकरीच्या संधीं
12 वी सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी सूचना
MHT-CET 2020 वेळापत्रक जाहीर
JEECUP 2020: Last date to apply extended
TS EAMCET notification 2020 released
Career after Engineering
GATE 2020 exam analysis
WBJEE 2020: ‘Paper follows the pattern of JEE Main’
Upcoming Engineering Entrance Exams 2020
Bennett University announces admissions open for B.Tech.
Telangana Common Entrance Tests Revised 2020 Schedule
अभियांत्रिकीची परीक्षा आता ऑफलाईन; पुणे विद्यापीठाचा निर्णय
WBJEE 2020 admit card released
COMEDK Released Dateshee for UGET 2020
UPPSC Engineering Services Exam 2019
K K Wagh Polytechnic College again awarded as Platinum Institute
Application Process Start For IAF AFCAT 2020
MHT-CET 2020 schedule released
IIT Foundation to accredit engineering colleges
Haryana HSSC Junior Engineer Result 2019 announced
IIT Bombay CEED 2020 schedule released
IIM CAT 2019 Registration Process ends ON 18 Sept
SPPU overhauls engineering syllabus
डिप्लोमांच्या प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