Schools

Schools

सीबीएसई बोर्डांतर्गत दहावीच्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन करण्यासाठी आराखडा जाहीर

PUBLISH DATE 11th May 2021

सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (CBSE) बोर्डांतर्गत येणाऱ्या दहावीच्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन करण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला असून, या आराखड्यामध्ये देण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करून निकाल (CBSE 10th Result 2021) जाहीर करण्यात येणार आहेत.

या निकालासाठी प्रत्येक शाळेने सात सदस्यांची निकाल समिती नियुक्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शाळांमध्ये झालेल्या विविध ऑनलाइन परीक्षा प्रकारांसाठी विशिष्ट गुण नमूद करण्यात आले आहेत.

निकाल कधी?
सीबीएसई बोर्डाने दहावीच्या निकालाची तयारी सुरू केली आहे. बोर्डाने ई-परीक्षा पोर्टलवर एक लिंक अॅक्टिव्ह केली आहे. यासह देशभरातील शाळांना निर्देश दिले आहेत की या पोर्टलवर विद्यार्थ्यांचे गुण अपलोड करण्यास सुरूवात करावी. शाळांना दहावीचा निकाल तयार करण्यासाठी २५ मे पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. यानंतर ५ जून २०२१ पर्यंत दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांचे गुण या पोर्टलवर अपलोड करायचे आहेत. हे गुण अपलोड झाल्यानंतर सीबीएसई अंतिम निकाल तयार करणार आहे. बोर्डाच्या माहितीनुसार २० जून २०२१ पर्यंत सीबीएसई दहावी निकालाची घोषणा केली जाईल.

सीबीएसई अंतर्गत येणाऱ्या सर्व शाळांना या आराखड्यानुसार विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करायचे आहे. यामध्ये प्रत्येक शाळेकडून नियुक्त करण्यात येणाऱ्या ‘निकाल समिती’मध्ये मुख्याध्यापक यांच्या अध्यक्षतेखाली सात शिक्षकांची समिती असणार आहे. ज्यामध्ये गणित, भाषा, विज्ञान, सामाजिक शास्त्र असे विषय शिकवणारे पाच शिक्षक असतील, तर दोन शिक्षक परिसरातील इतर सीबीएसईच्या शाळांमधील असणार आहेत. निकालाची प्रक्रिया नि:पक्ष पद्धतीने पार पडावी, यासाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे.

सीबीएसईच्या शाळांमध्ये वर्षभरात दहावीच्या विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या परीक्षा घेण्यात आल्या. वर्षभराचे मूल्यांकन करण्यासाठी प्रत्येक परीक्षेतील कामगिरीनुसार विद्यार्थ्यांना गुण द्यायचे आहेत. चाचणी परीक्षेसाठी दहापैकी, सहामाही परीक्षेसाठी तीसपैकी आणि दहावी पूर्व परीक्षेसाठी चाळीस पैकी गुण द्यावेत, असे निश्चित करण्यात आले आहे. एखाद्या शाळेने जर तीन किंवा चार पूर्व परीक्षा घेतल्या असतील, तर त्या परीक्षांपैकी ज्या परीक्षेत विद्यार्थ्यांची कामगिरी चांगली आहे, ती परीक्षा गृहित धरावी, असेही बोर्डाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. ज्या शाळेने कोणतीही परीक्षा घेतलेली नाही त्या शाळेच्या ‘निकाल समिती’वर गुणांकन करण्याची जबाबदारी असणार आहे.

-----------------------------------------------------------------------------------

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitraहा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News


सीबीएसई बोर्डांतर्गत दहावीच्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन करण्यासाठी आराखडा जाहीर
7th April 2024

DMVS Admission 2024

सीबीएसई बोर्डांतर्गत दहावीच्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन करण्यासाठी आराखडा जाहीर
1st April 2024

PSEB 5th Result 2024 Out

सीबीएसई बोर्डांतर्गत दहावीच्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन करण्यासाठी आराखडा जाहीर
30th January 2024

MPSOS Result 2023

सीबीएसई बोर्डांतर्गत दहावीच्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन करण्यासाठी आराखडा जाहीर
12th January 2024

Delhi Nursery Admissions 2024

सीबीएसई बोर्डांतर्गत दहावीच्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन करण्यासाठी आराखडा जाहीर
4th January 2024

EMRS Answer Key 2023-24

सीबीएसई बोर्डांतर्गत दहावीच्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन करण्यासाठी आराखडा जाहीर
27th December 2023

NIOS Result 2023 Out

सीबीएसई बोर्डांतर्गत दहावीच्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन करण्यासाठी आराखडा जाहीर
21st December 2023

JKBOSE 10th Result 2023 Date

सीबीएसई बोर्डांतर्गत दहावीच्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन करण्यासाठी आराखडा जाहीर
11th December 2023

TN Half Yearly Examination 2023

सीबीएसई बोर्डांतर्गत दहावीच्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन करण्यासाठी आराखडा जाहीर
22nd November 2023

Delhi Nursery Admissions 2024

सीबीएसई बोर्डांतर्गत दहावीच्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन करण्यासाठी आराखडा जाहीर
22nd June 2023

JNVST Result 2023