CBSE

CBSE

सीबीएसई बोर्डातर्फे नव्या पॅटर्ननुसार नमुना प्रश्नपत्रिका लवकरच उपलब्ध केल्या जाणार

PUBLISH DATE 28th April 2021

केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डाने (CBSE) २०२१-२२ या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता नववी ते बारावीच्या प्रश्नपत्रिकेचा पॅटर्न (New CBSE Pattern) बदलला आहे.

यासंदर्भातील सविस्तर माहिती बोर्डाने यापूर्वीच जारी केली आहे. आता या नव्या पॅटर्ननुसार नमुना प्रश्नपत्रिकाय तयार केल्या जात आहे.

या नमुना प्रश्नपत्रिका लवकरच बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध केले जातील, जेणेकरून शिक्षकांसह विद्यार्थी देखील या नव्या पेपर पॅटर्ननुसार तयारी करू शकतील. नवा पॅटर्न समजण्यासही या नमुना प्रश्नपत्रिकांची मदत होणार आहे.

शैक्षणिक वर्ष २०२१-२२मध्ये इयत्ता नववी ते बारावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना कार्य आधारित प्रश्नांची संख्या जास्त असणार आहे. प्रत्यक्ष जीवनात वावरताना कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांपासून ते अवघड समस्येवरचे पर्याय अशा विविध प्रकारच्या समस्यांवर मात करणाऱ्या क्षमता विद्यार्थ्यांमध्ये याव्यात यादृष्टीने हा नवा पॅटर्न लागू करण्यात आला आहे.

काय आहे नवे पॅटर्न?
नवीन शिक्षण धोरणात इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना कार्य आधारित शिक्षण देण्यावर विशेष भर दिला आहे. नवीन नियमांनुसार इयत्ता नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना कार्यक्षमतेवर आधारित हे किमान ३० टक्के असणार आहेत. हे प्रश्न प्रसंगावर आधारित अथवा बहुपर्यायी अशा विविध मार्गांनी विद्यार्थ्यांना विचारता येऊ शकतात. याचबरोबर २० टक्के प्रश्न हे बहुपर्यायी प्रश्न असतील, तर उर्वरित ५० टक्के प्रश्न सविस्तर उत्तरे लिहा या प्रकारची असतील. तर इयत्ता अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करत असताना कार्यक्षमतेवर आधारित हे किमान २० टक्के असणार आहेत. हे प्रश्न प्रसंगावर आधारित अथवा बहुपर्यायी अशा विविध मार्गांनी विद्यार्थ्यांना विचारता येऊ शकतात. याचबरोबर २० टक्के प्रश्न हे बहुपर्यायी प्रश्न असतील, तर उर्वरित ४० टक्के प्रश्न सविस्तर उत्तरे लिहा या प्रकारची असतील, असे मंडळाने पाठवलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

-----------------------------------------------------------------------------------

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitraहा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News


सीबीएसई बोर्डातर्फे नव्या पॅटर्ननुसार नमुना प्रश्नपत्रिका लवकरच उपलब्ध केल्या जाणार
1st January 2024

CBSE Exams 2024

सीबीएसई बोर्डातर्फे नव्या पॅटर्ननुसार नमुना प्रश्नपत्रिका लवकरच उपलब्ध केल्या जाणार
27th September 2019

CBSE Sample Papers 2020