CBSE

CBSE

सीबीएसई बारावीची श्रेणीसुधार परीक्षा सप्टेंबरमध्ये होणार

PUBLISH DATE 15th August 2020

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईची इयत्ता बारावीची श्रेणीसुधार परीक्षी सप्टेंबर महिन्यात होणार आहे. सीबीएसई बोर्डाने ही माहिती दिली.

ही परीक्षा कोविड - १९ महामारीमुळे रद्द झाली होती. गेल्या महिन्यात तिचा निकाल जाहीर झाला आहे. दरम्यान, सीबीएसई दहावी, बारावीच्या फेरपरीक्षादेखील सप्टेंबर महिन्यात होणार आहेत. या परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक अद्याप जाहीर झालेले नाही.

'ज्या विद्यार्थ्यांना त्यांच्या बारावीच्या गुणांमध्ये किंवा श्रेणीमध्ये सुधारणा करायची आहे त्यांच्यासाठी सप्टेंबर महिन्यात परीक्षा घेण्यात येणार आहे. ही परीक्षा ऐच्छिक आहे. यासोबतच दहावी आणि बारावीची कम्पार्टमेंट परीक्षा (फेरपरीक्षा) देखील सप्टेंबरमध्ये होणार आहे. परीक्षांच्या तारखा लवकरच जाहीर होतील,' असे सीबीएसईचे परीक्षा नियंत्रक सन्यम भारद्वाज म्हणाले.

ते पुढे म्हणाले, 'या परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना जे गुण मिळतील ते अंतिम असतील. नियमित विद्यार्थ्यांनी त्यांच्या शाळांमार्फत अर्ज करायचे आहेत, तर खासगीरित्या परीक्षा देणारे विद्यार्थी थेट बोर्डाच्या संकेतस्थळावरील लिंकवरून अर्ज करू शकतील. २२ ऑगस्टपर्यंत ही अर्ज प्रक्रिया सुरू राहणार आहे.'

विद्यार्थ्यांना परीक्षेच्या वर्षाच्या कालावधीतल्या सिलॅबसमधील प्रश्न येतील. विद्यार्थ्यांनी पात्रता निकष, उत्तीर्णतेचे निकष, अभ्यासक्रम आणि योजनेची संपूर्ण माहिती घेऊन मगच परीक्षेसाठी अर्ज करावा असेही भारद्वाज यांनी सांगितले.

यावर्षी सीबीएसई बारावीत विद्यार्थिनींचे उत्तीर्णतेचे प्रमाण विद्यार्थ्यांच्या तुलनेत सुमारे सहा टक्के अधिक आहे. निकालाची एकूण टक्केवारी ५.३८ टक्क्यांनी वाढली आहे. गेल्यावर्षीचा बारावीचा निकाल ८३.४० टक्के होता तर यावर्षी तो ८८.७८ टक्के आहे.

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News


सीबीएसई बारावीची श्रेणीसुधार परीक्षा सप्टेंबरमध्ये होणार
1st January 2024

CBSE Exams 2024

सीबीएसई बारावीची श्रेणीसुधार परीक्षा सप्टेंबरमध्ये होणार
27th September 2019

CBSE Sample Papers 2020