CBSE

CBSE

सीबीएसई बारावी परीक्षा २०२१: पेपर पॅटर्नमध्ये बदल

PUBLISH DATE 25th November 2020

सीबीएसईने २०२१ मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांसाठी ३० टक्के अभ्यासक्रम कमी करण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला आहे.

कोविड -१९ आणि शैक्षणिक सत्राला विलंब या कारणांमुळे हा निर्णय घेण्यात आला होता. आता बोर्डाने पुढील वर्षी होणाऱ्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेच्या पॅटर्नमध्येही बदल केला आहे.

२०२१ च्या परीक्षेसाठी बोर्डाने नमुना प्रश्नपत्रिका पाठविल्यानंतर शाळांनी या संदर्भात माहिती दिली आहे. शाळांनी असे म्हटले आहे की बारावीच्या प्रश्नपत्रिकांमध्ये यावेळी बहुपर्यायी प्रश्नांना (एमसीक्यू) गुणात्मक दृष्ट्या जास्त महत्त्व दिले गेले आहे. त्याचबरोबर केस स्टडी आधारित प्रश्नांचे वेटेजही वाढले आहे.

दहावी व बारावीच्या नमुना प्रश्नपत्रिका जारी झाल्यानंतर शाळांनी माहिती दिली की बहुपर्यायी प्रश्नांचे वेटेज १० टक्क्यांपर्यंत वाढविण्यात आले आहे. पूर्वी जिथे ज्ञान आधारित प्रश्न विचारले जात असत, त्याऐवजी बोर्ड आता अंडरस्टँडिंग आणि अॅप्लिकेशन बेस्ड प्रश्नांकडे वळत आहे.

भौतिकशास्त्रासारख्या विषयात विचार कौशल्य (thinking skills) आणि तर्क आधारित (reasoning) प्रश्नांचा समावेश करण्यात आला आहे. त्याच वेळी, जीवशास्त्रातील एमसीक्यूची जागा लघुत्तरी प्रश्नांनी घेतलीली आहे. गणितांमध्ये प्रश्नांची संख्या ३६ वरून ३८ करण्यात आली आहे.

हे आहेत मुख्य बदल -

  1. MCQ प्रश्नांना अधिक महत्त्व.
  2. इंग्रजीत सुमारे ५० टक्के प्रश्न एमसीक्यू प्रकारचे.
  3. गणित आणि फिजिक्स मध्ये केस स्टडी बेस्ड प्रश्न.
  4. फिजिक्समध्ये अॅसर्शन, रिजनिंग बेस्ड प्रश्न.
  5. बायोलॉजीमध्ये एमसीक्यूऐवजी एकेका गुणांचे लघुत्तरी प्रश्न. या प्रश्नांची संख्या ५ वरून वाढवून १४ करण्यात आली आहे.
  6. इकॉनॉमिक्समध्ये एमसीक्यू प्रश्नांची संख्या ८ वरून २० करण्यात आली आहे.

Get complete Admission Guidance without stepping out of your house.

Engineering & Pharmacy : https://t.me/VidyarthiMitra_AdmissionGuidance

Medical Admissions : https://t.me/VidyarthiMitra_MedicalAdmission

VidyarthiMitra App link https://bit.ly/2ZmcyYY

NEET & JEE Mains Mock Test

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitraहा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News


सीबीएसई बारावी परीक्षा २०२१: पेपर पॅटर्नमध्ये बदल
1st January 2024

CBSE Exams 2024

सीबीएसई बारावी परीक्षा २०२१: पेपर पॅटर्नमध्ये बदल
27th September 2019

CBSE Sample Papers 2020