Engineering

Engineering

इंजिनीअरिंग प्रवेश २०२०: बारावीच्या किमान गुणांची अट शिथील

PUBLISH DATE 10th October 2020

 

इंजिनीअरिंग प्रवेशासाठी बारावीच्या किमान गुणांची अट ५ टक्क्यांनी कमी करण्यात आली आहे. यामुळे सीईटीमध्ये किमान १ गुण आणि बारावीला किमान ४५ टक्के गुण मिळवणारा विद्यार्थीही प्रवेशासाठी पात्र होऊ शकणार आहे.

यापूर्वी बारावीच्या गुणांची अट ही ५० टक्के इतकी होती. मागासवर्गासाठी किमान गुणांची अट ही ४० टक्के इतकी असणार आहे.

इंजिनिअरिंग तसेच विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांचे प्रवेश कसे करायचे याबाबतचे राजपत्र राज्य सरकारने शुक्रवारी रात्री उशिरा प्रसिद्ध केले. यामध्ये इंजिनीरिंग पदवी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना बारावीमध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र तसेच गणित (पीसीएम) या तीन विषयांमध्ये किमान ४५ टक्के गुण तर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना ४० टक्के गुण मिळवणे आवश्यक असणार आहे. यापूर्वी ही अट अनुक्रमे ५० व ४५ टक्के इतकी होती. नव्या निकषांनुसार पाच टक्क्यांची अधिक सवलत देण्यात आली आहे.

कर्नाटकसह इतर राज्यांप्रमाणे महारष्ट्रातही ही अट शिथिल करावी, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत होती. मात्र गुणवत्तेचा विचार करत ती मान्य केली जात नव्हती. इंजिनीअरिंग सोबतच औषधनिर्माणशास्त्र, हॉटेल मॅनेजमेंट, विधी पाच वर्षे अभ्यासक्रम, बॅचलर इन फाइन आर्ट, बॅचलर ऑफ डिझाइन या अभ्यासक्रमांसाठीचे बारावीच्या किमान गुणांची अट ही ५० व ४५ टक्क्यांवरून अनुक्रमे ४५ व ४० टक्के अशी करण्यात आली आहे. यामुळे कमी गुण मिळालेले विद्यार्थी कर्नाटकला प्रवेश घेण्यासाठी जातात. ते तेथे न जाता आपल्या राज्यात प्रवेश घेतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

याचबरोबर दरवर्षी रिक्त राहणाऱ्या हजारो जागा भरण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची टीकाही शिक्षण वर्तुळातून होऊ लागली आहे. तसेच आधीच देशातील इंजिनीअरिंग शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या रोजगार कौशल्याबाबत अनेक कंपन्या प्रश्न उपस्थित करत त्यांना पुन्हा प्रशिक्षण देतात. असे असताना ही अट आणखी शिथिल करणे म्हणजे गुणवत्तेसोबत तडजोड होईल, असे मत इंजिनीअरिंग कॉलेजच्या एका माजी प्राचार्यांनी नोंदविले.

 


Related News


इंजिनीअरिंग प्रवेश २०२०: बारावीच्या किमान गुणांची अट शिथील
10th July 2020

VIT cancels VITEEE 2020

इंजिनीअरिंग प्रवेश २०२०: बारावीच्या किमान गुणांची अट शिथील
3rd February 2020

Career after Engineering

इंजिनीअरिंग प्रवेश २०२०: बारावीच्या किमान गुणांची अट शिथील
3rd February 2020

GATE 2020 exam analysis

इंजिनीअरिंग प्रवेश २०२०: बारावीच्या किमान गुणांची अट शिथील
24th January 2020

WBJEE 2020 admit card released

इंजिनीअरिंग प्रवेश २०२०: बारावीच्या किमान गुणांची अट शिथील
22nd November 2019

MHT-CET 2020 schedule released