Engineering

Engineering

बी.टेक द्वितीय वर्ष अभ्यासक्रम २०२२: बीटेकच्या विद्यार्थ्यांसाठी १२ भारतीय भाषांमध्ये पुस्तके उपलब्ध

PUBLISH DATE 4th June 2022

आगामी शैक्षणिक सत्र २०२२-२३ पासून १८ राज्यांमधील इंजिनीअरिंग महाविद्यालयातील (Engineering College) बीटेक द्वितीय वर्षाचे विद्यार्थी इंग्रजी व्यतिरिक्त हिंदीसह १२ भारतीय भाषांमध्ये शिक्षण घेऊ शकणार आहेत.

ऑल इंडिया काऊन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (All India Council for Technical Education, AICTE) ने बी.टेक द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी हिंदी, मराठी, बंगाली, तमिळ, तेलगू, गुजराती, कन्नड, पंजाबी, ओरिया, आसामी, उर्दू आणि मल्याळम भाषेतील पुस्तके तयार केली आहेत.

२९१ लेखक, अनुवादक, प्रमाणीकरणकर्ते आणि भाषा तज्ञांच्या टीमने भारतीय भाषांमधील भाषांतरासाठी काम केले. एआयसीटीईच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांना भारतीय भाषांमध्ये शिक्षण देण्याचा निर्णय घेतला होता.

याअंतर्गत गेल्यावर्षी इंजिनीअरिंगच्या पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्यांना आठ भारतीय भाषांमध्ये शिक्षण घेण्याची संधी मिळाली. इंजिनीअरिंगच्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना १२ भारतीय भाषांमध्ये शिकवण्यासाठी १५०० शिक्षकांनाही प्रशिक्षण दिले जाणार आहे. सध्या बीटेकच्या पहिल्या वर्षात विविध राज्यातील १९ संस्थांमध्ये भारतीय भाषांमध्ये सात विषय शिकवले जात आहेत. यामध्ये २५५ हून अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.

५०० महाविद्यालयात भारतीय भाषांमध्ये बीटेक सुरू करण्याची योजना एआयसीटीईकडून आखली जात आहे. यासाठी बी.टेक तृतीय वर्षाच्या पुस्तकांचे १५ भारतीय भाषांमध्ये भाषांतर करण्याचे काम सुरू आहे. त्यात ५०० तंत्रनिकेतन महाविद्यालयातील ३० हजार विद्यार्थ्यांना जोडण्याची तयारी सुरू आहे.

आयआयटी दिल्लीचा विद्यार्थी कलशने जगातील सर्वोत्कृष्ट कोडरचा किताब पटकावला
आयआयटी दिल्लीचा बीटेक तृतीय वर्षाचा विद्यार्थी कलश गुप्ता याने जगातील सर्वोत्कृष्ट कोडरचा किताब पटकावला आहे. कलश ८७ देशांतील एक लाखाहून अधिक कोडरच्या यादीत अव्वल आहे. संचालक प्राध्यापक रंगन बॅनर्जी यांनी शुक्रवारी कलश गुप्ताचे अभिनंदन करून त्याचा गौरव केला. कलशला १० हजार डॉलर इतकी रक्कम बक्षीस स्वरुपात देण्यात आली. तसेच प्रतिष्ठित सर्वोत्कृष्ट कोडरचा किताब देखील मिळाला आहे. कलशने टीसीएस रिसर्च अँड इनोव्हेशन इन्स्टिट्यूटमध्येही इंटर्नशिप केली आहे.

सुरुवातीला मला पहिल्या तीनमध्येही स्थान मिळेल याची खात्री नव्हती. कारण पहिली समस्या सोडवायला मला अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागला, पण जसजशी मी प्रगती करत गेलो, इतर काही समस्या सोडवत गेलो, तेव्हा मला खात्री होती की मी टॉप ३ मध्ये स्थान मिळवेन अशी प्रतिक्रिया कलशने दिली.

----------------------------------------------------------------------------------------------------

VidyarthiMitra.org

Admission Guidance 2021: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2021 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2021 | JoSSA 2021 | MHT-CET 2021 | MBA 2021 | Pharmacy 2021 | Polytechnic 2021

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News


बी.टेक द्वितीय वर्ष अभ्यासक्रम २०२२: बीटेकच्या विद्यार्थ्यांसाठी १२ भारतीय भाषांमध्ये पुस्तके उपलब्ध
10th July 2020

VIT cancels VITEEE 2020

बी.टेक द्वितीय वर्ष अभ्यासक्रम २०२२: बीटेकच्या विद्यार्थ्यांसाठी १२ भारतीय भाषांमध्ये पुस्तके उपलब्ध
3rd February 2020

Career after Engineering

बी.टेक द्वितीय वर्ष अभ्यासक्रम २०२२: बीटेकच्या विद्यार्थ्यांसाठी १२ भारतीय भाषांमध्ये पुस्तके उपलब्ध
3rd February 2020

GATE 2020 exam analysis

बी.टेक द्वितीय वर्ष अभ्यासक्रम २०२२: बीटेकच्या विद्यार्थ्यांसाठी १२ भारतीय भाषांमध्ये पुस्तके उपलब्ध
24th January 2020

WBJEE 2020 admit card released

बी.टेक द्वितीय वर्ष अभ्यासक्रम २०२२: बीटेकच्या विद्यार्थ्यांसाठी १२ भारतीय भाषांमध्ये पुस्तके उपलब्ध
22nd November 2019

MHT-CET 2020 schedule released