Schools

Schools

इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांचे निकाल लांबणार: सोशल मीडियावर निकालाच्या तारखांबाबतची अफवा

PUBLISH DATE 19th May 2020

 कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावी ,बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर परिणाम झाला असून परीक्षांचे निकाल लांबणार आहेत.

परंतु, निकालाच्या विविध तारखा सोशल मीडियावर पसरविल्या जात आहेत. मात्र, या तारखांवर व अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये,असे आवाहन राज्य मंडळाच्या अध्यक्षा डॉ.शकुंतला काळे यांनी केले आहे.राज्य मंडळाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षा सुरू असताना कोरोना विषाणूचा फैलाव होत असल्याचे दिसून आले.
त्यामुळे राज्य शासनाने इयत्ता दहावीचा भूगोल विषयाचा पेपर पुढे ढकलण्याचा निर्णय घेऊन पुढील काळात तो रद्द करावा लागला. तसेच शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली. त्यामुळे उत्तरपत्रिका तपासणीचे काम ठप्प झाले. त्यावर शासनाने शिक्षकांना घरी उत्तरपत्रिका तपासण्यासाठी परवानगी दिली. मात्र, उत्तरपत्रिका शाळा-महाविद्यालयांमध्ये अडकून पडल्यामुळे उत्तरपत्रिका तपासणीच्या कामाला वेग आला नाही. गेल्या काही दिवसांपासून शिक्षक शाळा महाविद्यालयांमधून उत्तरपत्रिका तपासून राज्य मंडळाकडे जमा करत आहेत. परंतु, सर्वाधिक कोरोना प्रभावित भागातील शिक्षकांना उत्तरपत्रिका तपासणीच्या कामात अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
राज्य मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर ,अमरावती, नाशिक , लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळातर्फे इयत्ता दहावी बारावीची परीक्षा घेण्यात आली. या सर्व विभागीय मंडळांची निकाल तयार करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय राज्य मंडळाला निकाल जाहीर करता येत नाही. एका विभागाचा निकाल तयार करण्यास उशीर झाला तरीही राज्याचा निकाल लांबतो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षकांकडून फिजिकल डिस्टंन्सिगचे नियम पाळून निकाल तयार करण्याचे काम आता वेगाने केले जात आहे. परंतु, निकाल केव्हा जाहीर करता येऊ शकतो; याबाबतची आवश्यक असणारी माहिती (डेटा) अद्याप राज्य मंडळाकडे प्राप्त झालेली नाही. त्यामुळे निकालाची तारीख सद्यस्थितीत राज्य मंडळाला सांगता येत नाही, असे मंडळातील सूत्रांनी सांगितले. मात्र, सोशल मीडियावर निकालाच्या तारखा प्रसिद्ध होत असल्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे.
दहावी-बारावीच्या निकालाबाबत सोशल मीडियावर पसरणाऱ्या अफवा व तारखांवर विद्यार्थी व पालकांनी विश्वास ठेवू नये. राज्य मंडळाकडून यथावकाश निकालाच्या तारखांबाबतची माहिती प्रसिद्ध केली जाईल. 

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

For all latest Govt Jobs 2019Railway JobsBank Jobs and SSC Jobs log on to https://goo.gl/YPjt94 We bring you fastest and relevant notifications on Bank, Railways and Govt Jobs. Stay Connected

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा


Related News


इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांचे निकाल लांबणार: सोशल मीडियावर निकालाच्या तारखांबाबतची अफवा
7th April 2024

DMVS Admission 2024

इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांचे निकाल लांबणार: सोशल मीडियावर निकालाच्या तारखांबाबतची अफवा
1st April 2024

PSEB 5th Result 2024 Out

इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांचे निकाल लांबणार: सोशल मीडियावर निकालाच्या तारखांबाबतची अफवा
30th January 2024

MPSOS Result 2023

इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांचे निकाल लांबणार: सोशल मीडियावर निकालाच्या तारखांबाबतची अफवा
12th January 2024

Delhi Nursery Admissions 2024

इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांचे निकाल लांबणार: सोशल मीडियावर निकालाच्या तारखांबाबतची अफवा
4th January 2024

EMRS Answer Key 2023-24

इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांचे निकाल लांबणार: सोशल मीडियावर निकालाच्या तारखांबाबतची अफवा
27th December 2023

NIOS Result 2023 Out

इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांचे निकाल लांबणार: सोशल मीडियावर निकालाच्या तारखांबाबतची अफवा
21st December 2023

JKBOSE 10th Result 2023 Date

इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांचे निकाल लांबणार: सोशल मीडियावर निकालाच्या तारखांबाबतची अफवा
11th December 2023

TN Half Yearly Examination 2023

इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांचे निकाल लांबणार: सोशल मीडियावर निकालाच्या तारखांबाबतची अफवा
22nd November 2023

Delhi Nursery Admissions 2024

इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांचे निकाल लांबणार: सोशल मीडियावर निकालाच्या तारखांबाबतची अफवा
22nd June 2023

JNVST Result 2023