Medical Admissions 2025-26

Medical Admissions 2025-26

NEET 2020: सैन्यदलात डॉक्टर होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी

PUBLISH DATE 16th September 2020

भारतात दरवर्षी लाखो मुल/मुली NEET परीक्षा देतात. कारण लहानपणापासुन त्यांनी स्वप्न पाहिलेले असते डॉक्टर होण्याचे. या  वर्षी महाराष्ट्रातील २,२०,००० विद्यार्थ्यांनी NEETचा फॉर्म भरला होता. या परिक्षेच्या आधारे जी गुणवत्ता यादी तयार होईल त्यानुसार M.B.B.S., B.D.S., B.A.M.S., B.H.M.S., आणि इतर पॅरामेडीकल कोर्सेसच्या अ‍ॅडमिशन्स होतिल. 

महाराष्ट्रात किती वैद्यकीय महाविद्यालय आहेत, वेगवेगळ्या अभ्यासक्रमासाठी किती सिटस आहेत याची माहिती इंटरनेटवर उपलब्ध आहे. त्या सर्व कॉलेजेसचा गेल्यावर्षीचा  कट ऑफ काय होता त्याप्रमाणे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी प्राधान्यक्रम ठरविला असेल. 
मी आज तुम्हाला भारतातील क्रमांक दोनच्या वैद्यकीय महाविद्यालयाबाबत आठवण करुन देत आहे. 

सशस्त्र सेना चिकीत्सा महाविद्यालय म्हणजेच ARMED FORCES MEDICAL COLLEGE अर्थात AFMC

पुण्यनगरीत आपल्या सेनादलांसाठी उच्च दर्जाचे सेनाधिकारी घडविणार्‍या तीन संस्था आहेत.

१. कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरींग अर्थात CME

२. नॅशनल डिफेंस अ‍ॅकॅडेमी अर्थात NDA

३. सशस्त्र सेना चिकीत्सा महाविद्यालय म्हणजेच ARMED FORCES MEDICAL COLLEGE अर्थात AFMC


AFMC हे भारतातील मेडिकल कॉलेजेस मध्ये क्रमांक दोनवर आहे. या कॉलेजचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सशस्त्र सेनादलासाठी मेडिकल ऑफिसर निर्माण करणारे सार्क देशातील (1. नेपाळ, 2. भुतान, 3. श्रीलंका, 4. मालदीव, 5. पाकिस्तान, 6. बांगलादेश, 7. भारत, 8. अफगाणिस्तान) एकमेव मेडिकल कॉलेज. AFMC मध्ये दरवर्षी पाच सिट सार्क देशातील विद्यार्थी / विद्यार्थिनींसाठी राखीव असतात.  


पुण्यात कमांड हॉस्पिटलची सुरवात झाली, साधारणतः दुसऱ्या महायुध्दाच्या वेळेस. त्या काळापासुन या हॉस्पिटलची ब्लडबँक नावाजलेली आहे. आपल्याला स्वातंत्र्य मिळाले १९४७ साली. त्यानंतर १९४८ साली AFMC ची स्थापना झाली. तेव्हा इतर वैद्यकीय महाविद्यालयातून पदवीप्राप्त विद्यार्थी (MBBS), येथे पदव्युत्तर शिक्षणासाठी येत. सैन्यदलात सर्वसाधारण महाविद्यालयातून पदवी प्राप्त केलेले डॉक्टरस् दाखल होत असत. 

१९५५ नंतर सैन्यदलाच्या गरजांचा गंभिरपणे विचार सुरू झाला. त्या विचारमंथनात सैन्यदलासाठी वैद्यकीय पदवी शिक्षणाची सोय AFMC मध्येच उपलब्ध करून देण्याचे ठरले. AFMCची अंडर ग्रॅज्युएट विंगची स्थापन झाली ४ ऑगस्ट १९६२ रोजी आणि पहिली बॅच ऑक्टोबर १९६६ मध्ये पदवी शिक्षण पूर्ण करुन सैन्यदलात दाखल झाली. या वर्षीची असेल ५९ वी बॅच. 


या महाविद्यालयात प्रवेश मिळविण्यासाठी २०११ पर्यंत AFMC स्वत: प्रवेश परीक्षा (१२वी अुत्तीर्ण किंवा १२ वी ची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी) आयोजित करीत असे. २०१२ पासून NEET हीच प्रवेश परीक्षा मान्य झाली आहे. या परीक्षेत पहिल्या ५००० गुणवत्ता क्रमांकातील विद्यार्थी/ विद्यार्थिनी, ज्यांना AFMC मध्ये प्रवेश घ्यावयाच आहे, अशांना मुलाखतीसाठी व कलचाचणी (अॅपटीट्युड टेस्ट) साठी आमंत्रित केले जाते. त्याच वेळेस अशा विद्यार्थी/ विद्यार्थिनींची सर्वसाधारण वैद्यकीय तपासणी केली जाते. या महाविद्यालयात ११५ मुलगे व ३० मुलींची अंतिम निवड होते. 

या महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केल्यावर, संरक्षणदलात सेवा करावी अशी सर्वसाधारण अपेक्षा. शॉर्ट सर्व्हिस किंवा पूर्ण काळ असे दोन पर्याय आहेत. संरक्षणदलाच्या गरजेनुसार सिलेक्शन होते. परंतु अशी सेवा न करण्याचा पर्यायही अुपलब्ध आहे. २०१४च्या म्हणजे A3 बॅचच्या विद्यार्थ्यांना असे बाहेर पडताना रु. २५ लक्ष भरावे लागले. दरवर्षी या रक्कमेत वाढ होत असते. 


AFMCमध्ये निव्वळ डॉक्टर नव्हे तर ऑफिसर घडविले जातात. आणि यासाठीच अभ्यासाबरोबरच ऑलराऊंडर व्यक्ती (जिच्याकडे नेतृत्व करण्याची क्षमता आहे), निर्माण होण्यासाठी खेळाची सर्वसाधने, सोयी अुपलब्ध आहेत, अितरही कल्चरल अॅक्टिव्हीटीज, अॅडव्हेंचर अॅक्टिव्हीटीजसाठी प्रोत्साहन व पुरेसे बजेट अुपलब्ध आहे. या महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी ऑलिंपिकमध्ये अेक खेळाडू या नात्याने भारताचे प्रतिनिधित्व केलेले आहे. सांगण्यासारखे भरपूर आहे. YOU TUBE वर AFMCच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या शॉर्ट फिल्मस बघायला मिळतील. त्याहुनही महत्वाचे म्हणजे तुमच्यासाठी एक लिंक देत आहे ती जरुर बघाच. https://youtu.be/LMHcRoNoSUs ह्या व्हिडीओ क्लिपमध्ये लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर AVSM, VSM यांचे विचार ऐकता येतिल. लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर AVSM, VSM या AFMCच्या डिन होत्या.


आजूबाजूच्या देशांमध्ये अशी संस्था नाही. पण आपण मराठी लोक कमनशिबी. अशी संस्था महाराष्ट्रात, पुण्यात आहे पण मराठी तरुण/तरुणी या करिअरचा विचारच करत नाहीत. पुण्याबाहेरून येणार्‍या बहुतेक मुलांच्या पालकांना अनुभवास येते की, स्टेशन किंवा अेअरपोर्ट वरच्या रिक्षा/टॅक्सीवाल्यांनाही AFMC कोठे आहे माहित नाही. त्यांना माहित आहे कमांड हॉस्पिटल. माझ्या मुलाने अ‍ॅडमिशन घेते वेळी एका ब्रिगेडीयर सरांनी मला विचारलेला प्रश्ण आजही मला सतावतो. प्रश्ण होता, Mr. KHARE, PUNE IS IN MAHARASHTRA. IF THIS IS TRUE, WHERE ARE THE MAHARASHTRIAN STUDENTS?


या महाविद्यालयात प्रवेश का घ्यावा ? व्यावहारीक पातळीवर विचार करावा असे माझे मत आहे. ही सर्व प्रवेश प्रक्रिया चालू असताना, पदवी पर्यंतचे वैद्यकीय शिक्षण, त्यानंतर पदव्युत्तर शिक्षण, स्वत:ची प्रॅक्टिस सुरु करणे याबाबत माहिती गोळा करावी. कोणीही विद्यार्थी, सरकारी महाविद्यालयातून, अुच्च गुणवत्ता क्रमांकाने MBBS झाला, तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठीच्या प्रवेश परीक्षेतही अुच्च गुणवत्ता क्रमांकाने अुत्तीर्ण झाला तर आणि तरच त्यास सरकारी महाविद्यालयात, त्याच्या आवडीच्या विषयात पदव्युत्तर अभ्यासक्रमास प्रवेश मिळू शकतो. 

