Engineering

Engineering

अभियांत्रिकी व तंत्रज्ञान पदविका अभ्यासक्रम प्रवेश २०२२: थेट द्वितीय वर्षासाठी प्रवेशाची प्रक्रिया

PUBLISH DATE 11th June 2022

बारावीनंतर अभियांत्रिकी व तंत्रज्ञान पदविका अभ्यासक्रमाच्या थेट द्वितीय वर्षाच्या प्रवेशाची प्रक्रिया शुक्रवारपासून सुरू झाली आहे.

या अंतर्गत विद्यार्थ्यांना ८ जुलैपर्यत अर्ज छाननीची पद्धत निवडून ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची अंतिम गुणवत्ता याद्या १५ जुलै रोजी जाहीर केली जाणार आहे. राज्यातील शासकीय, अशासकीय अनुदानित, विद्यापीठ संचालित व खासगी विनाअनुदानित पदविका शैक्षणिक संस्थांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये पूर्णवेळ थेट द्वितीय वर्ष पदविका अभियांत्रिकी व तंत्रज्ञान अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची प्रक्रिया जाहीर झाली आहे.

या प्रवेश प्रक्रियेंतर्गत ऑनलाइन नोंदणी करणे, कागदपत्रांच्या स्कॅन छायाप्रती अपलोड करणे, कागदपत्रे पडताळणी करणे आणि अर्ज निश्चित करणे याचे सविस्तर वेळापत्रक तंत्रशिक्षण संचालनालयाने प्रसिद्ध केले आहे. प्रवेश प्रक्रियेत कागदपत्रांच्या प्रत्यक्ष छाननी प्रक्रियेव्यतीरिक्त ई-स्क्रुटनीचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. राज्य मंडळाच्या मार्च-एप्रिल २०२२ मध्ये झालेल्या बारावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक पात्रता तपशिलामध्ये स्वत:चा परीक्षा आसन क्रमांक भरावा आणि दिलेल्या शुल्क भरून अर्ज पूर्ण करावेत. विद्यार्थ्यांनी अर्जामध्ये दर्शविलेल्या गुणांची पडताळणी करावी आणि दर्शविलेल्या गुणांमध्ये काही तफावत असल्यास आवश्यक दुरुस्तीबद्दल प्रत्यक्ष किंवा ई-स्क्रुटनीद्वारे तक्रार नोंदवावी. गुणांच्या तफावतीबाबत नोंदविलेली तक्रार योग्य आढळल्यास गुणांमध्ये सुधारणा करण्यात येईल. तसेच, सीबीएसई आणि आयसीएसई मंडळाकडून बारावीच्या परीक्षेस नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांनी संबंधित बोर्डाकडून निकाल जाहीर झाल्यानंतर त्यांची शैक्षणिक पात्रता तपशील भरावेत आणि अर्ज पूर्ण करावा,असे तंत्रशिक्षण संचालनालयाने स्पष्ट केले आहे.

अधिक माहिती आणि माहिती पुस्तिकेसाठी संकेतस्थळ :https://dsd22.dte.maharashtra.gov.in

प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक

तपशील : कालावधी

संकेतस्थळावरून अर्ज छाननीची योग्य पद्धत निवडून ऑनलाइन नोंदणी करणे, कागदपत्रांच्या स्कॅन छायाप्रती अपलोड करणे, प्रवेशासाठी कागदपत्रांची पडताळणी आणि अर्ज भरल्याची निश्चित करणे : ८ जुलैपर्यंत

  • तात्पुरत्या गुणवत्ता याद्या प्रदर्शित करणे : ११ जुलै

  • तात्पुरत्या गुणवत्ता याद्यांमध्ये तक्रार असल्यास त्या सादर करणे : १२ ते १४ जुलै

  • अंतिम गुणवत्ता याद्या प्रदर्शित करणे : १५ जुलै

विद्यार्थ्यांसाठी सूचना

  • प्रत्यक्ष स्क्रुटनी पद्धतीसाठी सुविधा केंद्राची यादी संकेतस्थळावर उपलब्ध

  • सुविधा केंद्रे सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत सुरू असतील

  • तंत्रशिक्षण विभागीय कार्यालयाचे पत्ते व दूरध्वनी क्रमांक संचालनालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध

  • चौकशी आणि आयटी सुविधेसाठी जवळच्या सुविधा केंद्राशी संपर्क साधावा

मीनाक्षी गुरव @GMinakshi_Sakal

----------------------------------------------------------------------------------------------------

VidyarthiMitra.org

Admission Guidance 2021: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2021 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2021 | JoSSA 2021 | MHT-CET 2021 | MBA 2021 | Pharmacy 2021 | Polytechnic 2021

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News


अभियांत्रिकी व तंत्रज्ञान पदविका अभ्यासक्रम प्रवेश २०२२: थेट द्वितीय वर्षासाठी  प्रवेशाची प्रक्रिया
10th July 2020

VIT cancels VITEEE 2020

अभियांत्रिकी व तंत्रज्ञान पदविका अभ्यासक्रम प्रवेश २०२२: थेट द्वितीय वर्षासाठी  प्रवेशाची प्रक्रिया
3rd February 2020

Career after Engineering

अभियांत्रिकी व तंत्रज्ञान पदविका अभ्यासक्रम प्रवेश २०२२: थेट द्वितीय वर्षासाठी  प्रवेशाची प्रक्रिया
3rd February 2020

GATE 2020 exam analysis

अभियांत्रिकी व तंत्रज्ञान पदविका अभ्यासक्रम प्रवेश २०२२: थेट द्वितीय वर्षासाठी  प्रवेशाची प्रक्रिया
24th January 2020

WBJEE 2020 admit card released

अभियांत्रिकी व तंत्रज्ञान पदविका अभ्यासक्रम प्रवेश २०२२: थेट द्वितीय वर्षासाठी  प्रवेशाची प्रक्रिया
22nd November 2019

MHT-CET 2020 schedule released