Schools

Schools

पहिली ते नववीच्या परीक्षा एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात होणार- शिक्षण विभाग

PUBLISH DATE 26th March 2022

राज्यातील पहिली ते नववी आणि इयत्ता अकरावीच्या परीक्षा एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात घेण्यात याव्यात.

तसेच या परीक्षांचा निकाल मे महिन्यांमध्ये जाहीर करण्यात यावा, अशा सूचना शालेय शिक्षण विभागाकडून राज्यातील सर्व शाळांना दिल्या आहेत. मात्र, शालेय शिक्षण विभागाच्या या निर्णयाविरोधात शिक्षण क्षेत्रातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. सर्व शाळांनी परीक्षेची तयारी केली असून, विद्यार्थ्यांची उजळणीही सुरू केली आहे. त्यामुळे शालेय शिक्षण विभागाच्या या निर्णयाने विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर परिणाम होण्याची शक्यता शिक्षण तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे.

राज्यातील पहिली ते आठवीच्या परीक्षा या एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात, तर नववी आणि अकरावीच्या परीक्षा या साधारणपणे दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू झाल्यानंतर काही दिवसांतच सुरू होतात. त्यानुसार राज्यातील सर्व शाळांमध्ये सध्या दहावी आणि बारावीचा पेपर नसेल त्या दिवशी नववी आणि अकरावीची परीक्षा घेण्यात येत आहे. तर पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा १ एप्रिलपासून घेण्याची तयारी शाळा व मुख्याध्यापकांकडून करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांची उजळणी सध्या सुरू असून, अनेक शाळांकडून परीक्षेचे पेपरही तयार केले आहेत. पुढील काही दिवसांमध्ये त्यांची छपाईसुद्धा होईल, असे असताना २४ मार्चला शालेय शिक्षण विभागाने इयत्ता पहिली ते नववी आणि अकरावीची परीक्षा एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात घेण्यासंदर्भातील परिपत्रक काढले आहे. या परिपत्रकावरून शिक्षण क्षेत्रातून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. शालेय शिक्षण विभागाच्या परिपत्रकामुळे विद्यार्थी, पालक व शिक्षकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या इयत्ता नववीच्या परीक्षा सध्या सुरू असल्याने एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात परीक्षा घेण्याची सूचना रद्द करावी, अशी प्रतिक्रिया शिक्षकांकडून व्यक्त करण्यात येत आहेत.

राज्यामध्ये १ मेपासून शाळांना उन्हाळ्याची सुट्टी जाहीर होते. त्यामुळे अनेक पालकांकडून गावाला जाण्याचे गाड्यांचे आरक्षण झालेले आहे. त्यामुळे परीक्षा एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात घेतल्यास त्याचा परिणाम आरक्षणाच्या तिकिटावर होऊन पालकांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे परीक्षा घेण्याचा अधिकार शाळांना देऊन त्यांनी केलेल्या नियोजनानुसार परीक्षा घेऊन एप्रिल महिन्याच्या शेवटी निकाल जाहीर करण्यात यावा, अशी मागणी भाजप शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे यांनी केली आहे. तर शाळांनी कधी परीक्षा घ्याव्यात यात शिक्षण विभागांनी अता पत्र काढून हस्तक्षेप करायची गरज नव्हती. शाळेने स्वत:चे वेळापत्रक ठरवून मुलांना दिलेले आहे. त्यानुसार मुलांनी व पालकांनी तयारी केलेली आहे. मग, परीक्षा, निकाल आणि सुटींचे वेळापत्रक बदलल्यास पालक व मुलांचे सगळे नियोजन बिघडेल, अशी भावना 'शिक्षक भारती'चे जालिंदर सरोदे यांनी व्यक्त केली. तर शालेय शिक्षण विभागाने पुन्हा एकदा निर्णयाला लेतमार्क लावल्याने आणखी एका गोंधळाची भर पडल्याचे शिक्षक परिषदेचे शिवनाथ दराडे यांनी सांगितले.

--------------------------------------------------------------------------------

VidyarthiMitra.org

Admission Guidance 2021: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2021 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2021 | JoSSA 2021 | MHT-CET 2021 | MBA 2021 | Pharmacy 2021 | Polytechnic 2021

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News


पहिली ते नववीच्या परीक्षा एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात होणार- शिक्षण विभाग
29th August 2024

JNV School Admission Process

पहिली ते नववीच्या परीक्षा एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात होणार- शिक्षण विभाग
7th April 2024

DMVS Admission 2024

पहिली ते नववीच्या परीक्षा एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात होणार- शिक्षण विभाग
1st April 2024

PSEB 5th Result 2024 Out

पहिली ते नववीच्या परीक्षा एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात होणार- शिक्षण विभाग
30th January 2024

MPSOS Result 2023

पहिली ते नववीच्या परीक्षा एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात होणार- शिक्षण विभाग
12th January 2024

Delhi Nursery Admissions 2024

पहिली ते नववीच्या परीक्षा एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात होणार- शिक्षण विभाग
4th January 2024

EMRS Answer Key 2023-24

पहिली ते नववीच्या परीक्षा एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात होणार- शिक्षण विभाग
27th December 2023

NIOS Result 2023 Out

पहिली ते नववीच्या परीक्षा एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात होणार- शिक्षण विभाग
21st December 2023

JKBOSE 10th Result 2023 Date

पहिली ते नववीच्या परीक्षा एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात होणार- शिक्षण विभाग
11th December 2023

TN Half Yearly Examination 2023

पहिली ते नववीच्या परीक्षा एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात होणार- शिक्षण विभाग
22nd November 2023

Delhi Nursery Admissions 2024

पहिली ते नववीच्या परीक्षा एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात होणार- शिक्षण विभाग
22nd June 2023

JNVST Result 2023