CBSE

CBSE

सीबीएसई बोर्डातर्फे आठवी ते दहावीचे विद्यार्थ्यांसाठी सायन्स चॅलेंज स्पर्धा २०२२

PUBLISH DATE 19th January 2022

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE)परीक्षेपुर्वी विद्यार्थ्यांची तयारी तपासण्यासाठी आणि परीक्षेपूर्वी त्यांना विज्ञान विषयाबद्दल अपडेट करण्यासाठी सायन्स चॅलेंज स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे.

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी विज्ञान चॅलेंज जाहीर केले आहे.

विद्यार्थ्यांना जग समजून घेण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान हे अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत. या टप्प्यावर 'विद्यार्थ्यांमध्ये कुतूहल, प्रश्न-उत्तर आणि उच्च स्तरीय विचार विकसित करण्यासाठी एक उपक्रम म्हणून सायन्स चॅलेंज देण्यात आले असल्याचे बोर्डाने सांगितले.

दीक्षा प्लॅटफॉर्मवर उपलब्ध
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार 'सीबीएसई सायन्स चॅलेंज' १७ जानेवारी ते २८ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत दिक्षा (DIKSHA) प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असेल. हे चॅलेंज हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध असेल. सर्व बोर्डांचे विद्यार्थी कोणतेही शुल्क न भरता हे चॅलेंज स्वीकारू शकतात. सीबीएसईशी संलग्न असलेल्या शाळांनी त्यांच्या विद्यार्थ्यांची अधिकृत वेबसाइट cbse.gov.in वर नोंदणी करणे आवश्यक आहे.

एकदा नोंदणी केल्यानंतर विद्यार्थ्यांना एक नोंदणी आयडी मिळेल. प्लॅटफॉर्मवरील सायन्स चॅलेंज स्वीकारताना विद्यार्थ्यांना हा आयडी वापरावा लागेल. सीबीएसईशी संलग्न नसलेल्या शाळांमधील विद्यार्थी थेट प्लॅटफॉर्मवर चॅलेंज स्वीकारू शकतात. कोर्स पूर्ण करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

सायन्स चॅलेंजसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिक्षा अर्जाची न्यू अपडेट डाउनलोड करण्यासाठी किंवा प्रमाणपत्रे मिळविण्यासाठी दिक्षा वेबसाइटवर लॉगिन करावे लागणार आहे.

वेबसाइट किंवा अॅपवर विद्यार्थ्यांच्या नावांचे स्पेलिंग बरोबर आहे याची खात्री करण्याची जबाबदारी शाळांना घ्यावी लागणार आहे. सायन्स चॅलेंज सहभागाचे प्रमाणपत्र असलेले विद्यार्थी दुसऱ्या टप्प्यासाठी किंवा रमन यंग सायन्स इनोव्हेटर अवॉर्ड्सच्या राष्ट्रीय पात्रतेसाठी पात्र ठरतील. शाळा प्रत्येक वर्गातील पाच मुलांचे नाव यासाठी देऊ शकतात.

अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा

--------------------------------------------------------------------------------

Admission Guidance 2021: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News


सीबीएसई बोर्डातर्फे आठवी ते दहावीचे विद्यार्थ्यांसाठी सायन्स चॅलेंज स्पर्धा २०२२
1st January 2024

CBSE Exams 2024

सीबीएसई बोर्डातर्फे आठवी ते दहावीचे विद्यार्थ्यांसाठी सायन्स चॅलेंज स्पर्धा २०२२
27th September 2019

CBSE Sample Papers 2020