Schools

Schools

मुंबई महापालिका हद्दीतील शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंद चा निर्णय: महापालिका आयुक्त

PUBLISH DATE 21st November 2020

नववी ते बारावीचे वर्ग सोमवारपासून सुरू होण्याचे नियोजन शिक्षण विभागाकडून केले जात असतानाच, मुंबई महापालिकेच्या हद्दीतील शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंद राहणार असल्याचा निर्णय मुंबई महापालिका आयुक्तांनी घेतला.

यामुळे ठाण्यासह इतर महापालिका परिसरातही २३ नोव्हेंबरला शाळा सुरू होणार का? याबाबत दुपारी संभ्रम होता. अशातच गेल्या दोन दिवसांपासून शिक्षकांच्या करोनाचाचणी, शाळांचे निर्जंतुकीकरण करण्याची तयारी ठाणे, कल्याण-डोंबिवली परिसरात सुरू असतानाच, शुक्रवारी सायंकाळी मुंबईप्रमाणेच या परिसरातही ३१ डिसेंबरपर्यंत शाळा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले. यामुळे येथील पालकांना दिलासा मिळाला आहे.

मुंबई महापालिका हद्दीतील शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंदच राहणार आहेत. करोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी हा निर्णय घेतल्याची माहिती शिक्षण समिती अध्यक्ष संध्या दोषी यांनी दिली. दिल्लीत करोनाची लाट पुन्हा आली आहे. तेथे करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर शाळा सुरू करण्याच्या निर्णयाबाबत पुनर्विचार केला जात होत. अनेक पालकांचाही मुलांना करोनाकाळात शाळेत पाठवण्यास विरोध आहे. राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील नववी ते अकरावीचे वर्ग २३ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मात्र, शाळा सुरू करत असताना स्थानिक प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेऊनच शाळा सुरू कराव्यात. करोनाचा प्रादुर्भाव असलेल्या जिल्ह्यातील शाळा सुरू करत असताना, स्थानिक जिल्हा अधिकारी, गट विकास अधिकारी व शिक्षण अधिकारी यांनी विचार विनिमय करूनच विद्यार्थ्यांचे आरोग्य व शैक्षणिक हित जपूनच निर्णय घ्यावा, अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत.

या आदेशानुसार राज्यातील शाळा सुरू होण्याच्या दृष्टीने स्थानिक प्रशासनाचा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या आदेशानुसार मुंबई महापालिकेच्या आयुक्तांनी तातडीने शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. यासंदर्भात शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत. प्रत्यक्ष वर्ग सुरू झाले नाही, तरी ऑनलाइन शिक्षण सुरूच राहणार आहे. करोना साथीच्या संकटात विद्यार्थी व शिक्षकांचे आरोग्य जपण्यासाठीच शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला असल्याचे शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी प्रसार माध्यमांना सांगितले. लस आल्याशिवाय शाळा सुरू करू नयेत. तसेच नवीन वर्षात शाळा सुरू कराव्यात, अशी मागणी विविध शिक्षक संघटनांनी केली होती. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आल्याने शिक्षकांना दिलासा मिळाला आहे.

Need Admission Guidance 2020-21

Get complete Admission Guidance without stepping out of your house.
Join Telegram Channel https://t.me/VidyarthiMitra_MedicalAdmission

VidyarthiMitra App link https://bit.ly/2ZmcyYY

NEET & JEE Mains Mock Test

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitraहा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा


Related News


मुंबई महापालिका हद्दीतील शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंद चा निर्णय: महापालिका आयुक्त
30th January 2024

MPSOS Result 2023

मुंबई महापालिका हद्दीतील शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंद चा निर्णय: महापालिका आयुक्त
12th January 2024

Delhi Nursery Admissions 2024

मुंबई महापालिका हद्दीतील शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंद चा निर्णय: महापालिका आयुक्त
4th January 2024

EMRS Answer Key 2023-24

मुंबई महापालिका हद्दीतील शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंद चा निर्णय: महापालिका आयुक्त
27th December 2023

NIOS Result 2023 Out

मुंबई महापालिका हद्दीतील शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंद चा निर्णय: महापालिका आयुक्त
21st December 2023

JKBOSE 10th Result 2023 Date

मुंबई महापालिका हद्दीतील शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंद चा निर्णय: महापालिका आयुक्त
11th December 2023

TN Half Yearly Examination 2023

मुंबई महापालिका हद्दीतील शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंद चा निर्णय: महापालिका आयुक्त
22nd November 2023

Delhi Nursery Admissions 2024

मुंबई महापालिका हद्दीतील शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंद चा निर्णय: महापालिका आयुक्त
22nd June 2023

JNVST Result 2023