Medical Admissions 2024-25

Medical Admissions 2024-25

वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेश २०२३: प्रवेशाच्या जागांमध्ये वाढ

PUBLISH DATE 10th August 2023

राज्यातील वैद्यकीय अभ्यासक्रमांची प्रवेश संख्या आता एक हजारने वाढली आहे. एमबीबीएस व बीडीएस या अभ्यासक्रमांच्या अनुक्रमे ९०० व १०० जागा पुन्हा वाढल्या आहेत. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी सेल) प्रवेश प्रक्रिया सुरू केल्यानंतर आठ संस्थांना प्रवेशासाठी आवश्यक मान्यता नसल्याने अचानक त्यांची नावे वगळण्यात आली होती. त्यामुळे पहिल्या फेरीत त्यांचा समावेश नव्हता. आता या संस्थांना मान्यता मिळाल्याने दुसऱ्या फेरीसाठी हजार जागा पुन्हा वाढल्या आहेत.

नीट युजी २०२३ एमबीबीएस किंवा बीडीएस अभ्यासक्रम प्रवेशासाठी जागांची माहिती ३१ जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यामध्ये सेवाग्राम येथील महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स या संस्थेतील एमबीबीएसच्या १०० जागांसह इतर सात खासगी संस्थांमधील ९०० जागांचाही प्रवेशासाठी समावेश करण्यात आला होता.

मात्र, प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यानंतर महाविद्यालयांना प्रवेशासाठी आवश्यक मान्यता प्राप्त झाली नव्हती. मान्यता नसल्याने आठ संस्थांना प्रथम प्रवेश फेरीतून वगळण्यात आले होते. त्यामुळे पहिल्या फेरीतून एमबीबीएसच्या ९०० आणि बीडीएसच्या १०० जागा कमी झाल्या. आता महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून या महाविद्यालयांना प्रवेशासाठी आवश्यक मान्यता प्राप्त झाली असल्यामुळे सदर महाविद्यालयांचा समावेश दुसऱ्या प्रवेश फेरीमध्ये करण्यात येणार आहे.

राज्यातील एमबीबीएसच्या जागा

- महाविद्यालये - ३२

- सरकारी जागा - ५ हजार २००

- खासगी महाविद्यालयांतील जागा - ३ हजार ७०

- एकूण - ८ हजार २७०

--------------------------------------------------------------------------------------------

VidyarthiMitra.org

Admission Guidance 2022: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2022 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2022 | JoSSA 2022 | MHT-CET 2022 | MBA 2022 | Pharmacy 2022 | Polytechnic 2022

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News


वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेश २०२३: प्रवेशाच्या जागांमध्ये वाढ
2nd December 2023

HPSC MO Admit Card 2023

वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेश २०२३: प्रवेशाच्या जागांमध्ये वाढ
30th November 2023

GNM Exams 2023

वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेश २०२३: प्रवेशाच्या जागांमध्ये वाढ
20th April 2022

NEET PG 2022: Not Postponed

वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेश २०२३: प्रवेशाच्या जागांमध्ये वाढ
19th February 2022

NEET MDS Exam 2022: Postponed