CBSE

CBSE

सीबीएसई बोर्डातर्फे दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची श्रेणीसुधार परीक्षा २५ ऑगस्टपासून सुरु होणार

PUBLISH DATE 24th August 2021

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (CBSE) दहावी आणि बारावी बोर्डाची परीक्षा २०२१ ही २५ ऑगस्ट २०२१ पासून होणार आहे.

सीबीएसईच्या खासगी विद्यार्थ्यांसाठी आणि जुलै २०२१ मध्ये जाहीर झालेल्या निकालावर समाधानी नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी ऑफलाइन परीक्षा होत आहे.

प्रवेशपत्र संबंधित शाळेतून घ्यावे लागणार
सीबीएसई बोर्डाने २० ऑगस्ट २०२१ रोजी ऑफलाइन परीक्षेला बसलेल्या खासगी विद्यार्थ्यांसाठी प्रवेशपत्र जारी केले होते. नियमित विद्यार्थ्यांना आपापल्या शाळेतून प्रवेशपत्रे घ्यावी लागतील. प्रवेशपत्र हे परीक्षेत बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य आहे हे ऑफलाइन परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांनी लक्षात घ्यावे. सीबीएसई बोर्ड परीक्षा २०२१ ही १५ सप्टेंबर २०२१ रोजी संपणार आहे.

दहावीच्या परीक्षेत गणिताचा शेवटचा पेपर
दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा माहिती तंत्रज्ञानाच्या पेपरने सुरु होणार असून गणिताचा पेपर शेवटचा असणार आहे. दुसरीकडे बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा इंग्रजीसह मूलभूत विषय म्हणून सुरू होणार असून होम सायन्सचा शेवटचा पेपर असणार आहे.

परीक्षेत अनुपस्थित असाल तर?
सीबीएसई बोर्ड परीक्षा २०२१ ऑफलाइन माध्यमातून करोना प्रोटोकॉलचे काटेकोर पालन करून घेतली जाईल. जर नोंदणीकृत नियमित उमेदवार परीक्षेला अनुपस्थित राहीले तर अंतर्गत मूल्यमापन धोरणानुसार मिळालेले गुण अंतिम मानले जाणार आहेत.

CBSE Admit Card 2021: दहावी आणि बारावी परीक्षेसाठी प्रवेश पत्र असे करा डाऊनलोड

सर्वात आधी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाइट cbse.gov.in ला भेट द्या.
वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या 'खासगी विद्यार्थ्यांसाठी प्रवेशपत्र' सेक्शनमध्ये थेट लिंकवर क्लिक करा.
त्यानंतर CBSE प्रायव्हेट आणि रेग्यूलर उमेदवार प्रवेशपत्र २०२१ लिंकवर क्लिक करा.
क्रेडेंशियल एंटर करुन प्रवेशपत्र डाऊनलोड करा.
भविष्यातील उपयोगासाठी CBSE प्रायव्हेट आणि रेग्यूलर विद्यार्थी प्रवेशपत्र २०२१ ची प्रिंट घ्या.

-----------------------------------------------------------------------------------

Free Online Mock Test for 11th CET and MHT-CET, JEE, NEET

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitraहा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News


सीबीएसई बोर्डातर्फे दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची  श्रेणीसुधार परीक्षा २५ ऑगस्टपासून सुरु होणार
1st January 2024

CBSE Exams 2024

सीबीएसई बोर्डातर्फे दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची  श्रेणीसुधार परीक्षा २५ ऑगस्टपासून सुरु होणार
27th September 2019

CBSE Sample Papers 2020