Schools

Schools

बारावीच्या विद्यार्थ्यांना हॉल तिकिट उपलब्ध

PUBLISH DATE 21st January 2020

बारावीची परीक्षा महिन्यावर आली असताना परिक्षेचे प्रवेशपत्र (हॉल तिकिट) कधी मिळणार असा प्रश्‍न विद्यार्थी विचारत होते. यावर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवार २१ जानेवारीपासून महाविद्यालयांच्या लॉगिनवर प्रवेशपत्र उपलब्ध केले जाणार आहे. विद्यार्थ्यांना महाविद्यालयांमार्फत प्राप्त करता येतील. अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव डॉ.अशोक भोसले यांनी दिली आहे. 

 

डॉ.भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंडळाशी संलग्न असलेल्या सर्व उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांचे मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक, विद्यार्थी व पालकांना फेब्रुवारी - मार्च २०२० मध्ये होणार्‍या इयत्ता बारावीच्या परिक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे कळविले आहे. त्यानुसार परीक्षेचे प्रवेशपत्र ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या www.mahahsscboard.in या वेबसाईटवर कॉलेज लॉगीनमध्ये डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध होतील. 

 

या संदर्भात काही तांत्रिक अडचण उद्भवल्यास महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा. महाविद्यालयांनी प्रवेशपत्र प्रिंट करून विद्यार्थ्यांना द्यायची आहेत. प्रवेशपत्र ऑनलाईन पध्दतीने प्रिटींग करताना विद्यार्थ्यांकडून कोणतेही वेगळे शुल्क घेऊ नये. प्रवेशपत्रची प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापकांचा, प्राचार्यांचा शिक्का मारून स्वाक्षरी करावी. प्रवेशपत्रमध्ये विषय व माध्यम बदल असतील तर त्यांच्या दुरुस्त्या उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळात जाऊन करुन घ्यायच्या आहेत.

 

प्रवेशपत्रवरील फोटो, स्वाक्षरी, विद्यार्थ्याचे नाव या संदर्भातील दुरुस्त्या उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी त्यांच्या स्तरावर करुन त्यांची एक प्रत विभागीय मंडळाकडे त्वरीत पाठवावयाची आहे. प्रवेशपत्र विद्यार्थ्यांकडून गहाळ झाल्यास संबंधित महाविद्यालयांनी पुन्हा प्रिंट काढून त्यावर लाल शाईने व्दितीय प्रत असा शेरा देऊन विद्यार्थ्यांना द्यायचे आहे. फोटो सदोष असल्यास त्यावर विद्यार्थ्याचा फोटो चिकटवून त्यावर संबंधित मुख्याध्यापक, प्राचार्य यांनी शिक्का मारून स्वाक्षरी करायची आहे. अशा स्पष्ट सूचना डॉ. भोसले यांनी दिल्या आहेत.

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

For all latest Govt Jobs 2019Railway JobsBank Jobs and SSC Jobs log on to https://goo.gl/YPjt94 We bring you fastest and relevant notifications on Bank, Railways and Govt Jobs. Stay Connected

| Cutoffs 2020 |

 

| Govt. & Private Jobs, Internships, Campus Drive, Off-campus & many more |

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा

-----------------------------------------------------------------------------


Related News


बारावीच्या विद्यार्थ्यांना हॉल तिकिट उपलब्ध
30th January 2024

MPSOS Result 2023

बारावीच्या विद्यार्थ्यांना हॉल तिकिट उपलब्ध
12th January 2024

Delhi Nursery Admissions 2024

बारावीच्या विद्यार्थ्यांना हॉल तिकिट उपलब्ध
4th January 2024

EMRS Answer Key 2023-24

बारावीच्या विद्यार्थ्यांना हॉल तिकिट उपलब्ध
27th December 2023

NIOS Result 2023 Out

बारावीच्या विद्यार्थ्यांना हॉल तिकिट उपलब्ध
21st December 2023

JKBOSE 10th Result 2023 Date

बारावीच्या विद्यार्थ्यांना हॉल तिकिट उपलब्ध
11th December 2023

TN Half Yearly Examination 2023

बारावीच्या विद्यार्थ्यांना हॉल तिकिट उपलब्ध
22nd November 2023

Delhi Nursery Admissions 2024

बारावीच्या विद्यार्थ्यांना हॉल तिकिट उपलब्ध
22nd June 2023

JNVST Result 2023