Schools

Schools

पहिली ते दहावी मराठी अनिवार्य

PUBLISH DATE 27th February 2020

महाराष्ट्रातील सर्व माध्यमांच्या सर्व प्रकारच्या मंडळांच्या शाळांमध्ये पहिले ते दहावीपर्यंत मराठी विषय अनिवार्य करण्याचे विधेयक मराठी भाषा दिनाच्या पूर्वसंध्येला बुधवारी विधान परिषदेच्या सभागृहात एकमताने संमत करण्यात आले.

महाराष्ट्रातील सर्व माध्यमांच्या सर्व प्रकारच्या मंडळांच्या शाळांमध्ये पहिले ते दहावीपर्यंत मराठी विषय अनिवार्य करण्याचे विधेयक मराठी भाषा दिनाच्या पूर्वसंध्येला बुधवारी विधान परिषदेच्या सभागृहात एकमताने संमत करण्यात आले. या कायद्याची अंमलबजावणी न करणाऱ्या शाळेच्या प्रमुखांना एक लाख रुपये दंड ठोठावला जाईल. तसेच अशा शाळांची मान्यतादेखील काढून घेण्याची स्पष्ट तरतूद या विधेयकात आहे. या विधेयकाची अंमलबजावणी सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षापासून होईल, असे सरकारने स्पष्ट केले.

मराठी शाळांमध्ये मराठी भाषेचे अनिवार्य अध्यापन व अध्ययन विधेयक मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी बुधवारी विधान परिषदेत मांडले. हे विधेयक विधान परिषदेत एकमताने संमत करण्यात आले. सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षापासून याची अंमलबजावणी होईल. यंदा केवळ पहिली आणि सहावीच्या विद्यार्थ्यांना मराठी विषय अनिवार्य असेल. पुढच्या पाच वर्षांत सर्व इयत्तांमध्ये मराठी विषय अनिवार्य केला जाणार आहे.

या कायद्याची अंमलबजावणी न करणाऱ्या शाळेच्या प्रमुखांना एक लाख रुपये दंड ठोठावला जाईल. तसेच अशा शाळांची मान्यता देखील काढून घेण्यात येणार आहे. या कायद्यातून कोणाला सूट द्यायचे अधिकार मात्र सरकारकडे असतील. आयसीएसई, सीबीएसई, एनआयओएस, आयजीसीएसई, एमआयईबी, सीआयएसई, बॅकलोरिएट, आयबी, ओरिएंटल तसेच सर्व मंडळांच्या शाळांना हा कायदा लागू असेल, असे मंत्री देसाई म्हणाले. विधान परिषदेत शिवसेनेचे दिवाकर रावते, राष्ट्रवादी काँग्रेसचे हेमंत टकले, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, शिक्षक भारतीचे कपिल पाटील, काँग्रेसचे शरद रणपिसे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधेयकाचे समर्थन करणारी भाषणे केली. आपल्या कारकिर्दीत हे विधेयक मांडण्याचे भाग्य मिळाले, अशी कृतज्ञतेची भावना मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.

 

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

For all latest Govt Jobs 2019Railway JobsBank Jobs and SSC Jobs log on to https://goo.gl/YPjt94 We bring you fastest and relevant notifications on Bank, Railways and Govt Jobs. Stay Connected

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा

-----------------------------------------------------------------------------

 


Related News


पहिली ते दहावी मराठी अनिवार्य
30th January 2024

MPSOS Result 2023

पहिली ते दहावी मराठी अनिवार्य
12th January 2024

Delhi Nursery Admissions 2024

पहिली ते दहावी मराठी अनिवार्य
4th January 2024

EMRS Answer Key 2023-24

पहिली ते दहावी मराठी अनिवार्य
27th December 2023

NIOS Result 2023 Out

पहिली ते दहावी मराठी अनिवार्य
21st December 2023

JKBOSE 10th Result 2023 Date

पहिली ते दहावी मराठी अनिवार्य
11th December 2023

TN Half Yearly Examination 2023

पहिली ते दहावी मराठी अनिवार्य
22nd November 2023

Delhi Nursery Admissions 2024

पहिली ते दहावी मराठी अनिवार्य
22nd June 2023

JNVST Result 2023