अन्यथा पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करणे क्रमप्राप्त आहे, जी कोणती शाखा मिळत आहे त्यास प्रवेश घ्या आणि MD/MS पदरात पाडून घ्या. त्यानंतर त्या विद्यार्थ्याला तज्ञ डॉक्टर बरोबर काम करण्याचा अनुभव मिळायला हवा. किंवा  चांगल्या नामांकित हॉस्पिटलमध्ये नोकरी मिळायला हवी, स्वतंत्र प्रॅक्टिस करायची असल्यास अुत्तम परिसरात क्लिनिकसाठी जागा मिळायला हवी. वैद्यकीय क्षेत्रात मैत्रीचे संबंध प्रस्थापित व्हायला हवेत, तर त्या नवोदिताकडे पेशंटस येणार.

म्हणजेच या मुलाचा संघर्ष वयाच्या तिशी-पस्तीशी पर्यंत चालू असतो. पाच वर्षापूर्वी मी घेतलेल्या अंदाजानुसार कमीतकमी अेक कोटीची गुंतवणूक होणार. त्यात आणखी भर म्हणजे ज्या विद्यार्थ्याचे / विद्यार्थिनीचे पालक वैद्यकीय क्षेत्रातले नाहीत त्यांना तर अक्षरश: शुन्यातून सुरवात करायची आहे. या सगळ्याचे दडपण नवोदित डॉक्टरवर येत नसेल का ?

या कॉलेजातून ग्रॅज्युएट झाल्यानंतर तीन ते चार वर्षांच्या नोकरी नंतर पोस्ट ग्रॅज्युएशन करण्यासाठी परवानगी मिळते. सैन्यदलाच्या हॉस्पिटल्समध्ये पोस्ट मिळते. अशा सेनाधिकर्‍यांसाठी ३०९ सिटस (सर्व विषयांसाठी एकत्रित आकडा) उपलब्ध आहेत. ग्रॅज्युएट झाल्यानंतर मेडिकल ऑफिसरला मिळणारा पगार आणि त्याहूनही अभिमानाची रॅन्क (RANK) याबाबत माहिती गुगलवर उपलब्ध आहे.

अशा सर्व बाबींची चर्चा, परीचयातील, नात्यातील डॉक्टर्सबरोबर जरुर करा. देशसेवा करण्याची महान संधी AFMC तून मिळणार आहेच. पण अगदी व्यावहारिक पातळीवर विचार करायचा झालाच तर, AFMC तून MBBS झाल्याबरोबर पगारी नोकरी, भत्ते याचे लाभ सुरु. नोकरी करत असतानाच पदव्युत्तर शिक्षण तेही आपल्या आवडीच्या विषयात करणे सहज शक्य, कायम नोकरी करायचे ठरविल्यास पदोन्नती कशी होत जाणार हे निश्चित. 
निवृत्तीनंतर पेन्शन मिळणार असल्याने, पैशाची / अुदरनिर्वाहाची चिंता नसल्याने, सामाजिक भान ठेवून स्वच्छ आणि प्रामाणिक प्रॅक्टिस करता येअिल. 
हुशार मुलांनी व त्यांच्या पालकांनी या गोष्टी जरूर विचारात घ्याव्यात.  

विद्यार्थी / विद्यार्थिनीं यांनी अवश्य बघाव्यात अशा काही YOU TUBE LINKS
https://youtu.be/vycv1v_WSpA
https://youtu.be/CHtWRos5jMQ
https://youtu.be/3RRiOQpznyA
https://youtu.be/df39Vfl7szg

लेखक: श्री. सुदर्शन विश्वनाथ खरे
    कोथरुड, पुणे ४११०३८.
   

VM-ABVP-CET-flyer-aug-2020

विनामूल्य आयोजन ऑनलाईन मॉक एमएचटी-सीईटी २०२०

नोंदणी येथे https: //www.vidyarthimitra.org/abvpmockexam

WhatsApp https://wa.me/917720025900

VM-ABVP-CET-flyer-aug-2020

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News


NEET 2020:  सैन्यदलात डॉक्टर होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
1st July 2025

MDS Admission 2025

NEET 2020:  सैन्यदलात डॉक्टर होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
17th June 2025

NEET UG 2025

NEET 2020:  सैन्यदलात डॉक्टर होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
12th December 2024

MCC NEET PG Round 2 Counselling

NEET 2020:  सैन्यदलात डॉक्टर होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
29th November 2024

MCC NEET PG Counselling 2024

NEET 2020:  सैन्यदलात डॉक्टर होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
10th November 2024

AIIMS INI CET 2025 Exam Today

NEET 2020:  सैन्यदलात डॉक्टर होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
2nd December 2023

HPSC MO Admit Card 2023

NEET 2020:  सैन्यदलात डॉक्टर होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
30th November 2023

GNM Exams 2023

NEET 2020:  सैन्यदलात डॉक्टर होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
20th April 2022

NEET PG 2022: Not Postponed