CBSE

CBSE

सीबीएसईतर्फे विद्यार्थ्यांना डुप्लिकेट अ‍ॅकॅडमिक डॉक्युमेंट मिळण्यासाठी ‘डीएडीएस’ पोर्टल सुरू २०२१

PUBLISH DATE 28th June 2021

कोणतीही पदवी किंवा कोर्स पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना शाळा वा महाविद्यालयाकडून प्रशस्तीपत्रक आणि गुणपत्रिका ( मार्कशीट) दिले जाते.

या गुणपत्रिकांपैकी १० वी आणि १२ वी ची गुणपत्रिका अत्यंत महत्त्वाची समजली जाते. कोणत्याही नव्या ठिकाणी प्रवेश घेताना किंवा ऑनलाइन एखादा फॉर्म भरताना आवर्जुन १०-१२ वीची गुणपत्रिका विचारली जाते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीकडे मार्कशीट असणं अत्यंत गरजेचं आहे. परंतु, एखाद्या वेळी तुमची गुणपत्रिका हरवली तर? खासकरुन CBSE च्या मुलांची गुणपत्रिका हरवली तर त्यांना बरीच मेहनत करुन ही गुणपत्रिका परत मिळवावी लागते. यासाठी त्यांना स्थानिक कार्यालयात जाऊन नवीन डॉक्युमेंट्ससाठी अप्लाय करावं लागतं. परंतु, आता CBSE ची मुलं घरबसल्या त्यांची हरवलेली १०वी- १२ वीची मार्कशीट सहज मिळवू शकतात.

CBSEच्या मुलांना आता त्यांची हरवलेली मार्कशीट परत मिळवण्यासाठी अजिबात धावपळ करण्याची गरज नाही. घरी राहूनच ते ऑनलाइन डुप्लिकेट मार्कशीट मिळवू शकतात. मुलांची हरवलेली किंवा गहाळ झालेली मार्कशीट परत मिळावी यासाठी CBSE ने डुप्लिकेट अॅकॅडमी डॉक्युमेंट सिस्टीम (DADS) हे नवीन पोर्टल सुरु केलं आहे. या नव्या पोर्टलच्या माध्यमातून मुलांना त्यांची मार्कशीट परत मिळता येणार आहे.

"अॅकॅडमिक डॉक्युमेंट्सची डुप्लिकेट कॉपी मिळावी यासाठी आमच्याकडे अनेक मुलांचे अर्ज येत असतात. या मुलांचे एकतर डॉक्युमेंट्स हरवले असतात किंवा खराब झालेले असतात. त्यातच कोरोना काळात मुलांना स्थानिक कार्यालयामध्ये जावं लागू नये यासाठी आम्ही हे नवीन पोर्टल सुरु केलं आहे", असं CBSE बोर्डाकडून सांगण्यात आलं.

वेळ आणि पैसा दोघांचीही बचत

"कोविड काळात मुलांना त्रास होऊ नये यासाठी आमच्या आयटी विभागाने हा सुरक्षित, जलद आणि आर्थिक समाधान मिळवणारा तोडगा काढला. यासाठी आम्ही इनहाऊस पोर्टल DADS ची सुरुवात केली. या पोर्टलच्या माध्यमातून विद्यार्थी व पालक घरबसल्या त्यांची मार्कशीट, पासिंग सर्टिफिकेट, मायग्रेशन सर्टिफिकेटची डुप्लिकेट कॉपी घेऊ शकतात, " असंही बोर्डाकडून सांगण्यात आलं.

अशा प्रकारे मिळवा हरवलेली मार्कशीट

हरवलेल्या मार्कशीटची कॉपी मिळवण्यासाठी प्रथम विद्यार्थ्यांना CBSE च्या www.cbse.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल. त्यानंतर https://cbseit.in/cbse/web/dads/home.aspx या दुसऱ्या लिंकवर जाऊन त्यांना डुप्लिकेट मार्कशीट किंवा अन्य कागदपत्रांसाठी अप्लाय करावं लागेल. त्यानंतर रिजनल ऑफिसला हा अर्ज मिळेल व ते स्पीड पोस्टाने विद्यार्थ्यांच्या घरी डॉक्युमेंट्सची कॉपी पाठवून देतील.

-----------------------------------------------------------------------------------

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitraहा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News


सीबीएसईतर्फे विद्यार्थ्यांना डुप्लिकेट अ‍ॅकॅडमिक डॉक्युमेंट मिळण्यासाठी ‘डीएडीएस’ पोर्टल सुरू २०२१
1st January 2024

CBSE Exams 2024

सीबीएसईतर्फे विद्यार्थ्यांना डुप्लिकेट अ‍ॅकॅडमिक डॉक्युमेंट मिळण्यासाठी ‘डीएडीएस’ पोर्टल सुरू २०२१
27th September 2019

CBSE Sample Papers 2020