Medical Admissions 2024-25

Medical Admissions 2024-25

नीट सुपर स्पेशालिटी काऊन्सेलिंग २०२२: एमसीसीकडून निवड भरण्याची प्रक्रिया स्थगित

PUBLISH DATE 6th April 2022

वैद्यकीय समुपदेशन समितीने (Medical Counseling Committee, MCC) नीट सुपर स्पेशालिटी काऊन्सेलिंगच्या जागांसाठी निवड भरण्याची प्रक्रिया थांबवली आहे.

अनेक वैद्यकीय महाविद्यालये आणि संस्थांमधील जागा नीट सुपर स्पेशालिटीच्या सीट मॅट्रिक्समध्ये समाविष्ट न केल्यामुळे असे करण्यात आले. नीट सुपर स्पेशालिटी जागांसाठी चॉईस फिलिंग सध्या थांबवण्यात आले आहे. ज्या वैद्यकीय महाविद्यालये आणि संस्थांनी सीट मॅट्रिक्समध्ये त्यांच्या जागा जोडल्या नसतील त्यांना लवकरात लवकर जोडता येणार आहेत.

एमसीसीने जाहीर केलेल्या नोटीसनुसार, या महाविद्यालये आणि संस्थांमधील नवीन जागा जोडण्याचे काम पूर्ण होताच, त्यानंतर लगेचच निवड भरण्याची प्रक्रिया पुन्हा सुरू केली जाणार आहे.

४ एप्रिलच्या संध्याकाळपर्यंत एसीसीने काऊन्सेलिंग पहिल्या फेरीतील जागांच्या मॅट्रिक्समध्ये ऑल इंडिया कोट्यातील ९७ जागांसह आणखी २३७ जागा जोडल्या. संपूर्ण देशात फक्त ६ हजार सुपर स्पेशालिटी सीट्स उपलब्ध आहेत.

फेडरेशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स असोसिएशन (Federation of Resident Doctors Association, FORDA) ने या संदर्भात आरोग्य सेवा महासंचालकांना पत्र लिहिले होते. यानंतर निवड भरण्याची प्रक्रिया थांबविण्याचे पाऊल उचलण्यात आले आहे. नीट सुपर स्पेशालिटी २०२१ काऊन्सेलिंगच्या पहिल्या फेरीसाठी सीट मॅट्रिक्समध्ये २५० पेक्षा जास्त जागा दिसत नाहीत. ज्यामध्ये आर्मी रिसर्च आणि रेफरल हॉस्पिटल (Army Research and Referral Hospital) आणि सर गंगाराम हॉस्पिटल (Sir Gangaram Hospital) सारख्या नामांकित संस्थांच्या जागांचा समावेश आहे.

असोसिएशनने रविवारी आपल्या पत्रात लिहिल्याप्रमाणे, प्रत्येक आरोग्य संस्थेने शुल्क रचना, स्टायपेंड आणि बाँडचे तपशील अद्याप प्रकाशित केलेले नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांची निवड करणे अवघड झाले आहे. कार्डिओलॉजी, न्यूरोलॉजी, यूरोलॉजी या वैद्यकीय क्षेत्रातील सुपर स्पेशालिटी विषयांचा अभ्यास करण्यासाठी नीट सुपर स्पेशालिटी परीक्षा घेतली जाते.

--------------------------------------------------------------------------------

VidyarthiMitra.org

Admission Guidance 2021: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2021 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2021 | JoSSA 2021 | MHT-CET 2021 | MBA 2021 | Pharmacy 2021 | Polytechnic 2021

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News


नीट सुपर स्पेशालिटी काऊन्सेलिंग २०२२: एमसीसीकडून निवड भरण्याची प्रक्रिया स्थगित
10th November 2024

AIIMS INI CET 2025 Exam Today

नीट सुपर स्पेशालिटी काऊन्सेलिंग २०२२: एमसीसीकडून निवड भरण्याची प्रक्रिया स्थगित
2nd December 2023

HPSC MO Admit Card 2023

नीट सुपर स्पेशालिटी काऊन्सेलिंग २०२२: एमसीसीकडून निवड भरण्याची प्रक्रिया स्थगित
30th November 2023

GNM Exams 2023

नीट सुपर स्पेशालिटी काऊन्सेलिंग २०२२: एमसीसीकडून निवड भरण्याची प्रक्रिया स्थगित
20th April 2022

NEET PG 2022: Not Postponed