CBSE

CBSE

सीबीएसईतर्फे शिक्षकांसाठी मल्टी स्किल फाऊंडेशन कोर्स सुरु २०२१

PUBLISH DATE 21st June 2021

 सीबीएसईने शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी महत्वाचे पाऊल उचलले आहे. CBSE तर्फे मल्टी स्किल फाऊंडेशन कोर्स सुरु करण्यात आला आहे.

केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड (सीबीएसई) ने लॅंड-अ-हॅंड संस्थेसोबत मिळून हा उपक्रम सुरु केला आहे. 'मल्टी स्किल फाउंडेशन कोर्स' च्या मूळ संकल्पनेवर एक ऑनलाईन लर्निंग आणि असेसमेंट मॉड्यूल तयार केले आहे.

CBSE च्या शिक्षकांसाठी हा कोर्स २९ जून ते ८ जुलैपर्यंत उपलब्ध असणार आहे. या कोर्समध्ये भाग घेण्याचे आवाहन CBSE तर्फे करण्यात आले आहे. या कोर्सचे ३ मॉड्यूल आहेत. पहिले मॉड्यूल हे औद्योगिक विषयावर आहे. यामध्ये कार्यशाळा आणि इंजिनियरींग टेक्निक, उर्जा आणि पर्यावरण हे विषय आहेत.

दुसरे मॉड्यूल हे जीवन विज्ञान विषयावर आहेत. बागवानी, नर्सरी आणि कृषी तंत्र आणि खाद्य संवर्धन तंत्र हे विषय यामध्ये येतात. अधिकृत माहितीनुसार मॉड्यूलमधील विषय हे रोजगार योग्यता कौशल्य आणि व्यावसायिक शिक्षणशास्त्रावर आधारित आहेत. तीन मॉड्यूलमध्ये पास होण्यासाठी कमीतकमी ५०टक्के गुण असणे गरजेचे आहे.

या प्रक्रियेत सहभागी व्हायचे असेल तर CBSEच्या शिक्षकांना अर्ज करणे गरजेचे आहे. त्याशिवाय ओरिएंटेशन सेशनमध्ये सहभागी होता येणार नाही. यासोबत तुम्हाला प्रशिक्षण लिंक आणि असेसमेंटमध्ये देखील सहभागी होता येणार नाही. उमेदवार २७ जूनपर्यंत अर्ज करु शकतात.

CBSE च्या संकेतस्थळावर थेट जाण्यासाठी इथे क्लिक करा.
मल्टी स्किल फाऊंडेशनची नोटीफिकेशन पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

-----------------------------------------------------------------------------------

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitraहा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.

 


Related News


सीबीएसईतर्फे शिक्षकांसाठी मल्टी स्किल फाऊंडेशन कोर्स सुरु २०२१
1st January 2024

CBSE Exams 2024

सीबीएसईतर्फे शिक्षकांसाठी मल्टी स्किल फाऊंडेशन कोर्स सुरु २०२१
27th September 2019

CBSE Sample Papers 2020