Schools

Schools

फेरपरीक्षेतील उत्तीर्णांनाही मिळणार ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत संधी

PUBLISH DATE 30th August 2019

दहावीच्या फेरपरीक्षेचा निकाल उद्या (ता. ३०) जाहीर होत असल्याने त्यात उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. त्यासाठी ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ (एफसीएफएस) या तत्त्वावरील फेरीच्या दुसऱ्या टप्प्यातील वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या टप्प्यातील प्रवेश तीन सप्टेंबरपासून सुरू होतील.

पुणे - दहावीच्या फेरपरीक्षेचा निकाल उद्या (ता. ३०) जाहीर होत असल्याने त्यात उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. त्यासाठी ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ (एफसीएफएस) या तत्त्वावरील फेरीच्या दुसऱ्या टप्प्यातील वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या टप्प्यातील प्रवेश तीन सप्टेंबरपासून सुरू होतील.

‘एफसीएफएस’ या फेरीसाठी तीन गट करण्यात आले आहेत. पहिल्या गटात दहावीच्या दोन्ही परीक्षांमध्ये साठ टक्के आणि त्यापेक्षा अधिक गुण मिळविणारे विद्यार्थी असतील. दुसऱ्या गटात दहावीत उत्तीर्ण झालेले सर्व विद्यार्थी आणि तिसऱ्या गटात दोन्ही परीक्षांमध्ये एटीकेटी मिळवून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी असतील. या तीन गटांसाठी वेगवेगळ्या वेळी प्रवेश होतील. जे नव्याने केंद्रीय प्रवेश प्रक्रियेत सहभागी होणार आहेत. त्यांच्यासाठी पसंतीक्रम म्हणजे अर्जाचा भाग दोन भरण्याची गरज नाही. नव्याने सहभागी होणाऱ्या  विद्यार्थ्यांनी मार्गदर्शक केंद्रातून माहितीपुस्तिका विकत घ्यायची आहे. त्यातील सूचनेनुसार प्रवेश अर्ज भरून तो मान्य (अप्रूव्ह) करून घ्यायचा आहे. या प्रक्रियेसाठी तीन ते सात सप्टेंबर ही मुदत देण्यात आली आहे. या काळात कनिष्ठ महाविद्यालयांना त्यांच्या राखीव कोट्यातील उर्वरित जागा ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी समर्पित करता येतील.

प्रवेश रद्द करण्याची संधी 
विद्यार्थ्यांनी आधीच्या फेऱ्यांमध्ये मिळालेल्या महाविद्यालयात प्रवेश घेतला असेल, तर तो ३१ ऑगस्ट रोजी रद्द करण्याची संधी या फेरीत दिली जाणार आहे. विद्यार्थ्याने मिळालेला प्रवेश रद्द केल्यास त्याला ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावरील फेरीत प्रवेश घ्यावा लागेल. तसेच, सध्या रिक्त जागा असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयातच त्याला प्रवेश मिळणार आहे. त्यामुळे मिळालेला प्रवेश विचारपूर्वक रद्द करावा, असे आवाहन केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीच्या अध्यक्षा मीनाक्षी राऊत यांनी सांगितले.

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off http://www.vidyarthimitra.org/rank_predictor

For all latest Govt Jobs 2019Railway JobsBank Jobs and SSC Jobs log on to https://goo.gl/YPjt94 We bring you fastest and relevant notifications on Bank, Railways and Govt Jobs. Stay Connected

Image result for click here gif http://fyjc.vidyarthimitra.org

| Govt. & Private Jobs, Internships, Campus Drive, Off-campus & many more |

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा

------------------------------------------------------------------------------


Related News


फेरपरीक्षेतील उत्तीर्णांनाही मिळणार ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत संधी
7th April 2024

DMVS Admission 2024

फेरपरीक्षेतील उत्तीर्णांनाही मिळणार ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत संधी
1st April 2024

PSEB 5th Result 2024 Out

फेरपरीक्षेतील उत्तीर्णांनाही मिळणार ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत संधी
30th January 2024

MPSOS Result 2023

फेरपरीक्षेतील उत्तीर्णांनाही मिळणार ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत संधी
12th January 2024

Delhi Nursery Admissions 2024

फेरपरीक्षेतील उत्तीर्णांनाही मिळणार ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत संधी
4th January 2024

EMRS Answer Key 2023-24

फेरपरीक्षेतील उत्तीर्णांनाही मिळणार ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत संधी
27th December 2023

NIOS Result 2023 Out

फेरपरीक्षेतील उत्तीर्णांनाही मिळणार ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत संधी
21st December 2023

JKBOSE 10th Result 2023 Date

फेरपरीक्षेतील उत्तीर्णांनाही मिळणार ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत संधी
11th December 2023

TN Half Yearly Examination 2023

फेरपरीक्षेतील उत्तीर्णांनाही मिळणार ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत संधी
22nd November 2023

Delhi Nursery Admissions 2024

फेरपरीक्षेतील उत्तीर्णांनाही मिळणार ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत संधी
22nd June 2023

JNVST Result 2023