Engineering

Engineering

दृष्टीहीन विद्यार्थीसुद्धा घेऊ शकणार इंजिनीअरिंग, मॅनेजमेंटचे शिक्षण: एआयसीटीईचा महत्वाचा निर्णय

PUBLISH DATE 18th June 2022

इंजिनीअरिंग, मॅनेजमेंट महाविद्यालयातील विशेष विद्यार्थ्यांना अभ्यास करणे आता सोपे होणार आहे.

दृष्टीहीन विद्यार्थ्यांना अभ्यासात येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन टेक्निकल महाविद्यालयांनी ब्रेल लिपी, ऑडिओ आणि डिजिटल माध्यमात पुस्तके उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला आहे. ऑल इंडिया काऊन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशनने (All India Council of Technical Education, AICTE) तांत्रिक महाविद्यालयांना अशा विद्यार्थ्यांसाठी पुस्तके तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. तांत्रिक महाविद्यालयांनाही याची माहिती एआयसीटीईला द्यावी लागणार आहे.

ऑल इंडिया काऊन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (AICTE) चे धोरण आणि शैक्षणिक नियोजन ब्युरोचे सल्लागार डॉ. रमेश उन्नीकृष्णन यांनी सर्व राज्ये आणि तांत्रिक महाविद्यालयांना पत्र लिहिले आहे. तांत्रिक महाविद्यालयात शिकणाऱ्या सर्व दृष्टिहीन विद्यार्थ्यांना सामान्य विद्यार्थ्यांच्या धर्तीवर अभ्यासक्रमाचे साहित्य मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्व तांत्रिक महाविद्यालयांनी अशा विद्यार्थ्यांसाठी ऑडिओ पुस्तके उपलब्ध करून द्यावीत असे या पत्रात म्हटले आहे. अभ्यासक्रमांतर्गत, ब्रेल लिपीत, ऑडिओ बुक्स, कॅपिटल अक्षरांमधील छापील पुस्तके आणि जे काही मजकूर साहित्य डिजिटल स्वरूपात उपलब्ध असेल, तर ते उपलब्ध करून द्यावे असे निर्देशही देण्यात आले आहेत.

भारतीय भाषांमध्ये पुस्तके उपलब्ध
एआयसीटीई आपल्या तांत्रिक महाविद्यालयातील सामान्य विद्यार्थ्यांच्या धर्तीवर विशेष विद्यार्थ्यांना भारतीय भाषांमध्ये पुस्तके उपलब्ध करून देण्याची तयारी करत आहे. तांत्रिक महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना शिक्षणाची समान संधी उपलब्ध करून देणे हा त्याचा उद्देश आहे.

मोफत पुस्तके मिळणार

दृष्टिहीन विद्यार्थ्यांसाठी पुस्तके मोफत उपलब्ध करून दिली जातील, असेही एआयसीटीईने तांत्रिक महाविद्यालयांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. जर तांत्रिक महाविद्यालयांना अभ्यासक्रमाच्या आधारे ब्रेल लिपीत, ऑडिओ बुक्स किंवा डिजिटल पद्धतीने तयार केलेली पुस्तके मिळत असतील, तर त्यांनी प्रकाशकांना त्यांची मोफत छपाई करून देण्याची विनंती करावी असे पत्राद्वारे सांगण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांना मिळणार क्लाउड कॉम्प्युटिंगचे शिक्षण
देशभरातील उच्च शैक्षणिक संस्थांचे विद्यार्थी आता क्लाउड कॉम्प्युटिंग (Cloud computing) आणि मशीन लर्निंग (Machine Learning, ML) चाही अभ्यास करु शकणार आहेत. शिक्षण मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत ऑल इंडिया काऊन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (All India Council for Technical Education, AICTE) आणि अमेझॉन इंटरनेट सर्व्हिस प्रायव्हेड लिमिटेड (Amazon Internet Services Private Limited, AISPL) यांच्यात एक करार करण्यात आला आहे. यामध्ये कोणत्याही उच्च शैक्षणिक संस्थेत नोंदणी केलेल्या १८ वर्षांवरील विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होऊ शकणार आहेत. करोना महामारीच्या काळात प्रत्येक संस्थेच्या योजनांना लक्षणीय गती मिळाल्याचे आम्ही पाहिले. दरम्यान राष्ट्रीय स्तरावर डिजिटल कौशल्ये विकसित करणे ही शिक्षण मंत्रालयाची प्राथमिकता असल्याचे एआयसीटीईचे मुख्य समन्वय अधिकारी डॉ. बुद्ध चंद्रशेखर यांनी सांगितले.

----------------------------------------------------------------------------------------------------

VidyarthiMitra.org

Admission Guidance 2022: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2022 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2022 | JoSSA 2022 | MHT-CET 2022 | MBA 2022 | Pharmacy 2022 | Polytechnic 2022

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News


दृष्टीहीन विद्यार्थीसुद्धा घेऊ शकणार इंजिनीअरिंग, मॅनेजमेंटचे शिक्षण: एआयसीटीईचा महत्वाचा निर्णय
10th July 2020

VIT cancels VITEEE 2020

दृष्टीहीन विद्यार्थीसुद्धा घेऊ शकणार इंजिनीअरिंग, मॅनेजमेंटचे शिक्षण: एआयसीटीईचा महत्वाचा निर्णय
3rd February 2020

Career after Engineering

दृष्टीहीन विद्यार्थीसुद्धा घेऊ शकणार इंजिनीअरिंग, मॅनेजमेंटचे शिक्षण: एआयसीटीईचा महत्वाचा निर्णय
3rd February 2020

GATE 2020 exam analysis

दृष्टीहीन विद्यार्थीसुद्धा घेऊ शकणार इंजिनीअरिंग, मॅनेजमेंटचे शिक्षण: एआयसीटीईचा महत्वाचा निर्णय
24th January 2020

WBJEE 2020 admit card released

दृष्टीहीन विद्यार्थीसुद्धा घेऊ शकणार इंजिनीअरिंग, मॅनेजमेंटचे शिक्षण: एआयसीटीईचा महत्वाचा निर्णय
22nd November 2019

MHT-CET 2020 schedule released